Multibagger Stocks: गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारानं प्रचंड वेग पकडला आहे. अनेक शेअर्स गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळवून देत आहे. प्रीमियर एक्सप्लोझिव्ह लिमिटेड (Premier Explosives Limitd-PEL) ने केवळ एका महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. एका महिन्यात १२८ टक्के, एका वर्षात जवळपास २०० टक्के आणि तीन वर्षांत या शेअर्समध्ये ७०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. ऑगस्ट २०२० मध्ये तो शेअर फक्त १२९ रुपयांना उपलब्ध होता आणि आता तो आता १००० रुपयांच्या पुढे गेला आहे. एक दिवस आधी म्हणजेच १ ऑगस्ट २०२३ रोजी बीएसईवर तो १,०२६.४० च्या विक्रमी उच्चांकावर होता. आज बाजाराच्या कमकुवत व्यापार सत्रात तो कमजोर दिसत आहे, परंतु आजही तो इंट्रा-डेमध्ये १००८.०९ वर पोहोचला होता.
नंतर प्रॉफिट बुकिंगमुळे तो घसरला आणि सध्या तो BSE वर २.३६ टक्क्यांनी म्हणजे ९७०.५० रुपये (प्रीमियर एक्सप्लोझिव्ह शेअर किंमत) वर आहे.खरं तर त्या शेअरमध्ये एवढी तेजी का आहे आणि त्यात आता कमाईची किती क्षमता आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
‘या’ कारणांमुळे प्रीमियर एक्स्प्लोझिव्ह शेअरमध्ये तेजीचा कल
भारतीय हवाई दल, भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL) आणि L&T साठी संरक्षण मंत्रालयाकडून या शेअर्सला पाठिंबा मिळाला आहे. ६ जुलै रोजी कंपनीने संरक्षण मंत्रालयाकडून फ्लेअर्स पुरवठ्यासाठी ७६.८ कोटी रुपये, भारत डायनॅमिक्सकडून बूस्टर ग्रेन पुरवण्यासाठी १० कोटी रुपये आणि मोटर्सच्या पुरवठ्यासाठी ४३.३ कोटी रुपये आणि एल अँड टीसाठी ४३.३ कोटी रुपये मिळाल्याची घोषणा केली होती. तसेच सामग्री पुरवठ्यासाठी १३.९ कोटी रुपयांची ऑर्डर प्राप्त झाली आहे. या आर्थिक वर्षात आतापर्यंत कंपनीला ७२५ कोटी रुपयांच्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत, ज्या १२ ते २४ महिन्यांत पूर्ण करायच्या आहेत. त्याची बुक ऑर्डर सुमारे ११०८ कोटी रुपये आहे, जी त्याच्या आर्थिक वर्ष २०२३ च्या कमाईपेक्षा सुमारे ५.५ पट जास्त आहे. ही कंपनी स्वदेशी तंत्रज्ञानाने स्फोटके आणि डिटोनेटिव्ह फ्यूज बनवते.
आता शेअरचा पुढील ट्रेंड काय?
प्रीमियर एक्सप्लोझिव्ह लिमिटेडला खूप मजबूत बुक ऑर्डर मिळाली आहे आणि कंपनी तो आणखी मजबूत करण्यासाठी वेगाने काम करीत आहे. व्हेंचुरा सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख विनीत बोलिंजकर यांच्या मते, बाजारपेठेतील त्याची स्थिती आणखी मजबूत होणार आहे. त्याच्या मजबूत ऑर्डर बुककडे पाहता तो पुढेसुद्धा मजबूत कमाई करण्याची शक्यता आहे. विश्लेषकांच्या मते, भू-राजकीय चिंतेमुळे कोळशाची मागणी प्रचंड वाढली आहे, त्यामुळे स्फोटकांची गरज वाढली आहे. सरकार पायाभूत सुविधांच्या विकासावर अधिक भर देत आहे, ज्यामुळे स्फोटकांची मागणी जास्त वाढणार आहे. सागर माला, सर्वांसाठी पीएम हाऊसिंग (PM Housing for All) आणि पीएम गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन यांसारख्या विविध सरकारी योजनांमधून पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळत आहे. त्याच्या विकासाच्या जाहिरातीमुळे सिमेंट आणि धातूंची मागणी वाढत आहे, ज्यामुळे जमीन खोदून ते धातू मिळवण्यासाठी स्फोटकांची आवश्यकता भासत आहे.
हेही वाचाः ई-कॉमर्स उद्योगात सात लाख नोकऱ्या निर्माण होणार, सणासुदीच्या काळात हंगामी कर्मचाऱ्यांची मागणी वाढणार
त्याचबरोबर सरकारी हस्तक्षेपामुळे अमोनियम नायट्रेट, इंधन तेल आणि स्फोटक बनवण्याचा कच्चा माल याच्या किमतीही घसरत आहेत. कोळशाच्या वाढत्या मागणीनेही किमती स्थिर ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कंपनीला तेलंगणातील एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात अमोनियम नायट्रेट साठवण्याचा परवानाही मिळाला आहे. या सगळ्याशिवाय स्टील, अॅल्युमिनियम, मॅग्नेशियम या कच्च्या मालाच्या किमतीही घसरत आहेत. तसेच कंपनीच्या व्यवसायाला संरक्षण क्षेत्राचाही पाठिंबा मिळत आहे. आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत स्वदेशी संरक्षण उत्पादनांवर भर दिला जात आहे, ज्यामुळे कंपनीच्या वाढीला मदत होणार आहे. रेटिंग एजन्सी ICRA चा अंदाज आहे की, संरक्षण विभागातील ऑर्डरमुळे कंपनीचे मार्जिन आणखी मजबूत होणार आहे.
कोणत्या शेअर्सवर पैसे गुंतवायचे?
सध्या प्रीमियर एक्सप्लोसिव्हचे शेअर्स खूप महाग दिसत आहेत, कारण इंडस्ट्री PE २७.९x आहे आणि तो ८० च्या जवळपास आहे. सॅमको सिक्युरिटीजचे संशोधन विश्लेषक संजय मुरजानी यांच्या मते, त्याच्या वाढीच्या शक्यता लक्षात घेता तो महाग म्हणता येणार नाही. या स्तरावर काही नफा बुकिंग दिसून येऊ शकते.