‘माझा पोर्टफोलियो’ या साप्ताहिक सदरातून गुंतवणुकीसाठी शेअर्स सुचवले जातात. हे सुचवलेले शेअर्स म्हणजे खरेदीची ‘टिप’ नसून एक अभ्यासपूर्ण विवेचन असते. तुमचा पोर्टफोलियो तयार करताना सदरात सुचवलेल्या शेअरचादेखील विचार करावा. परंतु तो स्वतः अभ्यासून. या सदराचे उद्दिष्ट केवळ सुचवलेले शेअर्स खरेदी करणे हे नसून वाचक गुंतवणूकदारांनी दिलेल्या गुणोत्तराखेरीज आपलेही इतर निकष लावून मगच गुंतवणूक करावी हा आहे. अनेक वाचकांनी पोर्टफोलियो म्हणजे काय? तो कसा करावा, शेअर्स कसे निवडावेत किंवा शेअर्स निवडताना इतर कुठले निकष लावावेत? असे प्रश्न विचारले होते. दर महिन्यातील दुसऱ्या सोमवारी आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे आजवर मिळवत आहोत.

पोर्टफोलियो सहसा मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी असल्याने पोर्टफोलियोसाठी शेअर्स निवडताना कंपन्यांचे ‘फंडामेंटल अनॅलिसिस’ करून मगच निर्णय घ्यावा लागतो. त्या उलट ‘तांत्रिक विश्लेषण’ हे मुख्यत्वे अल्प मुदतीच्या गुंतवणुकीसाठी उपयोगी पडते. कंपन्यांचे फंडामेंटल अनॅलिसिस करताना अनेक सूत्रे तसेच गुणोत्तरांचा आधार घ्यावा लागतो. यामध्ये कंपनीच्या आतापर्यंतच्या कामगिरी खेरीज बदलत्या परिस्थितीनुसार पुढील कामगिरी कशी असेल याचाही अंदाज घ्यावा लागतो.

Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या राशीसाठी ठरेल लाभदायक? बाप्पा करणार का तुमच्या इच्छा पूर्ण; वाचा सोमवारचे राशिभविष्य
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
investors of DSK, Maval-Mulshi sub-divisional magistrate, Court, DSK,
‘डीएसके’ यांच्या गुंतवणूकदारांची यादी सादर करण्याचे मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश
14th November Daily Astrology in Marathi
१४ नोव्हेंबर पंचांग: वैकुंठ चतुर्दशीला मेष ते मीनपैकी कोणाच्या डोक्यावर असेल श्रीहरी व महादेवाचे कृपाछत्र; वाचा तुमचे राशिभविष्य
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : नीतिशास्त्र, सचोटी  आणि नैसर्गिक क्षमता
jupiter retrograde 2024
५ दिवसांनंतर शनी-गुरू करणार कमाल; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी
Impact of US Elections 2024 on Indian Stock Market
दुरावलेला खरेदी उत्साह बाजारात परत दिसेल?
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते जोडीदाराचा सहवास; तुमचा शनिवार जाणार का आनंद-उत्साहात? वाचा १२ राशींचे भविष्य

हेही वाचा – मे महिन्यात ‘इक्विटी’ फंडातील गुंतवणुकीत घसरण; पण ‘SIP’च्या माध्यमातून योगदान १४,७४८.६८ कोटींच्या विक्रमी पातळीवर

मागच्या लेखात आपण इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर, डेट सर्व्हिस कव्हरेज गुणोत्तर, आरओई अर्थात रिटर्न ऑन इक्विटी आणि आरओसीई (रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड) ही गुणोत्तरे अभ्यासली होती. फंडामेंटल अनॅलिसिससाठी ही बहुतांश गुणोत्तरे होती. परंतु या गुणोत्तराखेरीज इतरही काही सूत्रे / गुणोत्तरे आणि इतर माहिती अभ्यासावी लागते. यांत प्रामुख्याने बीटा, समग्र पीई, डिव्हिडंड यील्ड, शेअरहोल्डिंग पॅटर्न, तारण ठेवेलले भांडवल, ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन, कॅश फ्लो, वर्षभरातील उच्चांक/ नीचांक, कंपनीचा विस्तारीकरणाचा कार्यक्रम इत्यादी माहितीचा समावेश होतो.

बीटा (β) : बीटा हे संपूर्ण बाजाराच्या (सामान्यत: एस अँड पी ५००) तुलनेत सुरक्षितता किंवा पोर्टफोलिओच्या अस्थिरतेचे किंवा पद्धतशीर जोखमीचे मोजमाप आहे. एकापेक्षा जास्त बीटा असलेला शेअर हा बीएसई एस अँड पी ५०० निर्देशांकापेक्षा अधिक अस्थिर म्हणून अर्थ लावला जाऊ शकतो.

कॅपिटल ॲसेट प्राइसिंग मॉडेलमध्ये (सीएपीएम) बीटा वापरला जातो, जो पद्धतशीर जोखीम आणि मालमत्तेसाठी अपेक्षित परतावा यांच्यातील संबंधांचे वर्णन करतो. धोकादायक सिक्युरिटीजची किंमत ठरवण्यासाठी आणि त्या मालमत्तेची जोखीम आणि भांडवलाची किंमत या दोन्हींचा विचार करून मालमत्तेच्या अपेक्षित परताव्याचा अंदाज तयार करण्यासाठी सीएपीएमचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

बीटा मूल्य १

जर एखाद्या समभागाचा बीटा १ असेल, तर ते सूचित करते की त्याची किंमत बाजाराच्या चढ-उताराशी घनिष्ठपणे संबंधित आहे. १ बीटा असलेल्या पोर्टफोलिओमध्ये शेअर जोडल्याने पोर्टफोलिओमध्ये कोणताही धोका नाही, परंतु पोर्टफोलिओ अतिरिक्त परतावा देईल याची शक्यतादेखील वाढत नाही.

बीटा मूल्य एकापेक्षा कमी

एकापेक्षा कमी असलेले बीटा मूल्य म्हणजे तो शेअर सैद्धांतिकदृष्ट्या बाजारापेक्षा कमी अस्थिर आहे. त्याचा पोर्टफोलिओमध्ये समावेश हा त्या पोर्टफोलिओला तुलनेने कमी जोखमीचा बनवतो. उदाहरणार्थ, एफएमसीजी, फार्मा क्षेत्रातील शेअर हे बऱ्याचदा कमी बीटाचे असतात. कारण ते बाजाराच्या सरासरीपेक्षा कमी घसरणीत जातात.

बीटा मूल्य एकापेक्षा मोठे

एकापेक्षा जास्त असलेला बीटा सूचित करतो की शेअरची किंमत सैद्धांतिकदृष्ट्या बाजारापेक्षा अधिक अस्थिर आहे. उदाहरणार्थ, एखाद्या शेअरचा बीटा १.३ असल्यास, तो बाजारापेक्षा ३० टक्के अधिक अस्थिर असल्याचे गृहीत धरले जाते. टेक्नॉलॉजी आणि स्मॉल कॅप शेअरमध्ये बाजाराच्या मानदंड निर्देशांकापेक्षा जास्त बीटा असतो. हाय बीटा सूचित करते की पोर्टफोलिओमध्ये स्टॉक जोडल्याने पोर्टफोलिओचा धोका वाढेल, परंतु त्याचा अपेक्षित परतावादेखील वाढू शकतो.

समग्र प्राइस अर्निंग गुणोत्तर : प्राइस अर्निंग गुणोत्तर म्हणजे काय आणि त्याचे सूत्र आपण मागेच अभ्यासले आहे. परंतु शेअर खरेदी करताना त्या उद्योग क्षेत्राचे समग्र प्राइस अर्निंग गुणोत्तर तपासणे महत्त्वाचे आहे, कारण त्यामुळे आपण निवडलेला शेअर त्याच क्षेत्रातील इतर शेअरच्या तुलनेत किती महाग/स्वस्त आहे ते कळते. उदाहरणार्थ, तुम्ही निवडलेल्या शेअरचे प्राइस अर्निंग गुणोत्तर १५ असेल आणि त्याच क्षेत्रातील कंपन्यांचे समग्र प्राइस अर्निंग गुणोत्तर १० असेल तर निवडलेला शेअर हा तुलनेत महाग ठरतो.

डिव्हिडंड यील्ड : गुंतवणूक करताना कंपन्यांचा लाभांश इतिहास तसेच लाभांशाचे यील्ड किती आहे तेदेखील तपासणे गरजेचे असते, कारण मिळणारा लाभांश हा तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवरचा एक प्रकारचा परतावाच असतो. यील्ड मोजताना शेअरचे दर्शनी मूल्य तपासणे गरजेचे आहे. अनेकदा दर्शनी मूल्य केवळ १ किंवा २ रुपये असते आणि लाभांश २०० टक्के जाहीर झालेला असतो. अशा वेळी बाजारभावाने केलेल्या गुंतवणुकीवर नक्की किती टक्के परतावा मिळतो आहे ते पुढील सूत्राने तपासता येते.

डिव्हिडंड यील्ड = लाभांशाची रक्कम / केलेली गुंतवणूक x १००

उदाहरणार्थ, एक रुपया दर्शनी मूल्याचे १०० शेअर्स तुम्ही २५ रुपये प्रति शेअर दराने खरेदी केलेत तर तुमची गुंतवणूक होईल २,५०० रुपये. कंपनीने १०० टक्के लाभांश जाहीर केला तर तुम्हाला मिळतील १०० रुपये. म्हणजे सूत्राप्रमाणे १००/२५०० x १०० = ४ टक्के यील्ड येईल.

शेअरहोल्डिंग पॅटर्न : आपण निवडलेल्या कंपनीमध्ये प्रवर्तकांचा भागभांडवलातील हिस्सा किती आहे, तसेच परदेशी गुंतवणूकदार आणि देशातील अर्थसंस्थांचा किती हिस्सा आहे हे नक्की पाहा. प्रवर्तकांचा हिस्सा जितका आधिक तितका बाजार भांडवलातील फ्री फ्लोट कमी. सेबीच्या नियमाप्रमाणे कुठल्याही सूचिबद्ध कंपनीत प्रवर्तकांचा हिस्सा ७५ टक्क्यांपेक्षा जास्त असू शकत नाही. प्रवर्तक, अर्थसंस्था आणि विदेशी गुंतवणूकदारांचा एकत्रित हिस्सा ७५ टक्क्यांहून अधिक असल्यास गुंतवणुकीस प्राधान्य द्यावे. तसेच प्रवर्तकांचा हिस्सा अधिक असला तरीही त्यापैकी किती टक्के शेअर्स बँक अथवा अर्थसंस्थांकडे तारण म्हणून ठेवले आहेत ते तपासून घ्यावे. कंपनीचे कर्ज असल्यास आणि ते अनुत्पादित झाल्यास बँक किंवा अर्थसंस्था तारण ठेवलेले शेअर्स कर्ज वसुलीसाठी खुल्या बाजारात विकू शकतात आणि अर्थातच त्यामुळे शेअर्सचा भाव कोसळू शकतो.

हेही वाचा – एलआयसीकडून टेक महिंद्रामधील हिस्सेदारीत वाढ

वर्षभरातील उच्चांक/नीचांक : गुंतवणूक योग्य वेळी आणि योग्य दरात व्हायला हवी. याकरिता निवडलेल्या शेअरचे गेल्या वर्षभरातील चढ-उतार तसेच बाजाराचा कल बघायला हवा. अनेकदा उच्चांकावर खरेदी केलेल्या शेअरवर परतावा मिळायला बराच कालावधी लागू शकतो, परंतु तोच शेअर मंदीमुळे किंवा तांत्रिकदृष्ट्या खालच्या पातळीवर मिळाल्यास अल्प कालावधीत फायदा होऊ शकतो. इथे ६० दिवसांचे मूव्हिंग ॲव्हरेज तपासणेदेखील फायद्याचे ठरू शकते.

(Stocksandwealth@gmail.com)