Sensex Nifty Today | Share Market Highlights 27 Feb: गेल्या काही महिन्यांपासून सतत घसरत असलेला भारतीय शेअर बाजार आज सलग दुसऱ्या दिवशी तेजीत दिसत आहे. गुरुवारी प्रमुख भारतीय शेअर बाजार निर्देशांकांनी तेजी दाखवली असून, निफ्टी ५०, ३१ अंकांनी किंवा ०.१४% ने वाढून २२,५७८ वर, बीएसई सेन्सेक्स १०३ अंकांनी किंवा ०.१४% ने वाढून ७४,७०५.९५ वर आणि बँक निफ्टी १६३ अंकांनी किंवा ०.३४% ने वाढून ४८,७७१.५५ वर उघडला. निफ्टी ५० मध्ये श्रीराम फायनान्स, इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, जेएसडब्ल्यू स्टील आणि बजाज फिनसर्व्ह हे सर्वाधिक वाढणारे शेअर्स होते.

फेब्रुवारी सिरीज एक्सपायरीमध्ये बाजार एका विशिष्ट श्रेणीत व्यवहार करताना दिसला. याचबरोबर सेन्सेक्स आणि निफ्टी स्थिर स्थितीत बंद झाले. मात्र, मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. आजच्या व्यवहारात रिअल्टी, ऑटो आणि एनर्जी शेअर्समध्ये विक्री झाली असून, पीएसई, एफएमसीजी स्टॉक्समध्ये घसरण झाली आहे. मेटल, निफ्टी बँक निर्देशांक किंचित वाढीसह बंद झाले. तर, केबल आणि वायर क्षेत्रात मोठी विक्री दिसून आली.

बीएसई मिडकॅप निर्देशांक १ टक्क्यांनी घसरून बंद झाला, तर स्मॉलकॅप निर्देशांक २ टक्क्यांनी घसरून बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स १०.३१ अंकांनी किंवा ०.०१ टक्क्यांनी वाढीसह ७४,६१२.४३ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी २.५० अंकांनी किंवा ०.०१ टक्क्यांनी घसरून २२,५४५.०५ वर बंद झाला.

या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून भारतीय बाजारातील लाईव्ह अपडेट्स, चर्चेत असणारे प्रमुख स्टॉक्स आणि बाजाराशी संबंधित अपडेट्स जाणून घेऊया.

Sensex, Nifty 50, Bank Nifty Live Updates:

Live Updates
13:52 (IST) 27 Feb 2025

Share Market Live Updates: मिडकॅप, स्मॉलकॅप निर्देशांक घसरले

भारतीय शेअर बाजारात आज, बीएसई मिडकॅप निर्देशांक १% ने घसरला, तर स्मॉलकॅप निर्देशांक जवळजवळ २% ने घसरला. दुसरीकडे श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, इंडसइंड बँक आणि हिंडाल्को हे निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढलेले शेअर्स होते.

13:15 (IST) 27 Feb 2025
Share Market Live Updates: अल्ट्राटेकच्या घोषणेनंतर पॉलीकॅब, हॅवेल्स, केईआयचे शेअर्स २१% पर्यंत घसरले

गुरुवारी, २७ फेब्रुवारी रोजी पॉलीकॅब लिमिटेड, हॅवेल्स इंडिया लिमिटेड, केईआय इंडस्ट्रीज लिमिटेड, आरआर काबेल लिमिटेड आणि फिनोलेक्स केबल्स लिमिटेड सारख्या वायर्स आणि केबल स्टॉकमध्ये २१% पर्यंत घसरण झाली आहे. भारतातील सर्वात मोठी सिमेंट कंपनी, अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडने नुकतेच ते या क्षेत्रातही उतरणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर ही घसरण झाली आहे.

12:44 (IST) 27 Feb 2025

Share Market Live Updates: दुपारपर्यंत श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह तेजीत

भारतीय शेअर बाजारात आज दुपारपर्यंत निफ्टी ५० मध्ये श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, इंडसइंड बँक आणि एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. तर अल्ट्राटेक सिमेंट, ग्रासिम इंडस्ट्रीज, एम अँड एम, ग्रासिम इंडस्ट्रीज, एम अँड एम, हिरो मोटोकॉर्प आणि ट्रेंट या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

12:02 (IST) 27 Feb 2025

Share Market Live Updates: १० वर्षांत पहिल्यांदाच नफा तरीही 'या' विमान कंपनीच्या शेअर्सची किंमत घसरली

स्पाइसजेट कंपनीने तिसऱ्या तिमाहीत २६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला असूनही, कंपनीच्या शेअर्सची किंमत ४% पेक्षा जास्त घसरली आहे. खरं तर, ब्रोकरेज हाऊस नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने स्पाइसजेटची टार्गेट प्राइज १४% ने कमी करून ५२ रुपये केली आहे.

11:31 (IST) 27 Feb 2025

Share Market Live Updates: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ घोषणेमुळे रुपया घसरला

अमेरिकेने केलेल्या टॅरिफ घोषणांमुळे गुरुवारी शेअर बाजाराच्या सुरुवातीलाच रुपयासह प्रमुख चलनांवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. अमेरिकेने केलेल्या ताज्या टॅरिफ घोषणांमुळे जागतिक बाजारपेठांना धक्का बसला असून, डॉलर मजबूत झाला आहे. आंतरबँक परकीय चलन बाजारात, रुपया ८७.२६ वर उघडला, नंतर अमेरिकन चलनाच्या तुलनेत ८७.४१ वर घसरला. मंगळवारी, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ४७ पैशांनी घसरून ८७.१९ वर स्थिरावला होता. बुधवारी, महाशिवरात्रीनिमित्त इक्विटी, फॉरेक्स, कमोडिटी बाजार बंद होते.

10:58 (IST) 27 Feb 2025

Share Market Live Updates: केबल आणि वायर मार्केटमध्ये अल्ट्राटेकचा प्रवेश, शेअर पाच टक्क्यांनी घसरला

अल्ट्राटेक सिमेंटने केबल आणि वायर उद्योगात प्रवेश करण्याची योजना जाहीर केली आहे. त्यानंतर, अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअरची किंमत ५.३% ने घसरून दिवसाच्या नीचांकी पातळीवर १०,३८१ रुपयांवर आली आहे.

10:35 (IST) 27 Feb 2025

RBI च्या निर्णयामुळे लहान बँका आणि एनबीएफसी शेअर्सना बूस्ट

आरबीआयने जोखीम भार कमी केल्यामुळे बँकिंग आणि एनबीएफसी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. बंधन बँकेचा शेअर सर्वाधिक ७% वाढला असून, आरबीआय बँक देखील ४% वाढून व्यवहार करत आहे. एनबीएफसीमध्ये, एल अँड टी फायनान्स, चोला आणि श्रीराम फायनान्स ४ ते ५% वाढले आहेत.

10:14 (IST) 27 Feb 2025

Share Market Live Updates: सोन्याच्या किमतीत घसरण

गुरुवारी सकाळी देशांतर्गत वायदा बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण झाली, अमेरिकन डॉलरची मजबूती आणि वाढत्या बाँड उत्पन्नामुळे सोन्याच्या किमती घसरल्या आहेत. गुडरिटर्न्सच्या मते, आज २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ८,७८१ रुपये आहे, तर २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ८,०४९ रुपये आहे. २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ८०,४९० रुपये आहे, तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ८७,८१० रुपये आहे. दरम्यान, १८ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ६,५८६ रुपये आहे, तर १० ग्रॅमची किंमत ६५,८६० रुपये आहे.

09:57 (IST) 27 Feb 2025

Share Market Live Updates: २०२५ मध्ये आतापर्यंत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ३.८८ लाख कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री

“आर्थिक वर्ष २०२५ मध्ये, आतापर्यंत, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) रोख बाजारात ३,८७,९७६ कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत. विशेष म्हणजे, डीआयआयने ५,५५,५१९ कोटी रुपयांची खरेदी करून या विक्रीपेक्षा जास्त भरपाई केली आहे. असे असूनही, बाजार खाली घसरत आहे. यासह विविध घटकांमुळे बाजारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. जीडीपी वाढ आणि कॉर्पोरेट कमाईतील चक्रीय मंदीमुळे बाजारतील मूलभूत तत्त्वे बिघडत आहेत,” असे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक धोरणकार डॉ. व्ही के विजयकुमार म्हणाले. याबाबत फायनान्शिअल एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.

09:50 (IST) 27 Feb 2025

Share Market Live Updates: इंडसइंड बँक, बजाज फायनान्स तेजीत तर अल्ट्राटेक सिमेंट, पॉवरग्रिड, कोटक बँकमध्ये घसरण

आज शेअर बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्समधील सर्वाधिक वाढ झालेल्या कंपन्यांमध्ये इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, टाटा स्टील आणि एचडीएफसी बँक यांचा समावेश होता. दुसरीकडे, अल्ट्राटेक सिमेंट, पॉवरग्रिड, कोटक बँक आणि टेक महिंद्रा या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.

निफ्टी ५० मध्ये, पाच प्रमुख वाढ नोदंवणाऱ्या कंपन्यांमध्ये श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्स, जेएसडब्ल्यू स्टील, इंडसइंड बँक आणि बजाज फिनसर्व्ह होते, तर अल्ट्राटेक सिमेंट, ग्रासिम, बजाज ऑटो, ट्रेंट आणि हिरो मोटोकॉर्प कंपनीचे शेअर्स सर्वाधिक घसरलेले होते.