Jyoti CNC IPO Listing : गुजरातस्थित ज्योती सीएनसी ऑटोमेशन कंपनीचे शेअर्स आज म्हणजेच मंगळवारी शेअर बाजारात सूचिबद्ध झालेत. ज्योती CNC ऑटोमेशनच्या शेअर्समधून पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांनी बंपर नफा कमावला आहे. ज्योती सीएनसी ऑटोमेशनचे शेअर्स ११.८ टक्के प्रीमियमसह ३७० रुपयांवर सूचीबद्ध झाले आहेत. लिस्टिंग झाल्यापासून शेअर्समध्ये बंपर वाढ झाली आहे. NSE वर सूचीबद्ध झाल्यानंतर शेअर्स २४ टक्क्यांहून अधिक वाढीसह ४१० रुपयांवर व्यवहार करीत आहे. शेअर्समध्ये गुंतवणूकदारांची चांगली खरेदी दिसून येत आहे.
हेही वाचाः जगातील ५ अब्जाधीशांची संपत्ती झाली दुप्पट, तर गरिबीत मोठी वाढ; रिपोर्टमधून धक्कादायक खुलासे
विशेष म्हणजे ज्योती सीएनसीच्या आयपीओच्या अर्जाच्या शेवटच्या दिवशी गुंतवणूकदारांच्या सर्व श्रेणींकडून मिळालेल्या भक्कम पाठिंब्यामुळे ३८.४३ पट प्रतिसाद मिळाला होता. ज्योती CNC ऑटोमेशनने IPO द्वारे १ हजार कोटी रुपये उभे केले असून, कंपनीने प्रति शेअर ३१५ ते ३३१ रुपये किमतीचा पट्टा निश्चित केला होता. IPO ९ जानेवारी रोजी अर्जांसाठी खुला होता आणि ११ जानेवारी २०२४ ही IPO साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. तसेच १६ जानेवारीला म्हणजेच आज तो शेअर बाजारात सूचिबद्ध झाला आहे. IPO मध्ये नवीन शेअर्स जारी करून पैसे उभे केले आहेत. IPO मध्ये मिळालेले पैसे कंपनी कर्जाची परतफेड करण्यासाठी खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि कंपनीच्या कामकाजावर खर्च करण्यात येणार आहेत.
हेही वाचाः राम मंदिरामुळे सगळ्यांचाच उद्धार? देशात १ लाख कोटींचा व्यवसाय होणार
ज्योती सीएनसी ऑटोमेशन ही संगणक संख्यात्मक नियंत्रण (कॉम्युटर न्यूमेरिकल कंट्रोल – सीएनसी) मशीनची एक आघाडीची उत्पादक आहे. तिच्या ग्राहकांमध्ये इस्रो, ब्रह्मोस एरोस्पेस तिरुवनंतपुरम लिमिटेड, तुर्की एरोस्पेस, एमबीडीए, युनिपार्ट्स इंडिया, टाटा ऍडव्हान्स सिस्टीम, टाटा सिकोर्स्की एरोस्पेस, भारत फोर्ज, कल्याणी टेक्नोफोर्ज आणि बॉश या आघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. सप्टेंबर २०२३ अखेर कंपनीच्या उत्पादनांसाठी ३,३१५ कोटी रुपयांच्या मागणी नोंदवण्यात आली आहे.