आशीष ठाकूर

सूर्योदय म्हणजे आशा, उमेद, उत्साहाने भरलेली ओतप्रोत सकाळ. हे सर्व प्रत्यक्षात आले तर ‘आज अपना दिन बन गया’ अन्यथा त्या उत्साहावर, उमेदीवर पाणी फिरले, तर हताश होत मावळत्या सूर्याला साक्ष ठेवत ‘अपना भी टाइम आयेगा’ असे म्हणत सूर्यास्ताची प्रतीक्षा करत राहणे घडून येईल. आज तसेच काहीसे निफ्टीच्या बाबतीत घडत आहे. निफ्टी अशा वळणबिंदूवर उभी आहे की, इथून तेजीचा सूर्योदय झाला तर किमान हजार अंशांची तेजी अथवा तेजीचा सूर्यास्त झाला तर हजार अंशांची मंदी पक्की. थोडक्यात, हजार अंशांच्या वाटचालीची दोन हुबेहूब चित्रे आलेली आहेत, एकदा का दिशा कळली की ‘अपना भी टाइम आयेगा,’ असे म्हणायला हरकत नाही. या पार्श्वभूमीवर या आठवडयाच्या वाटचालीकडे वळू या.

**Why does the Earth appear flat despite being round?**
Why Earth Looks Flat:पृथ्वी गोल असूनही ती सपाट कशामुळे दिसते?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
shani surya gochar 2024 saturn Vakri and sun transit in vrishchik
सूर्य आणि शनि बदलणार आपली चाल, ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब पलटणार, विलासी जीवनासह मिळेल अपार पैसा
14th November Daily Astrology in Marathi
१४ नोव्हेंबर पंचांग: वैकुंठ चतुर्दशीला मेष ते मीनपैकी कोणाच्या डोक्यावर असेल श्रीहरी व महादेवाचे कृपाछत्र; वाचा तुमचे राशिभविष्य
13th November Daily Rashibhavishya In Marathi
तुळशी विवाह, १३ नोव्हेंबर पंचांग: रेवती नक्षत्रात लागेल सुखाची चाहूल; प्रेम, व्यवसायासाठी पाहिलेलं स्वप्न होईल पूर्ण; वाचा तुमचे राशिभविष्य
Sun Planet Transit In Scorpio
५ दिवसांनंतर सुर्य करणार मंगळाच्या घरात प्रवेश, या राशींचे सुरु होणार चांगले दिवस, प्रत्येक कामात मिळणार यश!
Daily Horoscope 12th November 2024 in Marathi
१२ नोव्हेंबर पंचांग: देवउठनी एकादशीला १२ पैकी ‘या’ राशींच्या जीवनात होतील मोठे बदल; कोणाला पावणार भगवान विष्णू देव? वाचा तुमचे राशिभविष्य

शुक्रवारचा बंद भाव:

सेन्सेक्स – ६६,५९८,९१
निफ्टी – १९,८१९.९५

या स्तंभातील मागील म्हणजे २८ ऑगस्टच्या लेखातील वाक्य होते… “येणाऱ्या दिवसांत निफ्टी निर्देशांकाच्या सुधारणेत प्रथम अडथळा १९,५०० असेल. हा स्तर पार करण्यास निर्देशांक वारंवार अपयशी ठरल्यास निफ्टी निर्देशांकाचे प्रथम खालचे लक्ष्य १९,२५० असेल. या स्तराचा आधार घेत होणाऱ्या सुधारणेत निफ्टी निर्देशांक पुन्हा १९,५०० ते १९,७०० पर्यंत झेपावेल.” गेल्या लेखातील वाक्य काळाच्या कसोटीवर तपासता निफ्टी निर्देशांकाने २४ ऑगस्टला १९,५८४ चा उच्चांक मारत, घसरण सुरू झाली आणि ३१ ऑगस्टला १९,२२३ स्तराचा आधार घेत, निफ्टी निर्देशांकावर पुन्हा सुधारणा होत, १९,८०० चा स्तर दृष्टिपथात आला आहे. अशा रीतीने निफ्टी निर्देशांकाने १९,२५० च्या नीचांकापासून १९,८०० च्या सुधारणेपर्यंतचे, तेजी-मंदीचे एक आवर्तन सरलेल्या सप्ताहात पूर्ण केले. येणाऱ्या दिवसांत निफ्टी निर्देशांक १९,८०० च्या वर सातत्याने दहा दिवस टिकल्यास निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य २०,००० ते २०,३०० असेल. या लेखात वर उल्लेख केल्याप्रमाणे ‘हजार अंशांच्या वाटचालीची दोन हुबेहूब चित्रे आलेली आहेत’ या विधानाचे आता आपण तपशीलवार विवेचन करू या.

आणखी वाचा-SRK चा ‘जवान’ रिलीज होण्याच्या पार्श्वभूमीवर PVR INOX चा शेअर वाढला, उद्योगविश्वाचे चित्रपटाच्या प्रदर्शनाकडे लक्ष

तेजीच्या १,००० अंशांची वाटचाल :

येणाऱ्या दिवसांत निफ्टी निर्देशांकांवर १९,५०० हा ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ डोळ्यासमोर ठेवून भविष्यकालीन तेजी-मंदीचे आलेखन करू या. आताच्या घडीला निफ्टी निर्देशांक सातत्याने १९,८०० चा स्तर राखत असल्याने निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य हे २०,००० ते २०,१०० असेल. या स्तरावरून एक घसरण अपेक्षित असून निफ्टी निर्देशांकाचे खालचे लक्ष्य अनुक्रमे १९,८००, १९,५००, १९,२५० असेल. या तेजीची कमान ही १९,००० या स्तरावर आधारलेली असून एखाद्या हलक्याफुलक्या घसरणीत १९,००० चा स्तर सातत्याने राखल्यास १९,५०० अधिक १,००० अंश २०,५०० हे निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य असेल.

मंदीचा आलेख :

निफ्टी निर्देशांकावर २०,०००-२०,१०० च्या स्तरावरून एक घसरण अपेक्षित असून, या हलक्याफुलक्या घसरणीत निफ्टी निर्देशांकाचे खालचे लक्ष्य १९,५०० ते १९,२५० असेल. या घसरणीत निफ्टी निर्देशांकाने १९,००० चा स्तर राखणे नितांत गरजेचे आहे. अन्यथा १९,५०० उणे १,००० अंश १८,५०० हे निफ्टी निर्देशांकाचे खालचे लक्ष्य असेल.

दीर्घ मुदतीच्या तेजीचे गृहीतक : भाग-४

गेल्या लेखात नमूद केल्याप्रमाणे- १) लोकसभेच्या निवडणुकांनंतर येतो बाजारात तेजीचा बहार. २) आठ वर्षांचे निर्देशांकावर उच्चांक अथवा नीचांक साध्य होण्याचे चक्र… ही दोन्ही गृहीतके ‘कपिलाषष्ठी’च्या योगाप्रमाणे बरोबर २०२४ साली येत आहेत. त्यासाठी आपण आलेखावर निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य काढण्यासाठी तांत्रिक विश्लेषण शास्त्रातील ‘इनव्हर्स हेड ॲण्ड शोल्डर’ प्रमेयाचा आधार घेणार आहोत.

आणखी वाचा-नजारा टेकला कामत असोसिएट्सने दिले १०० कोटी रुपये, शेअर्समध्ये १० टक्क्यांनी उसळी

प्रथम आपण साध्या, सोप्या उदाहरणावरून ‘इनव्हर्स हेड ॲण्ड शोल्डर’ प्रमेय समजून घेऊ या. समजा, एखादा समभाग ५० रुपयांच्या नीचांकापासून १०० रुपयांच्या उच्चांकापर्यंत जाऊन, सद्य:स्थितीतील भाव ७५ रुपये आहे, तर या समभागाचे भविष्यकालीन वरचे लक्ष्य काय असेल? शालेय गणिताचा आधार घेता प्रथम १०० रुपयांचा उच्चांक आणि ५० रुपयांच्या नीचांकातील फरक हा ५० रुपये येतो. ५० रुपयांचे अर्धे २५ रुपये. हे २५ रुपये ५० रुपयांच्या नीचांकात मिळवले असता ७५ रुपये मध्यबिंदू येतो. आता वरचे लक्ष्य काढण्यासाठी या मध्यबिंदूत ७५ रुपयांत ५० रुपये (उच्चांक १०० रु. आणि ५० रुपयांच्या नीचांकातील फरक – ५० रु.) मिळवले असता रु. १२५ हे वरचे लक्ष्य येते. हीच आकडेमोड डोळ्यासमोर ठेवत निफ्टी निर्देशांकावरील १ डिसेंबर २०२२ चा उच्चांक १८,८८७ आणि १७ जून २०२२ चा नीचांक १५,१८३, हे उच्चांक आणि नीचांक घेऊन ते ‘इनव्हर्स हेड ॲण्ड शोल्डर’ प्रमेयाचा आधार घेत भविष्यकालीन निफ्टी निर्देशांकाचे २०,५०० चे वरचे लक्ष्य येते, ज्याचे पुढील लेखात आलेखन करू या.

(क्रमशः)