अजय वाळिंबे

विद्यमान २०२३ या कॅलेंडर वर्षाला आज तीन महिने पूर्ण झाले. मात्र शेअर बाजारात मंदीचे वातावरण कायम आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स या काळात ६१,१६८ अंशावरून घसरून, ३१ मार्च २०२३ रोजी ५८,९९२ अंशावर बंद झाला. म्हणजे मुंबई शेअर बाजार निर्देशांकात २,१७६ अंशांची (३.५५ टक्के) घसरण झाली आहे. आपल्या ‘पोर्टफोलियो’ची कामगिरीदेखील तशी सुमारच म्हणावी लागेल. याच कालावधीत ‘पोर्टफोलियो’ची २३,५०० रुपयांची गुंतवणूक ९६ रुपयांनी घसरून २३,४०४ रुपयांवर आली आहे.

rs 28677 crore withdrawn by foreign investors from stock market
शेअर बाजाराकडे परदेशी गुंतवणूकदारांची पाठ? बाजार कोसळण्याचे तेच एक कारण?
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
readers comments on Loksatta editorial,
लोकमानस : अर्थव्यवस्थेत वाढ, मग रुपयाची घसरण का?
reserve bank of india latest marathi news
विश्लेषण: १४ महिन्यांतील उच्चांकी चलनवाढीमागे कारणे कोणती? व्याजदर कपात आणखी लांबणीवर? जीडीपी वाढही मंदावणार?
indian rupee falls to all time low against us dollar
अग्रलेख : काका… मला वाचवा!
Impact of US Elections 2024 on Indian Stock Market
दुरावलेला खरेदी उत्साह बाजारात परत दिसेल?
loksatta readers feedback
लोकमानस: संशय आणि असुरक्षिततेचा परिणाम
The pros and cons of Donald Trump victory for investors
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाचे गुंतवणूकदारांना असेही लाभ-तोटे!

दोन महिन्यांपूर्वीच्या हिंडेनबर्ग रिपोर्ट – अदानी एपिसोडनंतर सर्व काही आलबेल आहे हे सांगतानाच, आपली अर्थव्यवस्था इतर देशांच्या मानाने भक्कम आहे, अमेरिकन आणि युरोपीय बँकांच्या तुलनेत भारतीय बँकाची स्थिती मजबूत आहे, बँकांचे ‘एनपीए’ कमी झालेत, महागाई आटोक्यात आहे वगैरे कितीही छातीठोकपणे सांगितले. तरीही गुंतवणूकदारांची मरगळ जाण्याची चिन्हे नाहीत. अजूनही जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता कायम असल्याने शेअर बाजारात लगेच तेजी येण्याची शक्यता धूसर वाटते. आता एल् निनो, अमेरिकी फेडरल रिझर्व्हचे व्याजदर वाढीचे चक्र, ढासळणारा रुपया आणि कमी झालेली निर्यात यामुळे चालू खात्यात झालेली घट, वाढती वित्तीय तूट, तरुणांना रोजगार पुरविण्याचे आव्हान, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात आलेली मंदी आणि पुन्हा डोकावू लागलेले करोनाचे सावट या सगळ्यांना तोंड देऊन शेअर बाजार गुंतवणुकीत चैतन्य आणणे कठीण जाणार आहे. याच काळात सोने आणि चांदीचे भाव मात्र चढेच राहिले आहेत. अशा वेळी ‘पोर्टफोलियो’मध्ये अनेक ॲसेट क्लास का असावेत याचे उत्तर मिळते. सध्याच्या परिस्थितीत गुंतवणूकदारांनी धारिष्ट्य दाखवून उत्तम कंपन्यांत टप्प्या-टप्प्यात केलेली गुंतवणूक फायद्याची ठरते हा अनुभव आहे. संयम आणि आवश्यक तेव्हा ‘स्टॉप लॉस’ पद्धत अवलंबणे हिताचे ठरेल.

‘माझा पोर्टफोलियो’ अंतर्गत सुचवलेले शेअर्स हे नेहमीच मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी असल्याने त्यांचे लगेचच मूल्यमापन करणे योग्य ठरणार नाही. मात्र वाचक गुंतवणूकदारांनी कायम जागरूकता दाखवून गुंतवणूक केलेल्या कंपन्यांचे आर्थिक निकाल तसेच शेअर बाजारातील घडामोडींवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

Stocksandwealth@gmail.com

• प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेट वस्तू घेतलेली नाही. • लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या माहितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.