केतन पारेख कृत्रिमरीत्या समभागांचे भाव फुगवत होता. यात प्रामुख्याने पेंट मीडियाच्या शेअरचा भाव १७५ रुपयांवरून २,७०० रुपयांवर नेला आणि ग्लोबल टेलिसिस्टिमदेखील याच भावावरून ३,१०० रुपयांवर नेऊन ठेवला. म्हणजेच कशा प्रकारे शेअरचे भाव वाढवण्यात आले होते, हे तुमच्या लक्षात आलेच असेल. पण लोभाला सीमा नसते हेच खरे. दुसऱ्यांचे पैसे वापरून शेअर बाजारात गुंतवायचे या पद्धतीने केतन पारेख बाजारात पैसे ओतत होता. पुढे पैसे कमी पडू लागल्याने बँकच मदत करू शकते हे त्याने जाणले. म्हणून तो बँकेच्या संचालक मंडळावर जाऊन पोहोचला आणि तिथून कर्ज घेऊन शेअर बाजारात पैसे गुंतवू लागला. कर्ज कसले तोसुद्धा एक घोटाळाच होता. बँकेला पैसे न देताच ‘पे ऑर्डर’ घ्यायची आणि पैसे घेऊन समभागात गुंतवायचे. कंपन्यांच्या प्रवर्तकांकडूनदेखील पैसे उसने घेऊन त्या समभागांचे भाव तो वाढवत असे. यालाच ‘इनसायडर ट्रेडिंग’ असे म्हणतात आणि केतन पारेख मोठ्या प्रमाणात ते करायचा. प्रवर्तकदेखील समभागांचे भाव वाढल्यानंतर त्यावर कर्ज घ्यायचे किंवा आपला थोडासा हिस्सा विकून नफा कमवायचे. सध्या अदानी समूहावर असे आरोप झाले आहेत. समूहातील सूचिबद्ध कंपन्यांच्या समभागांच्या किमती फुगवण्यासाठी परदेशी गुंतवणूकदारांचा हात होता, असा आरोप करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणाची चौकशी अजून पूर्ण व्हायची आहे.

घोटाळा जेव्हा उघडकीला आला तेव्हा बँक ऑफ इंडियाने माधवपुरा बँकेतील ‘पे ऑर्डर’द्वारे घोटाळा झाल्याचे जाहीर केले आणि रिझर्व्ह बँकेनेदेखील चौकशी सुरू केली. त्याच सुमारास सुचेता दलाल यांनी लेखमालिका लिहून घोटाळा उघडकीला आणला. १ मार्च २००० रोजी अर्थसंकल्पानंतर बाजारात चिंतेचे वातावरण होते आणि त्याची परिणती बाजार कोसळण्यात झाली. सरकारला भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ आणि सीबीआयद्वारे चौकशी करण्याची संधी मिळाली. संयुक्त संसदीय समितीनेसुद्धा याची चौकशी केली. यात समावेश असणाऱ्या ग्लोबल ट्रस्ट बँकेचे पुढे ओरिएंटल बँकेने अधिग्रहण केले आणि माधवपुरा मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक २०१२ मध्ये अखेरीस बुडाली. यात गुंतवणूकदारांचे बरेच नुकसान झाले. कारण जेवढ्या ठेवी बँकेकडे होत्या त्यापेक्षा कितीतरी अधिक बुडीत कर्ज बँकेने केतन पारेखला दिले होते.

David Shaw has used concept of quant when managing assets of his investors
बाजारातली माणसं : हेज फंड बाजारातली एक रहस्यकथा – डेव्हीड शॉ
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Jeevan pramaan online process
Money Mantra: हयातीचा दाखला ऑनलाईन मिळवण्यासाठी जीवन प्रमाण सुविधा काय आहे?
hearing in bombay high court after two years in pmc bank scam
पीएमसी बँक घोटाळ्यात दोन वर्षांनंतर आज सुनावणी
loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…
readers comments on Loksatta editorial,
लोकमानस : अर्थव्यवस्थेत वाढ, मग रुपयाची घसरण का?
indian rupee falls to all time low against us dollar
अग्रलेख : काका… मला वाचवा!
public banks profit increase by 26 percent in first half fy 25
सरकारी बँकांच्या नफ्यात सहामाहीत २६ टक्के वाढ

हेही वाचा : Money Mantra : केतन पारेख घोटाळा (भाग १)

केतन पारेखला विविध गुन्ह्यांमध्ये शिक्षा झाल्या आणि २०१७ पर्यंत त्याच्यावर शेअर बाजारात व्यवहार करण्यावर बंदी घालण्यात आली. काही कंपन्यांद्वारे केतन पारेख बाजारात गुंतवणूक करत आहे, असे सेबीला वाटल्याने २००९ मध्ये त्याच्याशी संबंधित २६ कंपन्यांवर बंदी घातली गेली. वर्ष २०१४ मध्ये सीबीआय न्यायालयामध्ये २ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. डिस्नी हॉटस्टारवर यासंबंधित ‘मनी माफिया’ नावाची वेबसिरीजसुद्धा आली तर सुचेता दलाल यांच्या ‘द स्कॅम’ या पुस्तकात अजून अधिक माहिती मिळेल. सेबीने हा घोटाळा उघडकीला आल्यावर सूचिबद्धतेच्या नियमांच्या ‘४९ व्या’ खंडात बरेच बदल केले आणि त्याला अधिक सक्षम करण्यात आले. ‘तो सध्या काय करतो’ याची फारशी माहिती उपलबध नाही.

@AshishThatte
ashishpthatte@gmail.com
लेखक कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट म्हणून कार्यरत आहेत.