Share Market Updates Today: शेअर बाजारातील आज (५ मार्च) आलेल्या तेजीमुळे सेन्सेक्स ७४०.३० अंकांनी वधारला असून गुंतवणूकदारांची संपत्ती सुमारे ७.२१ लाख कोटी रुपयांनी वाढून ३९२.२८ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. दरम्यान आज बाजाराचे कामकाज संपले तेव्हा सेन्सेक्स ७४०.३० अंकांनी वाढून ७३,७३०.२३ अंकांवर बंद झाला. निफ्टी निर्देशांक २५४.६५ अंकांनी वधारून २२,३३७.३० अंकांवर बंद झाला. बाजारातील आजच्या तेजीमुळे दलाल स्ट्रीटवरील गुंतवणूकदारांच्या भावना सकारात्मक झाल्याचे दिसत आहे. निफ्टी निर्देशांक गेल्या सलग दहा दिवसांपासून नकारात्म बंद झाला होता आणि आज घसरणीची साखळी तुटण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कॅनडा आणि मेक्सिकोसोबत तडजोड करण्याची घोषणा करण्याची शक्यता असल्याच्या वृत्तांमुळे आज भारतीय बाजारात तेजी आली. याचा अर्थ अमेरिका कॅनडा आणि मेक्सिकोवरील नवा २५ टक्के आयात कर मागे घेण्याची शक्यता आहे, असे सीएनएनने अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांच्या हवाल्याने म्हटले आहे.

आज वधारलेले शेअर्स

अदानी पोर्ट्स, पॉवरग्रिड, एम अँड एम, एनटीपीसी, टेक महिंद्रा, टाटा स्टील, टाटा मोटर्स आणि एचसीएल टेक्नॉलॉजीज यांसारख्या शेअर्सनी सेन्सेक्समध्ये आघाडी घेतली ते ५.३५% पर्यंत वाढले आहेत. सेन्सेक्समधील ३० कंपन्यांपैकी २६ कंपन्यांचे शेअर्स आज सकारात्मक व्यवहार करत होते.

दुसरीकडे बीएसईवर ४८ स्टॉक्सनी आज त्यांचा ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे. तर, १७० स्टॉक्स त्यांच्या ५२ आठवड्यांच्या निचांकी पातळीवर पोहचले आहेत.

बीएसईवर आज व्यवहार झालेल्या ३,९६६ स्टॉक्सपैकी ३१७५ स्टॉक्स सकारात्मक आणि सुमारे ६८९ स्टॉक्स नकारात्मक व्यवहार करत होते. तर, १०२ स्टॉक्स स्थिर होते.

लोअर सर्किट्स, अप्पर सर्किट्स

आज शेअर बाजार तेजीत असतानाही सुमारे १८० स्टॉक्सनी त्यांचा लोअर सर्किट गाठला. दुसरीकडे, बीएसईवरील तेजीच्या वातावरणात २८६ स्टॉक्सनी त्यांची अप्पर सर्किट पातळी गाठली आहे.

काल, मंगळवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ३,४०५ कोटी रुपयांचे स्टॉक्स विकले होते, तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी ४,८५१ कोटी रुपयांचे स्टॉक्स खरेदी केल्याचे, असे एनएसईच्या तात्पुरत्या आकडेवारीतून दिसून आले. मंगळवारी सलग दहाव्या सत्रात निफ्टी निर्देशांक नकारात्मक आकड्यांमध्ये बंद झाला. सेन्सेक्स ९६ अंकांनी घसरून ७२,९८९ वर आणि निफ्टी ३६ अंकांनी घसरून २२,०८२ वर बंद झाला होता.