गेल्या सोमवारी आपण नीलेश शहा यांची ओळख करून घेतली. यावेळेस ठरवून एका छोट्या एएमसीच्या (ॲसेट मॅनेजमेंट कपंनी) व्यवस्थापकीय संचालकाची थोडक्यात ओळख करून देत आहोत. बाजारातील माणसं या लेखमालेत म्युच्युअल फंड उद्योगात अग्रेसर असणारे अनेकजण आजवर आले आहेत. परंतु या म्युच्युअल फंडांचे बाजारातील महत्त्वाचे कार्य हेच असते की, जेव्हा परदेशी वित्तसंस्था आपल्या बाजारातून बाहेर पडतात, तेव्हा बाजाराला सावरून धरण्याचे काम म्युच्युअल फंडच करतात. हे काम म्युच्युअल फंड करू शकतात त्याचे मुख्य कारण म्हणजे गुंतवणूकदारांनी ‘सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी)’ या नियमित गुंतवणूक पद्धतीचा वापर करून फंडाकडे पैशाचा पुरवठा कायम ठेवला आहे. सुनील सरांनी छोट्या छोट्या गावांमध्ये जाऊन भाषणाद्वारे म्युच्युअल फंड योजना नवख्या गुंतवणूकदारांना समजावून सांगितल्या आहे. दोन दोन, तीन तीन तास हा माणूस सलग जागतिक अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था, बाजारातील चढ-उतार इत्यादी अनेक विषयांवर विविध आकडेवारीच्या साहाय्याने रोखठोक मार्गदर्शन करतो. म्हणून त्यांना म्युच्युअल फंड उद्योगाची ‘मुलुखमैदान तोफ’ असे म्हटले जाते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा