एचडीएफसी बँक लिमिटेड (बीएसई कोड ५००१८० )
प्रवर्तक: एचडीएफसी
बाजारभाव: रु. १,६७६ /-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय : बँकिंग, फायनान्स
भरणा झालेले भाग भांडवल: रु. ७५३.७६ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

mita shetty
टाटा इंडिया इनोव्हेशन फंडाची कामगिरी कशी राहील?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
job opportunities direct recruitment in directorate of medical education
नोकरीची संधी : वैद्याकीय शिक्षण संचालनालयात सरळसेवेने भरती
investors of DSK, Maval-Mulshi sub-divisional magistrate, Court, DSK,
‘डीएसके’ यांच्या गुंतवणूकदारांची यादी सादर करण्याचे मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश
job opportunity in ordnance factory update in marathi
नोकरीची संधी :ऑर्डनन्स फॅक्टरीत भरती
article about sudhamma life in forest
व्यक्तिवेध : सुधाम्मा
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त
Recruitment in town planning department
नोकरीची संधी : नगररचना विभागात भरती

प्रवर्तक २५.५
परदेशी गुंतवणूकदार ३३.४

बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार २७.०
इतर/ जनता १४.१

पुस्तकी मूल्य: रु. ३८४/-
दर्शनी मूल्य: रु. १/-

गतवर्षीचा लाभांश: १९००%
प्रति समभाग उत्पन्न: रु. ६४.७३

किंमत उत्पन्न गुणोत्तर: २५.९
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: १५.६

रिटर्न ऑन कॅपिटल (ROE): १८.६

नेट इंटरेस्ट मार्जिन : ४.१

कॅपिटल ॲडेक्वेसी गुणोत्तर : १८.९
ढोबळ अनुत्पादित कर्ज : १.१७

नक्त अनुत्पादित कर्ज: ०.३
बीटा: १.१

बाजार भांडवल: रु. १२,६३,१०८ कोटी (लार्ज कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: १७५८ /१३६२

काही कंपन्यांचे शेअर्स घेताना जास्त विचार करावा लागत नाही, कारण या कंपन्या सदाबहार असतात. पोर्टफोलियोत कायम ठेवता येणाऱ्या या ब्ल्यू चीप कंपन्यांमध्ये एचडीएफसी बँकेचा समावेश असायलाच हवा. ४५ वर्षापूर्वी स्थापन झालेली हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड किंवा एचडीएफसी लिमिटेड ही भारतातील पहिल्या खासगी वित्तीय संस्थांपैकी एक होती ज्यांना रिझर्व्ह बँकेकडून खासगी क्षेत्रातील बँक स्थापन करण्यासाठी ‘तत्त्वतः’ मान्यता मिळाली. १९९४ मध्ये स्थापन झालेल्या एचडीएफसी बँकेने, जानेवारी १९९५ मध्ये शेड्युल्ड कमर्शियल बँक म्हणून कामकाज सुरू केले.

आणखी वाचा-तिमाही निकालांतील निराशेने ‘सेन्सेक्स’ची ८८८ अंशांनी गटांगळी; ‘निफ्टी’चे २० हजारांचे स्वप्न भंगले!

गेल्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे एप्रिल २०२२ मध्ये एचडीएफसी लिमिटेड आणि भारतातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील बँक, एचडीएफसी बँक यांच्या विलीनीकरणाची घोषणा करण्यात आली. एचडीएफसी लिमिटेड ही गृह वित्त व्यवसायात आघाडीवर असलेलली सर्वोत्तम खासगी कंपनी आहे. एचडीएफसी बँक शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भारतासाठी त्याच्या विस्तृत उत्पादन सूट कॅटरिंगचा एक भाग म्हणून गृहकर्जांचे अखंड वितरण सक्षम करते. या सर्वात मोठ्या आणि सक्षम कंपन्यांच्या विलीनीकरणामुळे एचडीएफसी बँक आता भारतातील सर्वात मोठी खासगी बँक झाली आहे.

आज एचडीएफसी बँकेचे वितरण नेटवर्क तिच्या ७,८६० शाखा आणि २०,५३२ एटीएम/कॅश डिपॉझिट आणि विथड्रॉवल मशिन्समध्ये (सीडीएम) ३,८२५ शहरे/नगरांमध्ये होते. तर एचडीएफसीचे वितरण नेटवर्क ७३७ आउटलेट्सचे असून त्यामध्ये एचडीएफसी सेल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या २१४ कार्यालयांचा समावेश आहे. विलीनीकरणानंतर त्यांचा बँकेत समावेश होईल. बँकेच्या चार देशांमधील शाखा आणि दुबई, लंडन आणि सिंगापूरमधील तीन प्रतिनिधी कार्यालये, अनिवासी भारतीय आणि भारतीय वंशाच्या व्यक्तींना बँकिंग सेवा, म्युच्युअल फंड तसेच गृहकर्ज निगडित उत्पादने देतात.

आणखी वाचा- बॉलीवूड – फिल्मी जगत की वित्तीय केंद्र?

बँकेने यंदाच्या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. गेल्या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीच्या तुलनेत बँकेने उलाढालीत ३८ टक्के वाढ दाखवून ती ६१,०२१ कोटींवर नेली आहे तर नक्त नफ्यात देखील २९ टक्के वाढ होऊन तो १२,३७० कोटींवर गेला आहे. बँकेच्या ठेवीत १९ टक्के वाढ झाली असून कर्ज वाटपात १६ टक्के वाढ झाली आहे. बँकेच्या व्याज खर्चात ५९ टक्के वाढ झाली असली तरीही व्याज उत्पन्न ४८,५८६ कोटीवर गेले असून गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत ते ३८ टक्क्यांनी अधिक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कालावधीत बँकेच्या फी उत्पन्नात १७ टक्के वाढ झाली असून ते ६,२९० कोटींवर गेले आहे. या तिमाहीत बँकेने १५ लाख नवीन कार्ड्स वितरित केली असून बँकेने वितरित केलेल्या कार्डची संख्या आता १.८४ कोटींवर गेली आहे.

एचडीएफसी बँकेचे एचडीएफसी लिमिटेडमध्ये विलीनीकरण १ जुलै २०२३ रोजी पूर्ण झाले आणि त्याचे मूल्य ४० अब्ज डॉलर इतके प्रचंड आहे. विलीनीकरणानंतर एचडीएफसी बँकेचा एमएससीआय ग्लोबल स्टँडर्ड इंडेक्सेसमध्ये समावेश होत आहे आणि त्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांसाठी नवीन संधी देखील उघडल्या गेल्या आहेत. इतर देशांच्या तुलनेत आपला वाढता विकास दर, उत्पादन क्षेत्राला मिळालेली गती, डिजिटलायझेशन, शहरीकरणाचा वेग, घटलेले अनुत्पादित कर्जाचे प्रमाण तसेच रिटेल व्यवसायात सातत्याने होणारी वाढ या सगळ्यांचा सकारात्मक परिणाम बँकिंग क्षेत्रावर होत आहे. एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून एचडीएफसीसारखी खाजगी बलाढ्य बँक तुमच्या पोर्टफोलियोमध्ये हवीच.

सध्याची शेअर बाजारातील अनिश्चितता पाहता सुचवलेले समभाग कमी बाजारभावात मिळू शकतात, त्यामुळे प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

-अजय वाळिंबे
stocksandwealth@gmail.com

प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.