सरलेल्या सप्ताहातील सोमवारच्या सत्रात, एक्झिट पोलमधील भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमताच्या अंदाजांनी, निफ्टी पूर्णपणे तेजीच्या भरात – ‘तू तेव्हा तशी’ तर दुसऱ्याच दिवशी प्रत्यक्ष निकालांवर २,००० अंशांच्या घसरणीमुळे ‘तू तेव्हा अशी’ अशा तेजी-मंदीचा भीतीदायक खेळ आपण अनुभवला. अगोदरच्या लेखात नमूद केलेले तेजीचे वरचे लक्ष्य २३,१००, तर मंदीचे २१,२०० चे खालचे लक्ष्य निफ्टीने अवघ्या दोन दिवसांत साध्य केले. तेही आपल्या भोवती तेजी-मंदीची गिरकी घेत तिने पूर्ण केले. या पार्श्वभूमीवर या आठवड्याच्या वाटचालीकडे वळू या.
शुक्रवारचा बंद भाव:

सेन्सेक्स: ७६,६९३.३६ / निफ्टी: २३,२९०.१५
या स्तंभातील गेल्या लेखात, निवडणुकांच्या निकालांचे पडसाद निर्देशांकाच्या वाटचालीवर तीन प्रकारच्या शक्यतांतून वर्तवण्यात आले होते.

inflation rate declined
किरकोळ महागाई दराची उसंत, नोव्हेंबरमध्ये ५.४८ टक्क्यांवर घसरण
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
amazon 15 minutes delivery
ॲमेझॉन आता ब्लिंकइट, झेप्टोला टक्कर देणार, १५ मिनिटांत वस्तू घरपोच मिळणार; कंपन्या क्विक कॉमर्स क्षेत्रात प्रवेश करण्यास उत्सुक का?
indian stock market nifty sensex
अमेरिकी महागाई दराच्या प्रतीक्षेत निर्देशांकात नगण्य वाढ
Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
loksatta money motra article Growth and Value strategy
तुमची रणनीती काय? ‘ग्रोथ की व्हॅल्यू’
RBI
अग्रलेख: दोन पुढे, चार मागे!

शक्यता १ – आता सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला, नरेन्द्र मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा पूर्ण बहुमत मिळाल्यास निफ्टी निर्देशांक २३,४०० ते २३,७०० च्या उच्चांकाला गवसणी घालणार.

हेही वाचा : माझा पोर्टफोलियो – घराच्या नेटकेपणाची जागतिक नाममुद्रा

शक्यता २ त्रिशंकू स्थिती – निफ्टी निर्देशांकाच्या तेजीच्या वाटचालीला कलाटणी मिळत निफ्टी निर्देशांक २१,३०० ते २०,५०० पर्यंत घसरेल.

तिसऱ्या शक्यतेची स्थिती निर्माणच झाली नाही. निर्देशांकाच्या वाटचालीतील पहिल्या दोन्ही शक्यता सरलेल्या सप्ताहातील ३ व ४ जूनला प्रत्यक्षात आल्या. सोमवारच्या सत्रात, एक्झिट पोलमधील भारतीय जनता पक्षाला मागील खेपेपेक्षा अधिक दणदणीत बहुमताच्या अंदाजांवर निफ्टीने २३,३३८चा ऐतिहासिक उच्चांक नोंदवला, तर ४ जूनच्या प्रत्यक्ष मतमोजणीत स्वबळावर सत्तेचा आकडा भाजप गाठू शकत नाही, हे जाणवल्यावर दुसरी शक्यता तात्पुरती प्रत्यक्षात येत निफ्टी निर्देशांक २१,२८१ पर्यंत घसरत तेजी-मंदीचे एक आवर्तन त्याने पूर्ण केले.

आताच्या घडीला निफ्टी निर्देशांकावर २२,८५० ते २२,५५० असा ३०० अंशांच्या परिघाला ‘अनन्यसाधारण’ महत्त्व असणार आहे. निफ्टी निर्देशांक २२,८५० च्या स्तरावर सातत्याने पाच दिवस टिकल्यास निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य अनुक्रमे २३,४५०, २३,७५० ते २४,३५० असेल. निफ्टी निर्देशांक २२,५५०च्या खाली सातत्याने पाच दिवस टिकल्यास निफ्टी निर्देशांकाचे खालचे लक्ष्य २२,२५०, २१,९५० ते २१,७०० असेल.

शिंपल्यातील मोती

मॅनकाईंड फार्मा लिमिटेड

(शुक्रवार, ७ जून भाव – २,१२७.५० रु.)

आपल्या उत्पादनातून ज्यात मधुमेह, रक्तदाब, तसेच हृदयरोगावरील औषधे आणि हेल्थ ओके सारखी शक्तिवर्धक तर आहेतच पण नवविवाहित वधूच्या हृदयातील एका कप्यातील ‘त्या गोड बातमीची’ खात्री करून देण्यासाठी ‘प्रेगा न्यूज’ही आहे. अशा विविध उत्पादनातून व आपल्या नावातून मानवतेची सेवा, शुश्रूषा करणारी रमेश जुनेजा, राजीव जुनेजा व शीतल अरोरा यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेली ‘मॅनकाईंड फार्मा लिमिटेड’ कंपनीचा समभाग हा आपला आजचा ‘शिंपल्यातील मोती’ असणार आहे.

हेही वाचा : बाजारातली माणसं : डेव्हिड सोलोमन- वाहक… समृद्धी अन् मंदीचेही!

आर्थिक आघाडीवर, दोन आर्थिक वर्षातील जानेवारी ते मार्च तिमाहीतील तुलनात्मक आढावा घेतल्यास विक्री १,८७२.१२ कोटींवरून २,१५२,६९ कोटी, करपूर्व नफा ३५५.४३ कोटींवरून ५४४.८६ कोटी तर निव्वळ नफा २८०.९९ कोटींवरून ४५४.१७ कोटी झाला आहे. समभागाचे आलेख वाचन करता समभागाने आपल्याभोवती २५० रुपयांचा परीघ निर्माण केलेला आहे. जसे की १,९३० अधिक २५० रुपये २,१८०, २,४३० असे. मॅनकाईंड फार्मा लिमिटेड या समभागाचा बाजारभाव सातत्याने २,२५० रुपयांच्यावर पंधरा दिवस टिकल्यास समभागाचे अल्पमुदतीचे वरचे लक्ष्य हे २५०० ते २,७५० रुपये, तर दीर्घमुदतीचे वरचे लक्ष्य हे ३,००० ते ३,२५० रुपये असेल. भविष्यातील बाजारातील व समभागातील घसरणीत हा समभाग २,०५० ते १,९५० रुपयांदरम्यान प्रत्येक घसरणीत २० टक्क्यांच्या पाच तुकडयांत खरेदी करावा. मॅनकाईंड फार्मा लिमिटेड या समभागामधील दीर्घमुदतीच्या गुंतवणुकीला १,८०० रुपयांचा ‘स्टॉप लॉस’ ठेवावा.

महत्त्वाची सूचना : वरील समभागात लेखकाची स्वतःची अथवा जवळच्या नातेवाईकांची गुंतवणूक नाही. वरील समभागाचे तटस्थ दृष्टीने परीक्षण करून ते वाचकांना सादर केलेलं आहे.

चिकित्सा ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ या संकल्पनेची

जेव्हा बाजारात अभूतपूर्व घुसळण असताना, घातक चढ-उतारात वाचकांसाठी विकसित केलेली ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ ही संकल्पना काळाच्या कसोटीवर उतरली का, याचे कठोर परीक्षण होण्याची गरज आहे. आर्थिक क्षेत्रात कंपन्यांचे तिमाही वित्तीय निकाल हे महत्त्वाचे ‘वळणबिंदू’ असतात. अशा वेळेला गुंतवणूकदारांना आर्थिक सजग ठेवण्यासाठी वाचकांसाठी निकालपूर्व विश्लेषणातील ‘निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ ही संकल्पना विकसित केली. प्रत्यक्ष निकालानंतर समभागाचा बाजारभाव ‘महत्त्वाच्या केंद्रबिंदू स्तरा’वर पाच दिवस टिकल्यास, जाहीर झालेला निकाल चांगला, तो समभाग राखून ठेवावा. लेखात नमूद केलेले वरचे लक्ष्य साध्य झाल्यावर अत्यल्प मुदतीची गुंतवणूक धारणा असलेल्या गुंतवणूकदारांनी नफारूपी विक्री करून नफा पदरात पाडून घ्यावा. थोडक्यात प्रथितयश कंपन्यांचे समभाग वरच्या भावात विकून पुन्हा समभाग खाली स्वस्तात खरेदी करून आपला समभाग संच पूर्ववत ठेवायचा असे हे सूत्र.

हेही वाचा : ‘सेन्सेक्स’ची विक्रमी ७७,०००च्या दिशेने कूच, अर्थव्यवस्थेबाबत रिझर्व्ह बँकेच्या आशावादाचे उत्सवी पडसाद

या स्तंभातील २२ एप्रिलच्या लेखात ‘एसीसी लिमिटेड’ या समभागाचे निकालपूर्व विश्लेषण केलेले. तिमाही वित्तीय निकालाची नियोजित तारीख २५ एप्रिल होती. १९ एप्रिलचा बंद भाव २,४०६ रुपये होता. निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर २,३५० रुपये होता. जाहीर होणारा तिमाही वित्तीय निकाल उत्कृष्ट असल्यास २,३५० रुपयांचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर राखत २,६५० रुपयांचे वरचे लक्ष्य नमूद केलेले जे समभागाने २४ मेला २,६६२ चा उच्चांक मारत साध्य केले. अल्पमुदतीच्या गुंतवणूकदारांना १० टक्क्यांचा परतावादेखील त्याने दिला. अत्यल्प मुदतीची गुंतवणूक धारणा असलेल्या गुंतवणूकदारांनी इथे नफारूपी विक्री केल्यावर, पुन्हा एसीसी समभागाची मंदीत फेरखरेदी कुठल्या स्तरावर करायची त्यासाठी निराशादायक निकाल आल्यास एसीसी हा समभाग २,१५० रुपयांपर्यंत खाली घसरू शकतो या परीक्षणाचा आधार घ्यायचा.

गेल्या सहा महिन्यांतील निर्देशांकावरील घातक चढ-उतारांचा दिवस म्हणून ३ आणि ४ जूनची गणना करावी लागेल. या दोन दिवसांतील एसीसीची वाटचाल पाहता ३ जूनच्या हर्षोल्हासात एसीसी लिमिटेड २,६५० रुपयांच्या वरच्या लक्ष्यासमीप म्हणजेच २,६८२ रुपयांवर (३ जूनचा बंद भाव) गेला. तर ४ जूनच्या रक्तपातात एसीसी लिमिटेड २,१५० रुपयांच्या नीचांकी स्तरावर घसरला. आता अत्यल्प मुदतीची गुंतवणूक धारणा असलेल्या गुंतवणूकदारांनी एकदा का एसीसी २,६५० रुपयांना नफारूपी विक्री केली की, एसीसी पुन्हा स्वस्तात २,१५० रुपयांना फेरखरेदी करून आपला समभाग संच पूर्ववत ठेवायचा हा प्रयत्न. सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारचा, ७ जूनचा बंद भाव २,४९९ रुपये आहे. जो २,३५० रुपयांच्या निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तरावर आहे. एकंदरीत घडतंय ते नवलच! (क्रमशः)

आशीष ठाकूर

लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.
ashishthakur1966@gmail.com
अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि ‘इच्छित लक्ष्य’ या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Story img Loader