Milky Mist To Bring 2000 Crore IPO : पनीरपासून आईस्क्रीमपर्यंत अशा विविध दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन करणारी मिल्की मिस्ट कंपनी या वर्षाच्या अखेरीस आयपीओ लाँच करण्याची योजना आखत आहे. यासाठी कंपनीने जेएम फायनान्शियल, आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस आणि अ‍ॅक्सिस कॅपिटल यांची बँकर्स म्हणून निवड केली आहे. मिल्की मिस्ट या वर्षाच्या मध्यापर्यंत कागदपत्रे दाखल करेल आणि नंतर २०२५ च्या अखेरीस स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध होईल अशी अपेक्षा आहे.

मिल्की मिस्ट त्यांच्या विस्तार योजनांसाठी अतिरिक्त भांडवल उभारण्यासाठी आयपीओचा पर्याय निवडत आहे. मिल्की मिस्ट याद्वारे त्यांच्या सुमारे २००० कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आयपीओमध्ये नवीन शेअर्स जारी करण्याचा आकार आणि ऑफर फॉर सेलचा आकार किती असेल हे अद्याप ठरलेले नाही. याबाबत मनी कंट्रेलने वृत्त दिले आहे.

kudo millets elephants death
‘कोदो मिलेट’च्या सेवनाने तीन दिवसांत १० हत्तींचा मृत्यू; कारण काय? काय आहे कोदो मिलेट?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
uddhav thackeray sada sarvankar
Sada Sarvankar : “आपलं अंगण सोडून दुसऱ्याच्या…”, सदा सरवणकरांच्या ‘त्या’ पोस्टवरून ठाकरेंच्या शिवसेनेचा चिमटा
maharashtra assembly election quiz
Election Quiz: आज स्मार्टफोन जिंकण्याची अखेरची संधी, द्या निवडक प्रश्नांची उत्तरं आणि जिंका आकर्षक बक्षिसं!
Shinde group MLA Pratap Sarnaiks advice to Ajit Pawar groups Najeeb Mulla
नजीब मुल्ला तुम्ही देखील ‘जय श्री राम’ बोला
india, taliban, importance of Afghanistan
विश्लेषण : भारताची अखेर तालिबानशी चर्चा! अफगाणिस्तान आपल्यासाठी का महत्त्वाचा?
peticoat cancer
साडी नेसणार्‍या महिलांना ‘पेटिकोट कॅन्सर’चा धोका? हा प्रकार काय आहे? अभ्यास काय सांगतो?

गेल्या काही वर्षांत कशी होती कंपनीची कामगिरी

मिल्की मिस्ट आर्थिक वर्ष २०२५ अखेर २,५०० कोटी रुपयांच्या महसुल मिळवण्याच्या मार्गावर आहे, असे एका सूत्राने सांगितले. हा आकडा आर्थिक वर्ष २०२४ मध्ये मिळवलेल्या २००० कोटी रुपयांच्या महसुलापेक्षा २५ टक्के जास्त आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये निव्वळ नफा सुमारे ६५ कोटी रुपये असण्याची अपेक्षा आहे. मिल्की मिस्टने आर्थिक वर्ष २३ मध्ये १,४३७ कोटी रुपयांचा महसूल नोंदवला, जो आर्थिक वर्ष २२ मध्ये १,०१५ कोटी रुपयांपेक्षा ४२ टक्क्यांनी जास्त आहे. असेही मनी कंट्रेलने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

आयपीओद्वारे, मिल्की मिस्ट हॅटसन अ‍ॅग्रो प्रॉडक्ट्स, हेरिटेज फूड्स, पराग मिल्क फूड्स आणि डोडला डेअरी सारख्या इतर सूचीबद्ध कंपन्यांच्या पावलावर पाऊल ठेवेल. नेस्ले, ब्रिटानिया आणि अनलिस्टेड अमूल हे दुग्धजन्य पदार्थ क्षेत्रातील इतर प्रमुख कंपन्या आहेत.

मिल्की मिस्ट कंपनीविषयी

१९८५ मध्ये दुध व्यापार कंपनी म्हणून सुरू झालेल्या मिल्की मिस्टने १९९४ मध्ये पनीरचे उत्पादन सुरू केले. यानंतर त्यांनी दही, लोणी, चीज, आईस्क्रीम यासारख्या मूल्यवर्धित उत्पादनांचेही उत्पादन सुरू केले. कंपनीचे संस्थापक टी सतीश कुमार आहेत. तामिळनाडूतील इरोड येथे असलेली, मिल्की मिस्ट कंपनी टी सतीश कुमार, त्यांची पत्नी अनिता कुमार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी के रत्नम चालवतात. मिल्की मिस्टचा आता उत्तर भारत, पश्चिम भारत आणि देशातील इतर राज्यांमध्ये आपला व्यवसाय वाढवण्याचा मानस आहे.

Story img Loader