भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीने गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी टेक महिंद्रमधील हिस्सेदारीत वाढवत नेली आहे. आता एलआयसीकडे टेक महिंद्रच्या ८.६५ कोटी समभागांची मालकी आहे. याआधी एलआयसीच्या ताब्यात ६.६९ कोटी समभाग होते. परिणामी या कंपनीतील तिचा भागभांडवली हिस्साही ६.८६ टक्क्यांवरून ८.८८ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
२१ नोव्हेंबर २०२२ ते ६ जून २०२३ या कालावधीत टेक महिंद्रमधील तिच्या हिस्सेदारीत २.०१ टक्के वाढ झाली असून ही समभाग खरेदी प्रत्येकी सरासरी १,०५०.७७ रुपये किमतीने केली गेली आहे. मुंबई शेअर बाजारात टेक महिंद्रचा समभाग ०.९ टक्क्यांनी वधारून १,०९५.६५ पातळीवर बंद झाला. २०२३ सालाच्या सुरुवातीपासून तो सुमारे ८ टक्क्यांनी घसरला आहे.
हेही वाचाः रिझर्व्ह बँकेच्या सुवर्णसाठ्यात ५ वर्षांत ४० टक्के वाढ; ‘इतके’ टन सोने केले खरेदी
१.९ कोटी शेअर्सचा हा करार सरासरी १,०५०.७७ रुपये/शेअर (सुमारे २००० कोटी रुपये) या दराने झाला आहे. एलआयसीने २१ नोव्हेंबर २०२२ ते ६ जून २०२३ दरम्यान खुल्या बाजारातून ही हिस्सेदारी वाढवली आहे. या करारानंतर टेक महिंद्रातील एलआयसीच्या शेअर्सचे मूल्य ९,४११.४१ कोटी रुपये झाले आहे.
हेही वाचाः २ हजार रुपयांच्या १.८० लाख कोटी रुपये मूल्याच्या नोटांची बँकवापसी – आरबीआय
टेक महिंद्रा ही दुसरी भारतीय आयटी कंपनी आहे, ज्यामध्ये LIC चा शेअर्सच्या स्वरूपात पैसा आहे. फाइलिंगनुसार, ३१ मार्चपर्यंत LIC ची Mphasis मध्ये ४.५८% हिस्सेदारी आहे. एलआयसीने सांगितले की, आर्थिक वर्ष २०२३ च्या अखेरीस त्यांची ९६ सूचीबद्ध कंपन्यांमध्ये एकूण १.६६ लाख कोटींची गुंतवणूक आहे. टेक महिंद्रातील ही गुंतवणूक अशा वेळी झाली आहे, जेव्हा कोरोनामुळे आर्थिक वर्ष २०२४ च्या पहिल्या सहामाहीत थंड कामगिरी होण्याची शक्यता आहे. वाढीच्या मंद गतीमुळे चौथ्या तिमाहीतही उत्पन्न स्थिर राहिले आणि नफ्यात घट झाली.