फिनोटेक्स केमिकल लिमिटेड, सुमारे ४५ वर्षांपूर्वी स्थापन झालेली फिनोटेक्स केमिकल लिमिटेड ही भारतातील एक आघाडीची ‘स्पेशलिटी केमिकल’ कंपनी असून, कापड, बांधकाम, जलप्रक्रिया, खत, चामडे आणि रंग (पेंट) उद्योगांसाठी सहाय्यक आणि विशेष रसायने उत्पादित करते. कंपनीच्या व्यवसायात टेक्सटाईल केमिकल आणि क्लिनिंग व हाइजिन असे दोन स्वतंत्र विभाग आहेत. टेक्सटाइल केमिकल विभागाअंतर्गत कापडावर लक्ष केंद्रित करून विशेष रसायने उत्पादन केली जातात. त्यासाठी फिनोटेक्स केमिकलची उपकंपनी ‘बायोटेक्स मलेशिया’ आवश्यक रसायनांशी संबंधित उपाय, अनुप्रयोग संशोधन आणि उत्पादन विकास करते. स्वच्छता विभागात फ्लोअर क्लीनर, हँड-वॉश, सॅनिटायझर, डिशवॉशर आणि टॉयलेट बाऊल क्लीनर यासारखी उत्पादने तयार केली जातात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फिनोटेक्स केमिकलकडे ४७० हून अधिक उत्पादन श्रेणी असून त्यात, प्री-ट्रीटमेंट, डाईंग, प्रिंटिंग आणि फिनिशिंग प्रक्रियेसह संपूर्ण टेक्सटाईल व्हॅल्यू चेनसाठी विशेष टेक्सटाईल रसायने समाविष्ट आहेत. हे पाणी आणि तेल-आधारित ड्रिलिंग फ्लुइड रसायने आणि घराची निगा (होम केअर) रसायने, डिटर्जंट आणि सॅनिटायझर्सची विस्तृत श्रेणी देखील तयार करते. त्याचे भारतीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारात शंभरहून अधिक वितरक असून जगभरातील कंपनीची उपस्थिती सत्तर देशांमध्ये आहे. कंपनीचे तीन प्रमुख उत्पादन प्रकल्प असून, ३६,५०० मेट्रिक टन क्षमतेचे एक युनिट महापे येथे आणि ४०,००० मेट्रिक टन (२१,००० टनांची अतिरिक्त क्षमता) उत्पादन क्षमता असलेले दुसरे युनिट अंबरनाथ, मुंबई असून तिसरे उत्पादन युनिट मलेशियात आहे, ज्याची वार्षिक उत्पादन क्षमता ६,५०० मेट्रिक टन आहे. सिनर्जीचे फायदे मिळण्यासाठी कंपनीने बायोटेक्स मलेशियाचे अधिग्रहण केले आहे. कंपनीकडे ‘हायएंड सुपर स्पेशालिटी टेक्सटाईल केमिकल ऍप्लिकेशन’ असलेल्या पन्नासहून अधिक श्रेणी आहेत. कंपनी सध्या ‘मॉस्किटो लाइफ सायकल कंट्रोलर’ विकसित करत असून ते प्रामुख्याने विकसनशील देशांमध्ये वापरल्या जाणाऱ्या डासांच्या प्रादुर्भावासाठी पर्यावरणपूरक प्रभावी उपाय आहे.

हेही वाचा : निर्देशांकांची सलग सातव्या सत्रात वाढ; पॉवेल यांच्या भाषणापूर्वी मात्र सावध पवित्रा

गेल्या चाळीस वर्षांच्या कालावधीत कंपनीने गुणवत्ता आणि विश्वासार्हतेसाठी एक मजबूत प्रतिष्ठा विकसित केली असून आपली उत्पादने वितरित करण्यासाठी कंपनीचे भारतीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ११० हून अधिक वितरक आहेत. कंपनी ब्राझील, बांगलादेश, जर्मनी, इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर, सीरिया, थायलंड, यूएसए, व्हेनेझुएला आणि व्हिएतनाम यासह ७० देशात कार्यरत आहे.

धोरणात्मक भागीदारी

भारतीय बाजारपेठेसाठी खास रसायनांचे व्यावसायिकीकरण करण्यासाठी कंपनीचे युरोडी-सीटीसी, बेल्जियमसोबत धोरणात्मक सहकार्य आहे. हेल्थगार्ड, ऑस्ट्रेलियासह मलेशियातील संयुक्त ऑपरेशन्ससह जागतिक विपणन आणि विक्री चॅनेल भागीदार बनण्यासाठी त्याचा संयुक्त उपक्रम आहे. कंपनीने भारतातील प्रमुख वस्त्रोद्योग संस्थांपैकी एक असलेल्या मुंबईतील सस्मीरा संस्थेच्या सहकार्याने अत्याधुनिक संशोधन आणि विकास केंद्राची स्थापना केली आहे. कंपनीच्या प्रमुख ग्राहकांत नाहर समूह, अरविंद, वेलस्पन, रेमंड, रिलायन्स, बॉम्बे डायिंग, वर्धमान, जेसीटी, हिमात्सिंका सीड, दीपक फर्तिलायझर, पिडिलाइट इ.चा समावेश आहे. कंपंनीच्या एकूण महसुलापैकी सुमारे ७७ टक्के देशांतर्गत तर उर्वरित २३ टक्के महसूल निर्यातीतून येतो.

हेही वाचा : Stock Market Today : ‘सेन्सेक्स’ ८१,००० अंशांवर विराजमान

सरलेल्या पहिल्या तिमाहीत कंपनीच्या उलाढालीत ७ टक्के वाढ होऊन ती १३१ कोटी रुपयांवरून १४२ कोटींवर गेली आहे तर नक्त नफा ११.७ टक्क्यांनी वाढून २६१ कोटींवरून तो २९२ कोटींवर गेला आहे. कुठलेही कर्ज नसलेल्या फिनोटेक्स केमिकलला, उत्तम गुणवत्ता, अनुभवी प्रवर्तक तसेच परदेशातील उपस्थिती याचा फायदा आगामी काळात अपेक्षित आहे. शेअर बाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सध्याच्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

संकेतस्थळ: http://www.fineotex.com/

प्रवर्तक: सुरेन्द्र टिब्रेवाला

बाजारभाव: रु. ३६७/-

प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: टेक्सटाइल केमिकल्स

भरणा झालेले भाग भांडवल: रु. २२.१५ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक ६२.८८

परदेशी गुंतवणूकदार ३.१४

बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार ३.५९

हेही वाचा : तेजीवाल्यांची पकड घट्ट; ‘सेन्सेक्स’मध्ये शतकी वाढ

इतर/ जनता ३०.३९

पुस्तकी मूल्य: रु. ४०.४

दर्शनी मूल्य: रु. २/-

लाभांश: २०%

प्रति समभाग उत्पन्न: रु. ११.१०

किंमत उत्पन्न गुणोत्तर: ३३.१

समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ४१.३

डेट इक्विटी गुणोत्तर: ०.०१

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: ११८

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोइड (आरओसीई ): ३८.७

बीटा : १

बाजार भांडवल: रु. ४०६७ कोटी (स्मॉल कॅप)

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ४५९/२७४

गुंतवणूक कालावधी : २४ महिने

अजय वाळिंबे
Stocksandwealth@gmail.com

  • वरील लेख केवळ विश्लेषणात्मक संशोधन असून तो गुंतवणूक सल्ला नाही.
  • प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्स मध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहिती प्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या ०.१% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेट वस्तू घेतलेली नाही.
  • लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या माहितीसाठी असून शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.