लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी  
मुंबई : इंधन विपणन क्षेत्रातील सरकारी मालकीच्या महारत्न दर्जाच्या दोन कंपन्या – भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (बीपीसीएल) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (एचपीसीएल) यांनी त्यांच्या भागधारकांना भरीव लाभांशासह, बक्षीस (बोनस) समभागांचा नजराणा गुरुवारी घोषित केला. बीपीसीएलने एकास एक (१:१) या प्रमाणात म्हणजे धारण केलेल्या प्रत्येक समभागामागे एक बक्षीस समभाग, तर एचपीसीएलने दोनास एक (१:२) म्हणजेच प्रत्येक दोन समभागामागे एक बक्षीस समभाग देण्याचे प्रस्तावित केले आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोन्ही कंपन्यांना सरलेल्या मार्च तिमाहीत मात्र, निवडणुकांआधी (मार्चमध्ये) केंद्र सरकारने मतपेटीवर डोळा ठेऊन केलेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरातील कपातीची मोठी किंमत मोजावी लागली आहे. बीपीसीएलचा तिमाही नफा ३० टक्क्यांनी घटला आहे, तर एचपीसीएलच्या तिमाही नफ्यालाही २५ टक्क्यांची कात्री लागली आहे. बीपीसीएलने मात्र २०२३-२४ या संपूर्ण आर्थिक वर्षात २६,८५८.८४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षाअखेर तिच्या नफ्याचे प्रमाण २,१३१.०५ कोटी रुपये होते. बरोबरीने एचपीसीएलनेही आधीच्या वर्षातील ६,९८०.२३ कोटी रुपयांच्या तुलनेत, यंदा १६,०१४.६१ कोटी रुपयांचा उच्चांकी निव्वळ नफा कमावला आहे.

हेही वाचा >>>‘शेअर मार्केटमध्ये हर्षद मेहताच्या युगाची पुनरावृत्ती’, बड्या उद्योगपतीने गुजराती-मारवडींचा उल्लेख करत वर्तविली भीती

बीपीसीएलने बक्षीस समभागासह प्रति समभाग २१ रुपयांचा अंतिम लाभांश, तर एचपीसीएलने प्रति समभाग १६.५० रुपये लाभांश घोषित केला आहे. लाभांश आणि बक्षीस समभागाच्या प्रस्तावाला दोन्ही कंपन्यांकडून स्वतंत्रपणे आयोजित भागधारकांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत औपचारिक मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. 

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharatna oil companies bpcl hpcl announced bonus to shareholders print eco news amy
Show comments