Share Market 16 April 2025 Update : जागतिक बाजारातील मंदीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात सपाट सुरुवात झाली आहे. आज सकाळी बाजार उघडताच निफ्टी २३,३०० च्या आसपास आहे. तर सेन्सेक्स ७६, ८०० आसपास असून लाल रंगात व्यवहार करत आहे. मारुती सुझुकी, सन फार्मा, बजाज ऑटो यांचे शेअर्स तोट्यात असून यांचा समावेश आहे तर अपोलो हॉस्पिटल्स, एचडीएफसी बँक, एचडीएफसी लाईफ, पॉवर ग्रिड आणि आयटीसीचे शेअर्स नफ्यात आहेत.

व्यापक बाजारपेठा, स्मॉल आणि मिडकॅप्सने चांगली कामगिरी केली असून जवळजवळ १% वाढ नोंदवली आहे. तर प्रमुख शेअर्स, जेनसोल इंजिनिअरिंगचे शेअर्स लोअर सर्किटमध्ये अडकले आणि ५% खाली आले. दरम्यान, इंडसइंड बँक जवळजवळ १% वर आहे.

जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे मुख्य गुंतवणूक धोरणकार डॉ. व्ही.के. विजयकुमार यांनी म्हटलंय की, “अलीकडील बाजारातील ट्रेंडचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे अनेक देशांतर्गत वापराच्या ब्लूचिप्सची लवचिकता. बजाज फायनान्स, भारती एअरटेल, इंडिगो एअरलाइन्स आणि आयशर मोटर्ससारखे स्टॉक ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर आहेत. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि कोटक बँक लवचिक आहेत तर आयटी स्टॉक कमकुवत आहेत. बाजार हा संदेश देत आहे की या गोंधळलेल्या जागतिक वातावरणात देशांतर्गत शेअर्स अधिक सुरक्षित असतील.”

शेअर बाजारात तेजी

कोटक सिक्युरिटीजचे प्रमुख इक्विटी रिसर्च श्रीकांत चौहान म्हणाले की, “दैनंदिन चार्टवर, बाजार अजूनही वरच्या दिशेने वाटचाल करत आहे, जो सध्याच्या पातळीवरून आणखी नफा मिळवण्याची शक्यता दर्शवितो. आम्हाला वाटते की सध्याचे बाजारातील वातावरण तेजीचे आहे; तथापि, तात्पुरत्या जास्त खरेदीच्या परिस्थितीमुळे, आम्हाला उच्च पातळीवर काही नफा बुकिंग दिसू शकते.

आशियाई बाजार लाल रंगात

चीनने पहिल्या तिमाहीत ५.४% जीडीपी वाढ नोंदवली असून, विश्लेषकांच्या अंदाजांपेक्षा चांगली कामगिरी करत आणि टॅरिफच्या चिंतेमध्येही वाढीची गती सुरू असल्याचे दर्शवत आहे. असं असतानाही गुंतवणूकदारांनी टॅरिफचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम तपासल्याने आशियाई बाजारपेठा घसरल्या आहेत. दरम्यान, जेपी मॉर्गनने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की अमेरिका आणि चीनमधील तीव्र कर युद्धाचा चिनी इंटरनेट कंपन्यांच्या महसुलावर कमीत कमी परिणाम होण्याची अपेक्षा आहे. जेपी मॉर्गनच्या मते, काही चिनी इंटरनेट स्टॉक अगदी उलट चक्रीय देखील असू शकतात. एकूणच, बँकेचा असा विश्वास आहे की चीनच्या ऑनलाइन वापरावर कर युद्धाचा परिणाम मोठ्या प्रमाणात दुर्लक्षित केला जाऊ शकतो, ज्याचा अंदाज०.५ टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी आहे.