आता जो लोने आपले लक्ष वळवले ते गोल्डमन सॅक्स आणि त्यांचा आशिया खंडाचा व्यवस्थापक समूह लेइसनेरकडे. गोल्डमन सॅक्सच्या मदतीने १एमडीबीला रोख्यांची विक्री करायची होती. अबूधाबीमधील एका अशाच फंडाकडून ३.५ अब्ज डॉलरची गुंतवणूक जो लो घेऊन आला. अर्थातच त्यातील १.४ अब्ज डॉलर मग त्याने कर स्वर्ग (टॅक्स हेवन) देशांमधून आपल्या खात्यांमध्ये वळवले आणि काही पैसे लाच म्हणून नजीब यांच्या खात्यांमध्येदेखील पाठवले. रोझमाला मिळणाऱ्या भेटवस्तू आता अधिक महागड्या होत होत्या. २०१३ मध्ये १एमडीबीने अजून ३ अब्ज डॉलरचे रोखे विकले आणि पुन्हा पैसे जो लोच्या खात्यामध्ये पोहोचले. अशा प्रकारे जो लोने २०१५ पर्यंत एकंदरीत ४.५ अब्ज डॉलर आपल्याकडे वळवून घेतल्याचा नंतर खुलासा झाला. जो लो आता चांगलाच श्रीमंत झाला होता आणि त्याचे खर्च आता लोकांना दिसू लागले होते. पैसे खर्च करण्याचे आणि श्रीमंती दाखवण्याचे सगळे विक्रम त्याने मोडले होते. एका वर्षी त्याला दोनदा नवीन वर्ष साजरे करायचे होते. म्हणून तो ऑस्ट्रेलियामध्ये नवीन वर्ष साजरे करून चार्टर विमानाने अमेरिकेला पोहोचला आणि तिथेपण नवीन वर्ष साजरे केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा