मंगळवारी शेअर बाजारात उघडताच एरोफ्लेक्स इंडस्ट्रीजच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. IPO उघडल्याच्या दीड तासातच १०१ टक्क्यांपर्यंत सबस्क्राइब झाला आहे. BSE डेटानुसार, सकाळी ११:३५ पर्यंत IPO मध्ये ऑफर केलेल्या २.३२ कोटी शेअर्सच्या तुलनेत २.३३ शेअर्ससाठी बोली प्राप्त झाली होती. गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखून ठेवलेला भागानंही १.५७ पट प्रतिसाद मिळाला आहे. तसेच किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ठेवलेल्या कोट्याला १.३४ पट सबस्क्रिप्शन मिळाले आहे. QIB ने IPO मध्ये ५० टक्क्यांहून अधिक शेअर्स राखून ठेवले आहेत. १५ टक्के NII साठी आणि ३५ टक्के किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव आहेत.
हेही वाचाः अॅक्सिस बँकेचे नीलकंठ मिश्रा यांची UIDAI च्या अर्धवेळ अध्यक्षपदी नियुक्ती
Aeroflex IPO
सार्वजनिक गुंतवणूकदार २२ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट २०२३ पर्यंत Aeroflex IPO साठी बोली लावू शकतात. त्याची किंमत १०२ ते १०८ रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. या IPO चा एक लॉट ४५५० शेअर्सचा असेल. बोली लावण्यासाठी कोणत्याही गुंतवणूकदारांनी किमान एका लॉटसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. एक गुंतवणूकदार जास्तीत जास्त ३५ लॉटसाठी अर्ज करू शकतो.
हेही वाचाः बिल गेट्स यांना भारताची डिजिटल प्रणाली आवडली अन् जगाला कुसुमची ओळख करून दिली; कोण आहे कुसुम?
Aeroflex IPO चा इश्यू साइज किती?
त्याचा इश्यू आकार ३५१ कोटी रुपये आहे. IPO मध्ये १६२ कोटी रुपयांचा नवीन इश्यू आणि १.७५ कोटी शेअर्सचा OFS समाविष्ट आहे. नव्या इश्यूचा वापर कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केला जाणार आहे, असे कंपनीकडून सांगण्यात आले. एरोफ्लेक्सचे मेटॅलिक फ्लेक्सिबल फ्लो सोल्यूशन उत्पादनांची निर्मिती करण्याचे काम करते. देशांतर्गत बाजारात कंपनीची चांगली पकड आहे. कंपनीचे आयओसीएल, बीपीसीएल आणि ओएनजीसी आणि टाटा स्टील, एचएएल यांसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये होल्डिंग आहे.