मुंबई : भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीची उच्चांकी दौड कायम असून मंगळवारच्या सत्रात दोन्ही निर्देशांकांनी ऐतिहासिक शिखर गाठले.आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि इन्फोसिस या निर्देशांकातील वजनदार कंपन्यांच्या समभागांमध्ये झालेल्या खरेदीच्या जोरावर निर्देशांकांनी उच्चांकी पातळी गाठली. या जोडीला परदेशी निधीच्या ताज्या प्रवाहामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला, असे बाजार विश्लेषकांनी सांगितले. क्षेत्रीय पातळीवर, गृहनिर्माण, ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातील समभागांच्या तीव्र मागणीच्या पार्श्वभूमीवर सेन्सेक्स आणि निफ्टी त्यांच्या नवीन सार्वकालिक उच्च पातळीवर स्थिरावले.

सलग चौथ्या सत्रात वाढ होऊन, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ३०८.३७ अंशांची भर पडली आणि तो ७७,३०१.१७ या सर्वोच शिखरावर स्थिरावला. दिवसभरात, त्याने ३७४ अंशांची कमाई करत ७७,३६६.७७ या सर्वोच शिखराला स्पर्श केला होता. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी २३,५५७.९० या विक्रमी उच्चांकावर पोहोचला. त्यात ९२.३० अंशांची वाढ झाली. सत्रादरम्यान तो ११३.४५ अंशांनी वाढून २३,५७९.०५ या नवीन ऐतिहासिक पातळीवर पोहोचला होता.मंगळवारी ‘फिच रेटिंग्ज’ने ग्राहक उपभोगातील दमदार वाढ आणि वधारत असलेल्या खासगी गुंतवणुकीचा हवाला देत चालू आर्थिक वर्षासाठी अर्थव्यवस्थेच्या वाढीचा अंदाज मार्चमधील ७ टक्क्यांच्या पातळीवरून सुधारून ७.२ टक्क्यांवर नेला, याचे बाजारात सकारात्मक पडसाद उमटले.

Thirumayam Fort
‘या’ किल्ल्यावरील अंडाकृती खडकाखाली दडलंय काय?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
wall-painted calendar in the Roman Republic
भूगोलाचा इतिहास : एका खेळियाने…
From November 16 the fortunes of these zodiac signs
१६ नोव्हेंबरपासून ‘या’ राशींचे भाग्य चमकू शकते, ग्रहांचा राजा सूर्याचा नकारात्मक प्रभाव संपणार
mangal gochar 2024 mars transit in kark made dhan lakshmi rajyog
मंगळ ग्रहाने निर्माण केला धनलक्ष्मी राजयोग! ‘या’ राशींचे नशीब चमकणार, अनपेक्षित धनलाभाचा योग
Sun Planet Transit In Scorpio
५ दिवसांनंतर सुर्य करणार मंगळाच्या घरात प्रवेश, या राशींचे सुरु होणार चांगले दिवस, प्रत्येक कामात मिळणार यश!
ketu nakshatra parivartan 2024
आजपासून ‘या’ ३ राशींची चांदी; केतूच्या नक्षत्र परिवर्तनाने कमावणार भरपूर पैसा आणि मानसन्मान
comet Temple Tuttle, meteor shower, sky
आकाशात उल्‍कावर्षावाचे मनोहारी दृश्‍य; सज्‍ज व्‍हा…

हेही वाचा >>>ह्युंदाई मोटर इंडियाचा लवकरच ‘महा-आयपीओ’

सेन्सेक्समधील आघाडीच्या ३० कंपन्यांमध्ये पॉवरग्रिड, विप्रो, आयसीआयसीआय बँक, टायटन, महिंद्र अँड महिंद्र, ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, जेएसडब्ल्यू स्टील आणि स्टेट बँकेचे समभाग तेजीत होते. तर मारुती, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा स्टील, टाटा मोटर्स, आयटीसी आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या समभागात घसरण झाली. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) शुक्रवारच्या सत्रात २,१७५.८६ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची खरेदी केली.

गुंतवणूकदार १०.२९ लाख कोटींनी श्रीमंत

भांडवली बाजारातील सरलेल्या चार सत्रातील तेजीने गुंतवणूकदारांच्या श्रीमंतीत १०.२९ लाख कोटींची भर घातली आहे. याचबरोबर मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजारभांडवल ४३७.२४ लाख कोटी रुपयांच्या नवीन विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहे. प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीची विक्रमी धाव कायम आहे.

शेअर बाजार आकडेवारी

सेन्सेक्स ७७,३०१.१७ ३०८.३७ (०.४%)

निफ्टी २३,५५७.९० ९२.३० (०.३९%)

डॉलर ८३.४२ – १३

तेल ८४.०२ -०.२७