आता जो लोने आपले लक्ष वळवले ते गोल्डमन सॅक्स आणि त्यांचा आशिया खंडाचा व्यवस्थापक समूह लेइसनेरकडे. गोल्डमन सॅक्सच्या मदतीने १एमडीबीला रोख्यांची विक्री करायची होती. अबूधाबीमधील एका अशाच फंडाकडून ३.५ अब्ज डॉलरची गुंतवणूक जो लो घेऊन आला. अर्थातच त्यातील १.४ अब्ज डॉलर मग त्याने कर स्वर्ग (टॅक्स हेवन) देशांमधून आपल्या खात्यांमध्ये वळवले आणि काही पैसे लाच म्हणून नजीब यांच्या खात्यांमध्येदेखील पाठवले. रोझमाला मिळणाऱ्या भेटवस्तू आता अधिक महागड्या होत होत्या. २०१३ मध्ये १एमडीबीने अजून ३ अब्ज डॉलरचे रोखे विकले आणि पुन्हा पैसे जो लोच्या खात्यामध्ये पोहोचले. अशा प्रकारे जो लोने २०१५ पर्यंत एकंदरीत ४.५ अब्ज डॉलर आपल्याकडे वळवून घेतल्याचा नंतर खुलासा झाला. जो लो आता चांगलाच श्रीमंत झाला होता आणि त्याचे खर्च आता लोकांना दिसू लागले होते. पैसे खर्च करण्याचे आणि श्रीमंती दाखवण्याचे सगळे विक्रम त्याने मोडले होते. एका वर्षी त्याला दोनदा नवीन वर्ष साजरे करायचे होते. म्हणून तो ऑस्ट्रेलियामध्ये नवीन वर्ष साजरे करून चार्टर विमानाने अमेरिकेला पोहोचला आणि तिथेपण नवीन वर्ष साजरे केले.

शेवटी प्रत्येक गोष्टीचा कधीतरी अंत असतोच. वर्ष २०१५ मध्ये एका जागल्याने ई-मेलचा इतिहास उघडून दाखवला आणि मलेशियन लोकांना या घोटाळ्याची कुणकुण लागली. नजीब यांनी साम-दाम-दंड-भेद वापरून वर्ष २०१८ पर्यंत सत्ता काबीज करणे शक्य केले. पण २०१८ मध्ये निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. वर्ष २०१६ पासून त्यांच्या विरोधात आघाडी उघडलेल्या, अवघ्या ९२ वर्षांच्या आणि १९८१ ते २००३ मध्ये पंतप्रधान राहिलेल्या डॉक्टर महाथीर बिन मोहंमद यांनी सत्ता काबीज केली. वयाच्या ९२व्या वर्षी शपथ घेणारे जगातले बहुधा ते पहिलेच पंतप्रधान असावेत. ज्या पक्षात राहून २० वर्षे पंतप्रधान राहिलेल्या महाथीर यांनी मग आपल्याच पक्षाचा पराभव केला आणि तोसुद्धा ६० वर्षांत त्यांचा पक्ष कधी हरला नव्हता. म्हणजे हा घोटाळा किती गंभीर होता ते लक्षात यावे. नजीब यांची सत्ता गेल्यानंतर त्यांच्या परदेश प्रवासावर बंधने आणली आणि त्यांना रीतसर खटला करून आज १२ वर्षांची शिक्षा ते भोगत आहेत. अजून काही खटले त्यांच्यावर सुरू आहेत. त्यांची बायको रोझमावरसुद्धा बरेच खटले आहेत. या दाम्पत्याने म्हटले आहे की, या सगळ्या भेटवस्तू त्यांना अबूधाबीच्या राजांकडून मिळालेल्या असून त्याचा जो लो किंवा १एमडीबीशी काहीही संबंध नाही. जो लो हा गुन्हेगार असून त्याने पैसे पळवले. अर्थातच जो लो वर्ष २०१८ पासून कुणालाही दिसला नाही पण तरीही मलेशियन अधिकाऱ्यांची शिक्षा माफ व्हावी यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत. चीनमधील मकाऊ येथे त्याचे वास्तव्य असल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे आणि त्याला चिनी सरकारचे संरक्षण आहे.

Cash theft of four lakhs by breaking the door of the clothing store pune news
वस्त्रदालानाचा दरवाजा उचकटून पावणेचार लाखांची रोकड चोरी
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
stock market fraud loksatta
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ८७ लाखांची फसवणूक
korean spy and zombie movies ott a hard day
झॉम्बीजचा भयानक थरार ते गुप्तहेरांच्या गूढ कथा, OTT वरील ‘या’ वेब सीरिज पाहून उडेल थरकाप
Stock market investment bait, fraud, Pune,
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने २६ लाखांची फसवणूक
Viral VIDEO: Drunk Constable Unzips And Urinates In Middle Of Road Outside Police Station In Agra
दारूच्या नशेत पोलिसांचे लज्जास्पद कृत्य, रस्त्याच्या मधोमध पँटची चेन उघडली अन्…; घटनेचा VIDEO व्हायरल
boney kapoor financial crisis roop ki raani movie
दिग्दर्शकाने अर्ध्यावर सोडली साथ; फ्लॉप झाला बिग बजेट सिनेमा, बोनी कपूर यांना कर्ज फेडायला लागली होती ‘इतकी’ वर्षे
salman khan lawrence bishnoi
पुन्हा धमकी, पुन्हा बिश्नोई गँग; सलमान खानच्या नावाने मुंबई पोलिसांना आला संदेश!

हेही वाचा… ‘मलेशिअन डेव्हलपमेंट बरहाद’ : घोटाळ्यांचा बाप! (भाग १)

या घोटाळ्यातील काही पैसे मलेशियन सरकारने परत आणले जसे की, जो लोच्या काही निनावी मालमत्ता, त्याची प्रेयसी असलेली हॉलीवूडची अभिनेत्री मिरिंडा कर हिला दिलेल्या भेटवस्तू आणि काही पैसे जे अमेरिकी सरकारने पकडले इत्यादी. गोल्डमन सॅक्सनेदेखील काही पैसे परत दिले, कारण या सगळ्या व्यवहारामध्ये अवास्तव कमिशन घेतल्याचा संशय त्यांच्यावर होता. थोडक्यात काय तर भ्रष्टाचार व आर्थिक घोटाळा एकत्र झाला तर एखादे सरकार पडू शकते आणि त्याची व्याप्ती तुमच्या-आमच्या कल्पनेच्याही पलीकडे असू शकते.

@AshishThatte

ashishpthatte@gmail.com

लेखक कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट म्हणून कार्यरत आहेत.