गेल्या सोमवारी आपण नीलेश शहा यांची ओळख करून घेतली. यावेळेस ठरवून एका छोट्या एएमसीच्या (ॲसेट मॅनेजमेंट कपंनी) व्यवस्थापकीय संचालकाची थोडक्यात ओळख करून देत आहोत. बाजारातील माणसं या लेखमालेत म्युच्युअल फंड उद्योगात अग्रेसर असणारे अनेकजण आजवर आले आहेत. परंतु या म्युच्युअल फंडांचे बाजारातील महत्त्वाचे कार्य हेच असते की, जेव्हा परदेशी वित्तसंस्था आपल्या बाजारातून बाहेर पडतात, तेव्हा बाजाराला सावरून धरण्याचे काम म्युच्युअल फंडच करतात. हे काम म्युच्युअल फंड करू शकतात त्याचे मुख्य कारण म्हणजे गुंतवणूकदारांनी ‘सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी)’ या नियमित गुंतवणूक पद्धतीचा वापर करून फंडाकडे पैशाचा पुरवठा कायम ठेवला आहे. सुनील सरांनी छोट्या छोट्या गावांमध्ये जाऊन भाषणाद्वारे म्युच्युअल फंड योजना नवख्या गुंतवणूकदारांना समजावून सांगितल्या आहे. दोन दोन, तीन तीन तास हा माणूस सलग जागतिक अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था, बाजारातील चढ-उतार इत्यादी अनेक विषयांवर विविध आकडेवारीच्या साहाय्याने रोखठोक मार्गदर्शन करतो. म्हणून त्यांना म्युच्युअल फंड उद्योगाची ‘मुलुखमैदान तोफ’ असे म्हटले जाते.

म्युच्युअल फंड वितरकांच्या मेळाव्यात बोलताना, आर.आय.ए. अर्थात ॲडव्हायजर अथवा नोंदणीकृत सल्लागाराला भवितव्य नाही, असे ते स्पष्टपणे सांगून मोकळे होतात. ‘उगाचच परदेशाचे अनुकरण करण्याची गरज नाही. ऑस्ट्रेलियामध्ये ही पद्धत यशस्वी झाली म्हणून ती भारतात यशस्वी व्हावी असा अट्टहास करणे चुकीचेच,’ असे ते निक्षून सांगतात. गुंतवणूकदार छोटा असो किंवा मोठा असो गुंतवणुकीचा सल्ला दिला म्हणून फी देण्याची प्रथा आपल्याकडे यशस्वी होणे शक्य नाही, अशी नियामकांची कानउघाडणी करणारे विधान थेटपणे करायला धाडस लागते. हे धाडस सुनील सरांमध्ये का आले तर सप्टेंबर २००५ पासून त्यांचे नाते या व्यवसायाशी पक्के जोडले गेलेले आहे. वाईस-प्रेसिडेंट रिटेल डिस्ट्रिब्युशन, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सेल्स ॲण्ड ग्लोबल ऑपरेशन्स, डेप्युटी सीईओ, सीईओ आणि त्यानंतर मग सध्याची व्यवस्थापकीय संचालक ही जबाबदारी. अशी शिडीची एक एक पायरी ते चढत वर आले आहेत. याचबरोबर सुंदरम ॲसेट मॅनेजमेंट सिंगापूर या कंपनीच्या संचालक मंडळात ते आहेत. त्यांनी सुंदरम म्युच्युअल फंड वेगाने वाढविला. प्रिन्सिपल ॲसेट मॅनेजमेंट कंपनीच्या योजना सुंदरमकडे आणल्या. हे विलीनीकरण त्यांनी यशस्वीपणे करून दाखविले. खरे तर हा त्यांच्या नावे असलेला विक्रमच आहे.

PM Narendra Modi interaction with Chief Secretaries across country for two days
पंतप्रधान मोदी देशभरातील मुख्य सचिवांशी साधणार दोन दिवस संवाद
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
FIITJEE Chairman DK Goel abused employee during an online meeting video viral on social media
“कोर्टात जा आणि तक्रार कर…”, नामांकित कोचिंग इन्स्टिट्यूटच्या चेअरमनने केली शिवीगाळ, मीटिंगमध्ये कर्मचाऱ्याला ओरडला अन्…, पाहा VIDEO
Rajya Sabha Winter Session.
Parliament Session : सभापतींना हटवण्यावरून राज्यसभेत गोंधळ, सलग दुसऱ्या दिवशी सभागृहाचं कामकाज स्थगित
Maharashtra Legislative Council Chairman post,
विधान परिषदेचे सभापतीपद कोणाकडे ?
Lawyer charter suspended , Police Patil, Lawyer Police Patil, Lawyer,
पोलीस पाटील पदावर काम केल्यामुळे वकिलाची सनद निलंबित
Who is Sanjay Malhotra?
Sanjay Malhotra : आरबीआयच्या गव्हर्नरपदी नियुक्त झालेले संजय मल्होत्रा कोण आहेत?

हेही वाचा – शेअर बाजारातील उत्साहानं बँक निफ्टी निर्देशांकाने गाठला उच्चांक, नवा इतिहास रचला

लंडनमधून सुनील यांनी एमबीए करण्याअगोदर, आयआयटी, मद्रासमधून एमएससी ही पदवी मिळवली. इंडियन इन्स्टिटयूट ऑफ बँकर्स या संस्थेचे ते सर्टिफाईड असोसिएट आहेत. त्यांच्या कामामुळे त्यांना अनेक संस्थाकडून उत्कृष्ट कामगिरीची पारितोषिके मिळवता आली. याचबरोबर वेगवेगळ्या व्यापार-वृत्त वाहिन्यांवरसुद्धा त्यांचे सातत्याने गुंतवणूकदारांना मार्गदर्शन सुरू असते. ‘भारतीय भांडवल बाजाराच्या वाढीला प्रचंड मोठा वाव आहे. बाजारात आणखी खेळाडू आले तरी ते बाजाराला आणखी मोठे करतील. त्यामुळे अनेक म्युच्युअल फंड आले, तरी भीती बाळगण्याचे काम नाही,’ असा विश्वास ते दृढपणे व्यक्त करतात.

म्युच्युअल फंड वितरकांनी गुंतवणूकदारांचा मित्र बनला पाहिजे. व्यवसायाच्या पलीकडे जाऊन दोघांमध्ये चांगले नाते निर्माण व्हायला पाहिजे गुंतवणूकदारांच्या मालमत्तेची विभागणी फक्त आणि फक्त म्युच्युअल फंड वितरकच योग्य रीतीने करू शकतो. आपल्या व्यवसायात पूर्ण लक्ष केंद्रित करीत असताना, आपल्या भोवताली असणाऱ्या व्यक्तीच्या गरजा काय याची माहिती घेऊन त्यानुसार शक्य होईल तेवढी मदत करणे चालू असते.

म्युच्युअल फंड उद्योगात या पुढील काळात स्पर्धा तीव्र होणार असून बाजारात ‘पॅसिव्ह फंडां’चे महत्त्व वाढेल. परंतु सध्या स्मॉल कॅप फंड योजनांना प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्याची दखल घेतली नाही असे करून चालणार नाही. लार्ज कॅप प्रकाराकडे गुंतवणूकदारांचे लक्ष नाही. परंतु भारतातील लार्ज कॅप कंपन्या या जगातल्या छोट्या कंपन्या आहेत. जगातील पहिल्या १०० कंपन्यांत फक्त रिलायन्स या एकाच कंपनीचा समावेश आहे. जर भारताला जगात तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून स्थान मिळवायचे असेल तर भारतीय कंपन्या आणखी मोठ्या झाल्या पाहिजेत.

हेही वाचा – ‘कितीदा नव्याने तुला आठवावे!’

नवीन येणारे फंडस् अस्तित्वात असलेल्या फंडाना सहकार्य करतील हे नक्की आणि उगाचच एखाद्या मोठ्या संस्थेने म्युच्युअल फंड योजना आणायचे ठरविले आहे म्हणून घाबरायचे कारण नाही. अस्तित्वात असलेल्या सध्याच्या म्युच्युअल फंडांवर याचा कोणताही अनिष्ट परिणाम होणार नाही, तर म्युच्युअल फंडांच्या वाढीसाठी ते मदतकारकच ठरेल, अशी सुनील सरांची भूमिका आहे. बाजारात हळूहळू स्थावर मालमत्तेपेक्षा वित्तीय मालमत्तांमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण यापेक्षा जास्त वेगाने वाढत जाईल. उगाचच डोक्यात भीती असू नये, असा त्यांचा आश्वासक सूर आहे.

ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह फंडस् यांच्यावर उगाचच अवास्तव चर्चा केल्या जातात. कितीही पॅसिव्ह फंडस् आले तरी ॲक्टिव्ह फंडापेक्षा ते मोठे होतील असे नाही. परदेशी गुंतवणूक संस्था मोठ्या प्रमाणात आपली गुंतवणूक वाढवतील. मात्र अल्पकाळात काही अडचणी निर्माण होऊ शकतात. सुनील सरांना अनेक मानसन्मान मिळाले, जो त्यांच्या व्यावसायिक नेतृत्वाचा यथोचित गौरवच म्हणायला हवा. म्युच्युअल फंडाच्या योजनांच्या कामगिरीचे श्रेयसुद्धा सुनील सरांना दिले पाहिजे. २०२० ला वर्ल्ड मार्केटिंग काँग्रेसने सुंदरम ब्लूचिप फंड या योजनेला पुरस्कार दिला. तर २०२२ ला सुंदरम फ्लेक्सी कॅप या योजनेला मिळालेला तमिळनाडू ब्रँड लीडरशिप अवॉर्ड अशाप्रकारे सुंदरम म्युच्युअल फंड विविध पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. शेवटचे आणि अत्यंत महत्त्वाचे काम सुनील सरांनी केले आणि ते म्हणजे करोनाकाळात गुंतवणूकदारांना धीर देत त्यांनी केलेले मार्गदर्शन होय. बाजारात अशी माणसे हवीच असतात, कारण ती बाजाराला खोलवर रुजवण्यासाठी आणि आणखी रुंदावण्यासाठी मदत करतात.

Story img Loader