Sensex, Nifty Crash: भारतीय शेअर बाजारात गेल्या काही महिन्यांपासून विक्री सुरूच आहे. त्यातच आज ट्रेडिंग आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, शुक्रवार २८ फेब्रुवारी रोजी, बाजारात पुन्हा एकदा मोठी घसरण दिसून येत आहे. सकाळी १२:३० वाजता, सेन्सेक्स १.२९% किंवा ९६४.५० अंकांनी घसरून ७३,६४७.९३ वर व्यवहार करत होता, तर निफ्टी १.३३% किंवा ३००.९० अंकांनी घसरून २२,२४४.१५ वर व्यवहार करत होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आठवड्यातील व्यवहाराच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (२८ फेब्रुवारी) बाजार बंद होताना सेन्सेक्स १४१४ अंकांनी (१.९० टक्के) घसरला आणि तो ७३,१९८ च्या पातळीवर बंद झाला. निफ्टी देखील ४२० अंकांनी (१.८६ टक्के) घसरून २२,१२४ वर बंद झाला. आजच्या दिवसात सेन्सेक्स जोरदार आपटल्याने तब्बल ९ लाख कोटी रुपयांचा चुराडा झाला आहे.

या घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज सुमारे ९ लाख कोटींची घट झाली आहे, मागील सत्रात ही घट ३९३.१० लाख कोटी रुपये इतकी होती. गेल्या दोन सत्रांमधील वाढीनंतर, आज सेन्सेक्समध्ये पुन्हा घसरण दिसून आली आहे.

बीएसई स्मॉल कॅपमध्ये १०२८ अंकांनी (२.३३ टक्के) घसरण झाली, तर तो ४३,०८२ वर बंद झाला. मिड कॅपमध्ये देखील ८५३ अंक (२.१६ टक्के) घसरण झाली आणि तो ३८,५९२ वर बंद झाला.

सेन्सेक्सच्या ३० पैकी २९ शेअर्समध्ये घसरण झाली आणि फक्त एक (एचडीएफसी बँक) तेवढा वधारला. निफ्टीच्या ५० पैकी ४५ शेअर्समध्ये घसरण झाली आणि फक्त ५ मध्ये वाढ झाली. आज एनएसईच्या सर्व सेक्टोरल इंडेक्समध्ये घसरण झाली.

सर्वाधिक घसरण निफ्टी आयटीमध्ये ४.१८ टक्के, ऑटोमध्ये ३.९२ टक्के, मीडियामध्ये ३.४८ टक्के, सरकारी बँकांमध्ये २.८३ टक्के, मेटलमध्ये १.३९ टक्के घसरण झाली. याशिवाय फार्मा, बँकिंग, एफएमसीजी आणि फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये २ टक्क्यांपर्यंत घसरण पाहायला मिळाली.

बाजारातील घसरणीची कारणे

दरम्यान बाजारातील आजच्या घसरणीमागे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफ वाढवण्याचा निर्णय, ) जीडीपी डेटाची चिंता आणि आयटी स्टॉक्सची निराशजनक कामगिरी असल्याचे बाजार तज्ञांचे मत आहे.

आज बाजारातील व्यवहार थांबल्यानंतर काही तासांनी डिसेंबर तिमाहीच्या जीडीपी डेटाची घोषणा होणार आहे. यामुळे गुंतवणूकदारांची भावना कमकुवत झाली आहे. मंदावलेली वाढ, कमाईचा दबाव आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या सततच्या विक्रीमुळे बाजार सप्टेंबरच्या अखेरीस विक्रमी उच्चांकावरून १४% खाली आला आहे. दुसरीकडे अमेरिकेतील एनव्हीडियाच्या कमाईत घट झाल्यानंतर आयटी स्टॉक्सवर पुन्हा दबाव आला, ज्यामुळे जागतिक स्तरावर एआय स्टॉक्समध्ये मोठी विक्री झाली आहे. निफ्टी आयटी इंडेक्स ३.२% घसरला, तर टॉप लॉसर्स ४.५% पर्यंत घसरले आहेत. याव्यतिरिक्त, डॉलर (१०७.३५ पातळी) मुळे चिंता वाढली, ज्यामुळे परदेशी गुंतवणूक महाग झाली असून, भारतीय इक्विटीजमधून भांडवल बाहेर पडत आहे.