देशातील सर्वात मोठ्या वैविध्यपूर्ण व्यवसाय समूहांपैकी एक असलेल्या ITC ने ५ ट्रिलियन बाजारमूल्याचा टप्पा ओलांडून उच्चभ्रू गटात सामील होण्याचा मान मिळवला होता. शुक्रवारी या समूहाच्या कंपनीनं आणखी एक विक्रम केला आहे. ITC ने देशातील सर्वात मोठी गृहकर्ज कंपनी असलेल्या एचडीएफसीला मागे टाकून देशातील ७ वी सर्वात मोठी मूल्यवान कंपनी बनण्याचा बहुमान पटकावला आहे. FMCG कंपनीच्या शेअरची किंमत शुक्रवारी ४०५.९० रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एचडीएफसीलाही मागे सोडले

आयटीसीचा शेअर बीएसईवर ५२ आठवड्यांच्या उच्चांकी ४०५.९० रुपयांवर ट्रेडिंग करीत असताना कंपनीचे बाजारमूल्य ५,०४,४५३.२४ कोटी रुपयांवर पोहोचले. दुसरीकडे एचडीएफसीचे शेअर्स ०.१३ टक्क्यांनी वाढून २७४५.५५ रुपये प्रति शेअरवर व्यवहार करीत आहेत. एचडीएफसीचे बाजार भांडवल ५,०३,७९६.७६ कोटी रुपये आहे. ITC च्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ झाल्याने कंपनीला ५ ट्रिलियनच्या बाजारमूल्याच्या क्लबमध्ये प्रवेश करण्यास मदत झाली आहे. एका दिवसापूर्वी आयटीसीचा शेअर NSE वर ४०२.६५ रुपयांच्या आयुष्यातील उच्चांकावर पोहोचला होता. १२ मे २०२२ रोजी कंपनीचे शेअर्स २४९.२० रुपयांच्या आजीवन नीचांकी पातळीवर होते.

हेही वाचाः How to Get Easy Loan : क्रेडिट स्कोअर चांगला नसल्यास कर्ज घेणे होऊ शकते कठीण, ‘हे’ आहेत कर्ज मिळविण्याचे सोपे मार्ग

यंदा शेअर्समध्ये २२ टक्के वाढ झाली

चालू वर्षाबद्दल बोलायचे झाल्यास ITC च्या शेअर्समध्ये सुमारे २२ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअरमध्ये ५६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून कंपनीचा शेअर लाइफ टाइम हायवर पोहोचला आहे. तज्ज्ञांच्या मते, ITC च्या सिगारेट आणि FMCG व्यवसायाने आर्थिक वर्ष २०२४ मध्ये विक्रमी दुहेरी अंकी कमाई वाढीची अपेक्षा केली आहे. ITC शेअर्समध्ये दीर्घकाळ तेजी पाहायला मिळू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

हेही वाचाः Akshay Tritiya 2023 What to buy : अक्षय्य तृतीयेला करा शुभ सुरुवात; ‘या’ ५ गोष्टींमध्ये गुंतवणूक करून मिळवू शकता लाभ

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Itc emerged as the 7th largest company in the country leaving the giant hdfc behind vrd