-प्रमोद पुराणिक

ऑगस्ट १७, १९३६ साली जन्मलेले मार्क मोबियस जगाच्या शेअर बाजारातील एक अवलिया प्रस्थ आहे. ते जर्मन असले तरी त्यांचा जन्म अमेरिकेत झाला. अमेरिकेत जन्म झालेल्या व्यक्तीस अमेरिकी नागरिकत्व मिळते. त्याचे प्रचंड फायदे असतात; परंतु या माणसाने अमेरिकी नागरिकत्व परत केले. जर्मन नागरिकत्व कायम ठेवले.

inflation rate declined
किरकोळ महागाई दराची उसंत, नोव्हेंबरमध्ये ५.४८ टक्क्यांवर घसरण
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
indian stock market nifty sensex
अमेरिकी महागाई दराच्या प्रतीक्षेत निर्देशांकात नगण्य वाढ
25 lakh online fraud of senior citizens in kamothe panvel crime news
कामोठेत जेष्ठाची २५ लाखांची ऑनलाईन फसवणूक
equity funds investment declined
इक्विटी फंडांतील ओघ ओसरला! नोव्हेंबरमध्ये १४ टक्क्यांनी घटून ३५,९४३ कोटींवर
Shani Budh Yuti 2025 astrology
Shani Budh Yuti 2025 : नवीन वर्षात सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींच्या मंडळींचे दार? शनी-बुधाच्या संयोगाने होऊ शकाल लखपती
Gold Silver Price Today 10 December 2024 in Marathi
Gold Silver Rate : सोनं ७७ हजारांच्या पार ! जाणून घ्या, तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचा दर
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?

काय या माणसाचे वैशिष्ट्य? या प्रश्नाचे उत्तर एका वाक्यात देता येणार नाही. या माणसाने ३० वर्षे शेअर बाजारात विकसित होत असलेली उभरती बाजारपेठ शोधली. या बाजारपेठेतल्या प्रत्येक कंपनीचा बारकाईने अभ्यास केला. वेगवेगळ्या शेअर बाजारांत आपले गुंतवणूक कौशल्य वापरून गुंतवणूकदारांचा प्रचंड फायदा करून दिला. त्यांच्या आयुष्यातली महत्त्वाची वर्षे १९८७ ते २०१५ त्यांनी टेम्पलटन म्युच्युअल फंडासाठी दिली. जॉन टेम्पलटनने त्यांना आपल्या म्युच्युअल फंडाचा प्रमुख गुंतवणूक व्यवस्थापक ही जबाबदारी दिली. या जबाबदारीचे अर्थातच त्यांनी सोने केले.

आणखी वाचा-चित्राचित्रातील फरक

संगीत हा श्वास असलेल्या अनेक व्यक्ती ९०, ९५ वय झाले तरी शरीराने आणि मनाने अत्यंत तरुण असतात. खूप नावे सांगता येतील. अगदी आशाताई भोसले हे एक उत्कृष्ट उदाहरण. याच न्यायाने मग भांडवल बाजार ज्याचा श्वास आहे अशा अनेक व्यक्ती आहेत. उदाहरणार्थ, सरलेल्या ३० ऑगस्टला वॉरेन बफे ९३ वर्षांचे झाले. १ जानेवारी २०२४ ला चार्ली मुंगेर १०० वर्षांचे होतील, तर मार्क मोबियस ८७ वर्षांचे आहेत. यामुळे संगीताबरोबरच भांडवल बाजार हेसुद्धा अनेक व्यक्तींचे दीर्घायुषी होण्याचे टॉनिक आहे. मार्क मोबियसचा जन्म न्यूयॉर्कला बोस्टन येथे झाला. त्याने बीए, एमएस कम्युनिकेशन हे शिक्षण घेतले, तर एमआयटीला अर्थशास्त्रातली डॉक्टरेट त्यांनी मिळवली.

या माणसाने प्रथम चीन, जपान, तैवान अशा देशांकडे लक्ष दिले. त्या देशाचा अभ्यास केला. अभ्यास करत असताना या विषयासंबंधी अनेक पुस्तके लिहिली. चीनबरोबरचा व्यापार या विषयावर १९७३ ला पुस्तक लिहिणे हे फार मोठे आव्हान होते. (या वर्षी या पुस्तकाला ५० वर्षे पूर्ण होत आहेत.) १९९४ ला दि इन्व्हेस्टर्स गाईड टू इमर्जिंग मार्केट्स, पासपोर्ट टू प्रॉफिट्स – १९९९, इक्विटीज अँड इंट्रोडक्शन टू दी कोअर कन्सेप्ट्स – २००६, इंट्रोडक्शन टू दी कोअर कन्सेप्ट्स ऑफ म्युच्युअल फंड – २००७, दि लिटल बुक्स ऑफ इमर्जिंग मार्केट अशी त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. “मी अविवाहित आहे, कारण माझे लग्न कामाशी झालेले आहे,” असे तो मोकळेपणाने सांगतो.

आणखी वाचा-नजारा टेकला कामत असोसिएट्सने दिले १०० कोटी रुपये, शेअर्समध्ये १० टक्क्यांनी उसळी

इतर फंड मॅनेजर्सना आणि गुंतवणूकदारांना ते आपल्या पुस्तकांद्वारे मार्गदर्शन करतात आणि जगभर गुंतवणूक विषयावर व्याख्याने देतात. आयुष्य चांगले ठेवण्यासाठी फंड मॅनेजर्सना ते सांगतात – “जास्त ताण घेऊ नका. तर गुंतवणूकदारांना त्यांचे सांगणे हेच की, झटपट पैसा, लाभ मिळविण्याच्या मागे लागू नका. बाजारात चढउतार होत असतात. या चढउतारांना सामोरे जा, बाजार समजून घ्यायचा असेल तर ज्या देशात गुंतवणूक करायची त्या देशातल्या छोट्यामोठ्या गावांत सायकलने फिरा.” वाचकांना आठवत असेल की, जिम रॅाजर्सवर या स्तंभातून लिहिताना (अर्थ वृत्तान्त, २६ जून २०२३), त्यानेसुद्धा हेच सांगितले होते.

एखाद्या देशाला आपल्या देशात जागतिक गुंतवणूक यावी अशी इच्छा असेल तर परदेशी गुंतवणूकदारांना भांडवल आणणे आणि भांडवल परत नेणे हे अत्यंत सोपे व्हायला हवे. चीनबाबत या संबंधाने आलेला कटू अनुभव कोणतीही भिडभाड न ठेवता सांगण्याचे धाडस फक्त आणि फक्त मार्क मोबियसच करू शकतात. त्याच ओघात, अदानी यांच्या कंपन्यांनी आपल्या डोक्यावर प्रचंड कर्ज घेतलेले आहे, असेही सांगायलादेखील मोबियस घाबरत नाहीत. तुलना करू नये; पण काही मुद्दे विचारात घेतले तर वॅारन बफेपेक्षा मार्क मोबियस नक्कीच श्रेष्ठ ठरतात.

आणखी वाचा-बाजारातील माणसे: कक्षा रुंदावत नेणारा अविरत प्रवास… कुमार मंगलम बिर्ला

टेम्पलटनसाठी ३० वर्षे काम केल्यानंतर त्यांनी टेम्पलटनमधून निवृत्ती स्वीकारली, आयुष्यात अनेक मानसन्मान मिळवले. मोबियसवर सहा भाषांमध्ये पुस्तके प्रकाशित झाली आहेत. निवृत्तीनंतर स्वतःची पुन्हा नवीन संस्था स्थापन करणे, पुन्हा जोमाने कामास लागणे हे या माणसाचे आणखी एक अद्वितीय वैशिष्ट्य.

मोबियस कॅपिटल पार्टनर्स एलएलपी या संस्थेची टेम्पलटनमधून निवृत्त झाल्यानंतर मोबियस यांनी स्थापना केली. लिहिणे आणि बोलणे हे मोबियसचे आवडते विषय आहेत. यावरून त्यांना गमतीने अनेक विशेषनामे बहाल करण्यात आलेली आहेत – १) उभरत्या बाजारपेठांची तुतारी वाजविणारा, २) बाजारपेठेचा डीन, ३) नवे जग धुंडाळणारा, ४) वॉल स्ट्रीटवरचा यूल ब्रायनर वगैरे. आपण त्याला गुंतवणूक गुरू अशी पदवी देऊयात. अगदी अलीकडे जून महिन्यातील घडामोड म्हणजे मोबियस त्यांच्या गुणानुसार, शतरंज कॅपिटल पार्टनर्स या संस्थेचा वरिष्ठ सल्लागार बनला. खाद्यपदार्थ, शीतपेय या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणारा आखाती, आफ्रिकी देशांत हा फंड सुरू झाला आहे.

Story img Loader