भांडवली बाजार, सरकार, गुंतवणूकदार सर्वांसाठी कळीचा मुद्दा ठरणाऱ्या महागाईची आकडेवारी आपल्याला सर्वांना दिलासा देणारी आहे. रिझर्व्ह बँकेतर्फे महागाई नियंत्रणासाठी केले जाणारे उपाय हळूहळू फळाला येत आहेत असे म्हणायला हरकत नाही. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार महागाई दर ४.७ टक्क्यांपर्यंत नरमला असून, तो गेल्या दीड वर्षातील नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. रिझर्व्ह बँकेची महागाई नियंत्रित करण्यातील भूमिका गुंतवणूकदार म्हणून आपण समजून घ्यायला हवी. कोणत्याही देशाच्या केंद्रीय बँकेचे आणि देशांतर्गत पातळीवर रिझर्व्ह बँकेचे मुख्य कार्य बाजारातील पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवणे आणि महागाई दरावर अंकुश ठेवणे हेच आहे. यासंदर्भात रिझर्व्ह बँकेची भूमिका स्पष्ट असते. मध्यम कालावधीत चार टक्के आणि त्याच्या जवळच्या दराला रिझर्व्ह बँक संदर्भदर म्हणून विचारात घेते. अजून स्पष्ट करून घ्यायचे झाल्यास, रिझर्व्ह बॅंक ४ टक्के हा समाधानकारक महागाई दर समजत असेल तर तो साडेचार किंवा पाच टक्क्यांजवळ पोहोचला तर मध्यवर्ती बँकेला तातडीने बाजारात हस्तक्षेप करून दर नियंत्रणात आणावा लागतो. जर महागाईचा दर वाजवीपेक्षा जास्त उलटा फिरून चार टक्क्यांपेक्षा अधिक कमी झाला तर ते धोक्याचे असते. कारण त्याने अर्थव्यवस्थेचे चक्र मंदावते. अशा वेळी बाजारात पैसा प्रवाहित म्हणजेच पैशाचा पुरवठा वाढवून रिझर्व्ह बँक पुन्हा अर्थव्यवस्थेत चालना निर्माण करते. नेमक्या याच समाधानकारक स्थितीत आजचा महागाई दर येऊन पोहोचला आहे. मार्च महिन्यात महागाई दर ५ टक्क्यांच्या पलीकडे होता, तो आता रिझर्व्ह बँकेच्या अपेक्षानुरूप इतका कमी झालेला आहे. यासाठी गेल्या वर्षभरात बँकेने रेपो दर अडीच टक्के वाढवला. सध्याचा रेपोदर साडेसहा टक्के आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा