मंगळवारी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली. खरं तर ही घसरण म्हणजे गेल्या ४ वर्षांतील सर्वाधिक आहे. आज सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी पडझड झाली असून, बाजारातील सततच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे नुकसान होत आहे. शेअर बाजारावरील सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार मूल्य मोठ्या प्रमाणात घसरले. आदल्या दिवशी म्हणजेच सोमवारी शेअर बाजारात वाढ नोंदवण्यात आली होती. बेंचमार्कमध्ये सेन्सेक्स जवळपास ४२०० अंकांनी घसरून ७२,१७४.९० वर पोहोचला, तर निफ्टी ५० इंट्रा डे ट्रेडमध्ये २१,३०० च्या खाली घसरला. बीएसई मिडकॅप ११.८ टक्क्यांनी, तर स्मॉलकॅप १०.३ टक्क्यांनी घसरल्याने शेअर बाजारात मोठे नुकसान झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाजारातील घसरणीबाबत जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार डॉ. व्ही के विजयकुमार सांगतात की, शेअर बाजारात झपाट्याने घसरण होण्याचे कारण म्हणजे आतापर्यंतचे निकाल आहेत. निकाल एक्झिट पोलनुसार लागलेले नसून त्याचा बाजाराला फटका बसला आहे. भाजपाला स्वबळावर बहुमत न मिळाल्यास एनडीएची मोठी अडचण होणार आहे, तर त्याचा परिणाम बाजारावरही दिसून येत आहे.

हेही वाचाः Lok Sabha Election Results 2024 : इंडिया आघाडीने २९५ जागा जिंकल्यास शेअर बाजारावर काय होईल परिणाम?

गुंतवणूकदारांचे पैसे बुडाले

सोमवारी बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांना १५ लाख कोटी रुपयांचा नफा झाला होता. आज त्याच गुंतवणूकदारांचे नुकसान झाले आहे. बीएसईच्या एम कॅपने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ४,२५,९१,५११.५४ कोटी रुपये झाले होते. हे एम कॅप आज ४,००,०३,८३४.५६ कोटी रुपयांवर घसरले आहे. शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे ३९ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

बाजारात मोठी पडझड

शेअर बाजारातील ही घसरण २४ फेब्रुवारी २०२२ नंतरची सर्वात मोठी घसरण आहे. सर्वात मोठी इंट्राडे घसरण २४ फेब्रुवारी २०२२ रोजी झाली होती. अनेक तज्ञांच्या मते, कोविडनंतरची ही सर्वात मोठी घसरण आहे.

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Investors lose rs 39 lakh crore before form new government vrd
Show comments