Share Market Opening 1 Feb : जागतिक दबावाच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पाच्या दिवशी देशांतर्गत बाजाराने सावध सुरुवात केली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीची सुरुवात जवळपास स्थिर झाली आहे. आज अर्थमंत्री निर्मला सीतारामण लोकसभेत नवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यापूर्वीच आरबीआयच्या कारवाईनंतर पेटीएमचे शेअर्स उघडताच कोसळले आहेत.

सेन्सेक्सने अवघ्या २५ अंकांच्या वाढीसह व्यवहाराला सुरुवात केली. निफ्टीचीही अशीच सुरुवात झाली. काही मिनिटांसाठी बाजार लाल रंगात पाहायला मिळाला. सुरुवातीच्या व्यवहारात बाजारात मर्यादित चढउतार दाखवत आहेत. सकाळी ९.२० वाजता सेन्सेक्स १० अंकांच्या किंचित वाढीसह ७१,७५० अंकांच्या जवळ होता. निफ्टी २१,७३० अंकांच्या जवळपास स्थिर होता.

government banks earned net profit
सरकारी बँकांना सहामाहीत ८६ हजार कोटींचा निव्वळ नफा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
inflation rate declined
किरकोळ महागाई दराची उसंत, नोव्हेंबरमध्ये ५.४८ टक्क्यांवर घसरण
indian stock market nifty sensex
अमेरिकी महागाई दराच्या प्रतीक्षेत निर्देशांकात नगण्य वाढ
Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
s and p global ratings
अर्थव्यवस्थेची घोडदौड कायम राहणार – एसअँडपी; नवीन वर्षात मध्यवर्ती बँकेकडून व्याजदर दिलासा शक्य
equity funds investment declined
इक्विटी फंडांतील ओघ ओसरला! नोव्हेंबरमध्ये १४ टक्क्यांनी घटून ३५,९४३ कोटींवर
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?

प्री ओपनमध्ये बाजार मजबूत राहिला

बाजार उघडण्यापूर्वी गिफ्टी सिटीमधील निफ्टी फ्युचर्स २१,८०० अंकांच्या पातळीजवळ ग्रीन झोनमध्ये किंचित वाढीसह व्यवहार करीत होते. अर्थसंकल्पाच्या दिवशी देशांतर्गत बाजार चांगली सुरुवात करू शकेल, असे संकेत यावरून मिळत होते. प्री ओपन सत्रात बीएसई सेन्सेक्सने ३१५ हून अधिक अंकांच्या वाढीसह ७२ हजारांचा टप्पा ओलांडला होता. निफ्टी ५० पेक्षा जास्त अंकांच्या वाढीसह २१,७८० अंकांच्या वर होता.

अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी ही स्थिती होती

अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी सुरुवातीच्या घसरणीनंतर बाजाराने शानदार रिकव्हरी केली होती. बुधवारी व्यवहार संपल्यानंतर बीएसई सेन्सेक्स ६१२.२१ अंकांच्या (०.८६ टक्के) वाढीसह ७१,७५२.११ अंकांवर बंद झाला. तर NSE चा निफ्टी ५० काल २०३.६० अंकांनी म्हणजेच ०.९५ टक्क्यांनी मजबूत होऊन २१,७२५.७० अंकांवर होता.

पेटीएमचे शेअर्स ओपन होताच कोसळले

आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांची नजर पेटीएमची मूळ कंपनी One97 कम्युनिकेशन्सच्या शेअर्सवर आहे. बुधवारी बाजार बंद झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेने One97 कम्युनिकेशन्सची उपकंपनी असलेल्या पेटीएम पेमेंट्स बँकेविरुद्ध मोठी कारवाई केली. पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन ग्राहक जोडण्यास किंवा नवीन क्रेडिट देण्यावर तात्काळ बंदी घालण्यात आली आहे. २९ फेब्रुवारीनंतर पेटीएम वॉलेट आणि पेटीएम फास्टॅग यांसारख्या सेवांमध्ये पैसे जोडले जाणार नाहीत. यामुळे आज बाजार उघडताच पेटीएमचे शेअर्स २० टक्क्यांच्या लोअर सर्किटसह ६०९ रुपयांपर्यंत घसरले. पेटीएमच्या शेअर्समध्ये मोठी विक्री होत आहे.

अर्थसंकल्पापूर्वी व्यापक बाजाराची स्थिती संमिश्र दिसते. सेन्सेक्सवर ३० पैकी १८ समभाग ग्रीन झोनमध्ये उघडले, तर १२ समभाग नुकसानासह लाल रंगात उघडले. बड्या समभागांमध्ये मारुती सुझुकीने सर्वात जास्त दीड टक्क्यांच्या वाढीसह सुरुवात केली. महिंद्रा अँड महिंद्रा आणि पॉवर ग्रिडदेखील प्रत्येकी १ टक्क्यापेक्षा जास्त नफ्यात होते. रिलायन्स, टीसीएस, इन्फोसिस यांसारखे मोठे समभागही ग्रीन झोनमध्ये होते. दुसरीकडे एल अँड टी, विप्रो, बजाज फिनसर्व्ह, टायटन यांसारखे शेअर्स तोट्यात होते.

हेही वाचाः ‘पेटीएम पेमेंट्स बँके’ला ठेवी स्वीकारण्यास बंदी; रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांची २९ फेब्रुवारीपासून अंमलबजावणी

परदेशी बाजारांवर दबाव

परदेशी बाजारांची स्थिती सध्या चांगली नाही. अमेरिकन सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदर स्थिर ठेवण्याच्या निर्णयामुळे जागतिक बाजारात निराशेचे वातावरण आहे. बुधवारी अमेरिकन शेअर बाजारात घसरण झाली. वॉल स्ट्रीटवर, डाऊ जोन्स औद्योगिक सरासरी ०.८२ टक्क्यांनी घसरली. तसेच Nasdaq कंपोझिट इंडेक्समध्ये २.२३ टक्के आणि S&P ५०० मध्ये १.६१ टक्के मोठी घसरण दिसून आली. आजच्या व्यवहारात आशियाई बाजारावरही दबाव दिसून येत आहे. सुरुवातीच्या व्यापारात जपानचा निक्केई ०.७२ टक्क्यांनी घसरला. दक्षिण कोरियाच्या कोस्पीमध्ये किंचित वाढ झाली आहे. हाँगकाँगचा हँग सेंग भविष्यातील व्यापारात जोरदार सुरुवात होण्याची चिन्हे दिसत आहेत.

हेही वाचाः विप्रो कामगिरी सुधारण्यासाठी शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार

अर्थसंकल्पाच्या दिवसात शेअर बाजार अस्थिर राहिला

अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजाराच्या वाटचालीचा कल बघितला तर प्रत्येक वेळी बरेच चढ-उतार पाहायला मिळतात. २०२१ मध्ये अर्थसंकल्पाच्या दिवशी बाजाराने ५ टक्क्यांनी उसळी घेतली होती. २०१५ मध्ये ०.४८ टक्के, २०१७ मध्ये १.७६ टक्के, २०१९ मध्ये ०.५९ टक्के आणि २०२२ मध्ये १.४६ टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी म्हणजेच २०१३ मध्ये अर्थसंकल्पाच्या दिवशी बाजार ०.२७ टक्क्यांनी घसरला होता. त्याचप्रमाणे २०१६ मध्ये ०.१८ टक्के, २०१८ मध्ये ०.१६ टक्के, २०१९ मध्ये ०.९९ टक्के आणि २०२० मध्ये २.४३ टक्के घट नोंदवली गेली.

Story img Loader