पाण्याशी संबंधित साहसी खेळ हे चित्तथरारक आणि वेगळा अनुभव देणारे असतात. समुद्रातील लाटांवर स्वैर संचार करणे आणि उंचावरून वाहत येणाऱ्या नदीतील पाण्याबरोबर स्वतःला झोकून देऊन खेळाचा आनंद लुटणे दोन्ही पाण्याशी संबंधित खेळ आहेत, पण तंत्र पूर्णपणे वेगळे! लाट कशी आणि कुठून येते? यावर आपला तोल कसा सांभाळायचा? हे समजले पाहिजे आणि दुसऱ्या खेळात नदीचा प्रवाह आणि जमिनीचा उतार यानुसार आपली बोट स्वतःच नियंत्रित करून खेळाचा आनंद लुटायचा असतो. अर्थातच आपले सदर उन्हाळ्यातील खेळांविषयी नसून बाजाराविषयी आहे, पण आजचा विषय तोच आहे.

लाटांवर स्वार होताना यशस्वी गुंतवणूकदार नेमके काय करतात?

या आर्थिक वर्षाची सुरुवात इस्रायल आणि हमास आणि इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाने झाली. निफ्टीचा सहा महिन्यांचा परतावा १८ टक्के तर एका महिन्याचा परतावा अवघा एक टक्का ही परिस्थिती एकीकडे आणि निफ्टीतील बँकिंग कंपन्यांच्या शेअरला अचानकपणे मागच्या महिन्याभरात आलेले ‘अच्छे दिन’ दुसरीकडे अशी परिस्थिती असताना आपला पोर्टफोलिओ सांभाळणे महत्त्वाचे काम ठरते. भारतातील निवडणुका आता दुसऱ्या टप्प्यात पोहोचल्या आहेत. पुढच्या महिन्यात याच दिवशी लोकसभा निवडणुकांचे निकाल आलेले असतील आणि बाजाराला निश्चित दिशा मिळायला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. मग युरोपियन युनियनमधील निवडणुका आणि नोव्हेंबरमधील अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक याचे वारे वाहायला लागतील. अर्थातच याचा थेट परिणाम आपल्या पोर्टफोलिओवर होत नसला तरी याचा अभ्यास करणे आवश्यकच आहे.

Sensex and Nifty continue to increase for third consecutive day
मार्केट वेध : शेअर बाजाराची सलग तिसऱ्या दिवशी आगेूकूच; अदानींच्या शेअर्समध्ये उत्साही भरते कशाने?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Ravindra Chavan talk on local body elections in exclusive interview with Loksatta
‘शक्तिशाली’ भारतासाठी ‘बलशाली’ भाजप आवश्यक
ajit pawar ncp latest news in marathi
अजित पवार स्वबळावर लढणार का ?
scheme for unemployed youth promises rs 8500 per month
सत्तेत आल्यास सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा ८५०० रुपये : काँग्रेस
bjp deciding direction of campaign for the delhi assembly elections
लाल किल्ला : दिल्ली निवडणुकीची सूत्रे भाजपच्या हाती?
aap bungalow in new delhi
चांदनी चौकातून : अन् बंगल्याचे दिवस पालटले!
अयोध्येतील पराभवाचा बदला घेण्यासाठी भाजपाने उत्तर प्रदेशात कोणती रणनीती आखली? (फोटो सौजन्य पीटीआय)
Uttar Pradesh Election : अयोध्येतील पराभवाचा बदला घेण्यासाठी भाजपाने उत्तर प्रदेशात कोणती रणनीती आखली?

हेही वाचा… ‘मलेशिअन डेव्हलपमेंट बरहाद’ : घोटाळ्यांचा बाप! (भाग २)

भारताचा समग्र अर्थात मॅक्रो अर्थव्यवस्थेविषयीचा मार्च महिन्याचा लेखाजोखा समाधानकारक आहे. किरकोळ महागाई निर्देशांक ५.०९ टक्क्यांवर आहे व रिझर्व्ह बँकेच्या सहा टक्क्यांच्या सहनशील पातळीच्या आत आहे. एप्रिलमध्ये जीएसटी संकलन २.१० लाख कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. तर गेल्या आर्थिक वर्षात जीएसटी संकलनाचा विचार केल्यास ते ११.५ टक्क्यांनी वधारले आहे. उत्पादन वाढीचा दर दर्शवणारा ‘पीएमआय’ हा निर्देशांक वाढत असून ५८.८ गुणांकावर पोहोचला आहे.

तीन महिन्यांतील विविध क्षेत्रांतील परतावे बघितल्यास, मार्चअखेरीस बँक निफ्टी, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस, निफ्टी आयटी, निफ्टी एफएमसीजी यांनी नकारात्मक परतावा दिला आहे. तर निफ्टी ऑटो, निफ्टी हेल्थकेअर, निफ्टी एनर्जी, निफ्टी फार्मा यांनी दहा टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. निफ्टी पीएसयू बँक निर्देशांक २२ टक्के परताव्यासहित आघाडीवर आहे. ही आकडेवारी मार्च २०२४ अखेरची असली तरी विद्यमान महिन्याच्या शेवटी परिस्थिती बदलायला सुरुवात होणार आहे.

जागतिक पातळीवरील भू-राजकीय संकटाचा थेट परिणाम दोन गोष्टींवर होणार आहे. त्यातील एक म्हणजे खनिज तेलाचे भाव आणि दुसरा परकीय चलनातील अस्थिरतेमुळे त्याचा व्यवहार तुटीवर होणारा परिणाम. यामुळे भांडवली बाजारावर त्याचा मानसिक परिणाम होऊन नफा-वसुली होण्याची शक्यता दिसते.

हेही वाचा… माझा पोर्टफोलिओ : पोर्टफोलिओला ‘ऊर्जावान’ भविष्याची ग्वाही

भारतातील वाहन उद्योग क्षेत्रात असलेली तेजी कायम आहे, याचा थेट परिणाम या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरवर होताना दिसतो. या क्षेत्रातील अशोक लेलँड या कंपनीने एप्रिल महिन्यात सर्वच श्रेणीतील वाहन विक्रीमध्ये घसघशीत वाढ नोंदवली आहे. महिंद्र अँड महिंद्र या कंपनीने आपल्या वाहनांच्या विक्रीमध्ये १८ टक्के वाढ नोंदवली असून शेअरने ५२ आठवड्यातील उच्चांक गाठला आहे. याच बरोबरीने धातू आणि खनिज उत्पादनामध्ये असलेल्या तेजीचा परिणाम हळूहळू दिसायला लागणार आहे. या क्षेत्राशी संबंधित पावर फायनान्स कॉर्पोरेशन जवळपास ५२ आठवड्याच्या उच्चांकी स्थितीमध्ये येऊन पोहोचला आहे. वर्षभरात या शेअरने गुंतवणूकदारांना २३० टक्के एवढा घसघशीत परतावा दिला आहे. ऊर्जा आणि तत्सम क्षेत्रात होणारी भरघोस गुंतवणूक हे यामागील कारण असावे. याच क्षेत्रातील आणखी एक सरकारी कंपनी असलेल्या रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन या कंपनीने पुढच्या वर्षीच्या अखेरीस कर्ज मुक्त होण्याचा संकल्प सोडला असून व्यवसाय आणखी बळकट करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत, या शेअरनेही ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे. येत्या काळात ऊर्जानिर्मिती क्षेत्र अधिक चमकण्याची जोरदार शक्यता एका सरकारी निर्णयामुळे तयार झाली आहे. येत्या वर्षभरात भारताला दहा ते बारा गिगावाॅट एवढी वीजनिर्मिती औष्णिक ऊर्जा या माध्यमातून करायची आहे. वाढती औद्योगिक आणि घरगुती विजेची मागणी हे यामागील प्रमुख कारण आहे. अर्थातच याचा थेट परिणाम ऊर्जानिर्मिती, ऊर्जा पारेषण क्षेत्रातील कंपन्यांना होणार आहे.

पोर्टफोलिओत रोकड किती असावी?

भारतातील म्युच्युअल फंड कंपन्यांनी जानेवारी महिन्यामध्ये विक्रमी रोकड पोर्टफोलिओमध्ये बाळगली होती. एकूण मालमत्तेच्या ४.३६ टक्के जानेवारी महिन्यात, तर ४.४२ टक्के फेब्रुवारी महिन्यात होती. मार्च अखेरीस हा आकडा कमी झाला आहे. म्युच्यअल फंड निधी व्यवस्थापकांना अपेक्षित असलेला ‘खरेदीचा मोका’ मिळाला आहे असे समजायचे का हा प्रश्न महत्त्वाचा आहे.

हेही वाचा… दाव्याविना पडून असलेली ठेव रक्कम मिळवावी कशी?

आपण घेतलेले शेअर उत्तम परतावा देत आहेत, यापेक्षा त्यांचे व्यवसाय उत्तम सुरू आहेत हे सतत तपासून बघणे आवश्यक असते. निवडणूक निकाल असो वा आंतरराष्ट्रीय घडामोडी यामुळे बाजारात अचानक घसरण दिसून आली तर चांगल्या शेअरमध्ये आवर्जून खरेदी करावी. आपल्या पोर्टफोलीओतील मालमत्तेत सोन्याशी संबंधित गुंतवणूक असावी, हे विचारात घेतले पाहिजे. बाजारातील अस्थिरता आणि सोन्याच्या दरातील वाढ हे समीकरण पुन्हा सांगायला नकोच, गुंतवणूकदारांनी गोल्ड ईटीएफ किंवा गोल्ड म्युच्युअल फंड योजनांचा वापर करून लाटेवर स्वार होण्यास हरकत नाही.

Story img Loader