मुंबई: प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये गुरुवारी सलग पाचव्या सत्रातील घसरणीने भांडवली बाजारावरील मंदीवाल्यांच्या आक्रमक पवित्र्याला गुरुवारी अधोरेखित केले. जागतिक भांडवली बाजारांमधील मंदीने गुंतवणूकदारांची चिंता वाढवली असून, धातू, बँकिंग आणि वित्त क्षेत्रातील समभागांमध्ये विक्रीचा मारा वाढल्याने सत्रअखेर प्रमुख निर्देशांक नकारात्मक पातळीवर स्थिरावले.

वायदे बाजारातील व्यवहारांवर रोखे उलाढाल कर (एसटीटी) आणि अल्पकालीन भांडवली नफा करात वाढीच्या अर्थसंकल्पातील घोषणेनंतर मोठ्या प्रमाणावर परदेशी गुंतवणूकदारांनी निधी काढून घेतल्याचा बाजाराच्या भावनांना दुखावणारा नकारात्मक परिणाम दिसून येत आहे. सत्रात तीव्र घसरण झाल्यानंतर, टाटा मोटर्स आणि लार्सन अँड टुब्रोच्या समभागांनी बाजारातील पडझडीला रोखून धरले. त्या परिणामाने सेन्सेक्स १०९.०८ अंशांनी घसरून ८०,०३९. ८० पातळीवर स्थिरावला. दिवसभरात तो ६७१ अंशांनी घसरून ७९,४७७.८३ या सत्रातील नीचांकी पातळीपर्यंत खाली घरंगळला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ७.४ अंशांची नगण्य घसरण झाली आणि तो २४,४०६.१० पातळीवर विसावला.

odisha cyclone
ओडिशात १.७५ लाख एकर पिकांचे नुकसान, दाना चक्रीवादळाचा परिणाम
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
stock market today sensex drops 663 point nifty ends below 24200
परकीयांच्या विक्रीने बाजार बेजार ! करोनानंतरचा सर्वात घातक महिना
sensex fell two month low with 930 points nifty close below 24500
सेन्सेक्स ९३० अंशांच्या गटांगळीसह दोन महिन्यांच्या नीचांकी
Sensex falls 73 points on Nifty ends below 24800
ऐतिहासिक ७७,७०१ कोटींची विदेशी गुंतवणूक ऑक्टोबरमध्ये माघारी, सेन्सेक्स, निफ्टीच्या घसरणीत आणखी  विस्तार
crops damage in Maharashtra
राज्याच्या अनेक भागांना पावसाचा फटका; पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती
Kolhapur rain paddy crops
Kolhapur Rain News: कोल्हापूर जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे पिकांना फटका
Loksatta chavdi
चावडी: उद्घाटन मध्यरात्री २ वाजता!

हेही वाचा >>>Budget 2024 नवउद्यामींना छळणारा ‘एंजल टॅक्स’ हद्दपार

ॲक्सिस बँकेच्या जून तिमाहीच्या कामगिरीने गुंतवणूकदारांना निराश केल्याने हा समभाग ५ टक्क्यांहून अधिक घसरला. त्यापाठोपाठ सेन्सेक्समधील, नेस्ले, टायटन, आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील, इंडसइंड बँक, आयटीसी, जेएसडब्ल्यू स्टील आणि स्टेट बँकेचे समभाग घसरणीला राहिले. तर वाढ साधणाऱ्यांपैकी टाटा मोटर्सने ६ टक्क्यांपर्यंत उसळी घेतली. लार्सन अँड टुब्रो, सन फार्मा, कोटक महिंद्र बँक, बजाज फायनान्स आणि पॉवर ग्रिड हेदेखील गुरुवारच्या व्यवहारात लाभार्थी ठरले. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी बुधवारच्या सत्रात ५,१३०.९० कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली होती.

सेन्सेक्स ८०,०३९. ८० – १०९.०८ (-०.१४)

निफ्टी २४,४०६.१० -७.४ (-०.०३)

डॉलर ८३.७२ १

तेल ८०.३१ -१.७३

रुपयाची घसरगुंडी

रिझर्व्ह बँकेकडून डॉलरचा पुरवठा वाढवणाऱ्या हस्तक्षेपानेही रुपयाच्या विनिमय मूल्यात घसरणीच्या मालिकेत गुरुवारीही सातत्य दिसून आले. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाने १ पैसा घसरणीसह ८३.७२ ही नवीन सार्वकालिक नीचांकी पातळी नोंदवली. डॉलरला वाढती मागणी आणि देशांतर्गत भांडवली बाजारातून परदेशी निधी बाहेर पडल्याने हा प्रतिकूल परिणाम दिसून आला. रुपयाने डॉलरच्या तुलनेत ८३.७२ या नीचांकी पातळीवरूनच व्यवहाराला सुरुवात केली. रिझर्व्ह बँकेच्या संभाव्य सक्रिय हस्तक्षेपानंतर, सत्रात त्याने ८३.६६ रुपयांची उच्चांकी पातळी नोंदवली. मात्र सत्रअखेरीस ८३.७२ या नीचांकाला त्याने गटांगळी घेतली. मध्यवर्ती बँकेकडून डॉलरची विक्री आणि खनिज तेलाच्या किमती कमी झाल्याने डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरणीला काहीसा बांध घातला गेला.