दिल्लीला एका मोठ्या संघटनेची वार्षिक सभा सुरू होती. त्या वेळी तत्कालीन अर्थमंत्री असलेले अरुण जेटली समोर बसलेले होते. समोर व्यक्ती कोणीही असो, कुठलीही भीडभाड न बाळगता आपले विचार स्पष्ट शब्दांत मांडायचं हे उदय कोटक यांचे वैशिष्ट्य आणि त्याची प्रचीती अनुभवता आली. सरकारी मालकीचे आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीच्या समभागांची शेअर बाजारात नोंदणी केली पाहिजे हे थेट अर्थमंत्र्यांनाच जाहीरपणे सांगण्याचे धाडस केवळ कोटक यांना शक्य होते.

“सरकारला जर खरोखर औद्योगिक प्रगती व्हावी असे वाटत असेल तर या क्षेत्रात ‘ॲनिमल स्पिरिट’ संचारण्याची गरज आहे. सरकारने जर तयारी दाखविली तर आम्ही ॲक्सिस बॅंक खरेदी करण्यास तयार आहोत,” इतपर ते बोलून गेले. अर्थातच ॲक्सिस बँकेने सिटी बँकेचा रिटेल व्यवसाय खरेदी करण्याच्या अगोदरची ही गोष्ट आहे. सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँक उद्योगातून बाहेर पडले पाहिजे, असेही उदय कोटक खूप आधीपासून सतत सांगत आले आहेत.

india recorded highest cultivation of wheat rabi crop sowing exceeds 632 lakh hectares
यंदा गहू मुबलक; देशात उच्चांकी लागवड; रब्बी पेरण्या ६३२ लाख हेक्टरवर; पोषक वातावरणाचा परिणाम
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Kho-Kho World Cup Delhi, Kho-Kho ,
विश्लेषण : दिल्लीत चक्क खो-खो विश्वचषक? किती संघ सहभागी? स्पर्धेमुळे या मराठमोळ्या खेळाला संजीवनी मिळेल?
wardha deoli Shantanu raut
जगातील बारात ‘हा’ एकमेव भारतीय, नोबेल विजेत्याच्या नावे असलेला फेलोशिप सन्मान पटकावला
Loksatta editorial Copernicus Climate Change Service Report
अग्रलेख: विक्रमी आणि वेताळ
committee has been formed under chairmanship of sub-divisional officer of Daryapur to investigate after Kirit Somaiyas allegations
किरिट सोमय्यांच्‍या आरोपानंतर खळबळ… अमरावतीत आता बांगलादेशींच्या…
India GDP growth rate
भारताचा जीडीपी विकासदर मंदावण्याचा अंदाज चिंताजनक, पण धक्कादायक नाही! असे का?
Ahilya Devi Holkar Solapur University distributes defective blazers to player
विद्यापीठ खेळाडूंना सदोष ब्लेझर वाटप; चौकशीच्या मुद्द्यावर वाद

आणखी वाचा- बाजारातली माणसं : प्रगतीसाठी संघर्ष.. हर्ष मारीवाला

लहानपणी एकीकडे क्रिकेट, तर दुसरीकडे गणिताबद्दल प्रचंड आकर्षण असलेला हा माणूस. क्रिकेटमधील करिअरचे त्यांचे स्वप्न एका अपघातामुळे भंगले. पुढे व्यावसायिक क्रिकेटपटू होण्यापेक्षा शेअर बाजारात आलेले चांगले असा त्यांनी विचार केला. शेअर बाजारातसुद्धा अपघात होत असतात. क्रिकेटपटूंच्या भाषेत बोलायचे तर अचानक विकेट पडू शकते; परंतु तरीही वर्षानुवर्षे या बाजारात आक्रमक शैलीने खेळणारे म्हणून उदय कोटक यांचा लौकिक कायम आहे.

उच्च मध्यमवर्गीय गुजराती कुटुंबात उदय कोटक मोठे झाले. त्यांचा जन्म १५ मार्च १९५९ ला झाला. संपूर्ण शिक्षण मुंबईला झाले. ६० लोकांचे कुटुंब, स्वयंपाकघर मात्र एकच. अशा वातावरणात मोठे झालेले उदय कोटक यांनी १९८२ ला जमनालाल बजाज इन्स्टिट्यूटमधून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. कोटक महिंद्र फायनान्स ही कंपनी त्यांनी स्थापन केली. प्रथम ‘बिल डिस्काऊंटिंग’वर लक्ष केंद्रित केले. त्यात चांगला पैसा कमावला. आनंद महिंद्र त्यांचे चांगले मित्र असल्याने कंपनीच्या नावात महिंद्र नाव वापरायला आनंद महिंद्र यांनी कोणतीही अट घातली नाही. अर्थात मित्र आणि कुटुंबीयांकडून ३० लाखांच्या उसनवारीवर स्थापित या कंपनीत, आनंद महिंद्र आणि त्यांचे वडील यांनी एक लाखांची गुंतवणूक केली होती; पण ही गुंतवणूक कोणत्याही शर्तीविनाच होती.

आणखी वाचा- बाजारातली माणसं: लढवय्या माणूस

वर्ष १९८५ मध्ये सुरू झालेल्या या कंपनीने अमेरिकेतील जगप्रसिद्ध गोल्डमन सॅक्सला बरोबर घेतले; पण योग्य वेळी तिच्या हातात नारळसुद्धा दिला. २००३ साली बॅंकेची स्थापना केली. २०१४ मध्ये आयएनजी वैश्य बॅंकेचे कोटक बॅंकेत विलीनीकरण करण्यात आले. एकामागोमाग एक वेगवेगळ्या क्षेत्रांत आपला ठसा उमटलाच पाहिजे या ध्यासाने मग आयुर्विमा, सामान्य विमा, म्युच्युअल फंड, मर्चंट बॅंकिंग अशा सर्व वित्तीय सेवा देण्यास तिने सुरुवात केली.

हे सर्व करत असताना कोणत्याही उद्योगसमूहाला मदत करायची, योग्य आर्थिक सल्ला द्यायचा हे ते परोपरीने करीत. मागील एका लेखात मॅरिकोचे हर्ष मारीवाला यांना उदय कोटक यांनी मदत केल्याचे याच स्तंभातून लिहिले होते. एशियन पेंट्स या कंपनीच्या प्रवर्तकांना कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी उदय कोटक यांनीच मदतीचा हात पुढे केला. हा मदतीचा हात सर्वांसाठीच तत्पर असतो. कधी सेबीला एखाद्या कमिटीचे चेअरमन म्हणून उदय कोटक यांच्यावर जबाबदारी टाकावीशी वाटते. आयएल ॲण्ड एफएस अडचणीत आली, सरकारने उदय कोटक यांनाच विनंती केली – ‘या कंपनीला आर्थिक संकटातून बाहेर काढा.’ उदय कोटक बिनदिक्कत तयार!

आणखी वाचा- बाजारातील माणसं : शेअर बाजाराचे माजी अध्यक्ष भगीरथ मर्चंट

उद्योग क्षेत्राचे नेतृत्व करणाऱ्या ‘सीआयआय’ या संघटनेच्या प्रमुखपदी फक्त निर्मिती/ उत्पादन क्षेत्रातील उद्योगपतींचीच वर्णी लागत असे; पण वित्तीय सेवा क्षेत्राचीसुद्धा देशाला मोठी गरज आहे म्हणून ‘सीआयआय’लासुद्धा या क्षेत्रातील अध्यक्षपदाची जबाबदारी सर्वात पहिल्यांदा उदय कोटक यांना द्यावी, असे वाटले.

आणखी तीन दिवसांनी उदय कोटक हे वयाची ६४ वर्षे पूर्ण करून ६५ व्या वर्षात पदार्पण करतील. त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांच्या हातून देशाच्या प्रगतीसाठी आणखी हातभार लागो, ही सदिच्छा!

प्रमोद पुराणिक

(लेखक नाशिकस्थित अर्थ-अभ्यासक व गुंतवणूक सल्लागार)

Story img Loader