अजय वाळिंबे

फाइन ऑरगॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड

Bipin preet singh Success Story
Success Story : आठ लाखांच्या बचतीतून सुरू केला व्यवसाय अन् उभी केली करोडोंची कंपनी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
pune vada pav crime news
पुणे: गार वडापाव देताच डोके गरम झाले, ग्राहकाची विक्रेत्याला मारहाण
last show of Vastra Haran in new set was held today in Thane
नव्या संचातील ‘वस्त्रहरण’चा शेवटचा प्रयोग आज ठाण्यात, नेत्यांनाही भुरळ
Jai-Veeru Swiggy's entry on Dalal Street welcomed by Zomato
“जय-वीरू!” दलाल स्ट्रीटवर स्विगीची एन्ट्री, झोमॅटोने केलं स्वागत! पाहा, Netflix, Amazon, Paytm, Coca Colaची भन्नाट प्रतिक्रिया
job opportunity in ordnance factory update in marathi
नोकरीची संधी :ऑर्डनन्स फॅक्टरीत भरती
konkan hapus mango season likely to deley due to prolonged monsoon
लोकशिवार: लांबलेल्या पावसाने ‘आंबा’ही लांबवला
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय

(बीएसई कोड ५४१५५७)

प्रवर्तक: रमेश शहा/ प्रकाश कामत

बाजारभाव: रु. ४,९२०/-

प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: ओलिओ केमिकल्स

भरणा झालेले भाग भांडवल: रु. १५.३३ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक ७५.००

परदेशी गुंतवणूकदार ४.८४

बँक / म्युच्युअल फंड/ सरकार १२.०९

इतर/ जनता ८.०७

पुस्तकी मूल्य: रु. ५०३/-

दर्शनी मूल्य: रु. ५/-

लाभांश: ११६ %

प्रति समभाग उत्पन्न: रु. २०२

किंमत उत्पन्न गुणोत्तर: २४.४

समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: २७.२

डेट इक्विटी गुणोत्तर:०.०२

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: १८५

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड : ६५.४

बीटा : ०.५

बाजार भांडवल: रु. १५,०८४ कोटी (मिड कॅप)

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ७,३२६ / ४,०२८

वर्ष १९७० मध्ये स्थापन झालेली फाइन ऑरगॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड आज भारतातील सर्वात मोठी ओलिओ केमिकल-आधारित ॲडिटिव्हच्या (समावेशी संयुग) विस्तृत श्रेणीचे उत्पादक, पुरवठादार, प्रक्रिया करणारे आणि वितरक आहे. कंपनीची उत्पादने विविध उद्योगांमध्ये खाद्यपदार्थ, प्लास्टिक, सौंदर्य प्रसाधने, लेपन-आवरणासाठी (कोटिंग्ज) आणि इतर विशेष अनुप्रयोगांमध्ये वापरली जातात. कंपनी भारतातील ओलिओ केमिकल-आधारित विशेष ॲडिटिव्हची सर्वात मोठी उत्पादक असून पॉलिमर ॲडिटिव्हमधील सहा सर्वात मोठ्या जागतिक उत्पादकांपैकी आणि ‘स्पेशॅलिटी फूड इमल्सिफायर्स’मधील आघाडीच्या जागतिक कंपन्यांपैकी एक आहे.

फाइनच्या प्रमुख ग्राहक वर्गामध्ये कोका-कोला, ब्रिटानिया, एशियन पेंट्स, पार्ले, पिडिलाइट, बर्जर पेंट्स इत्यादी कंपन्यांचा समावेश आहे. कोणत्याही वैयक्तिक ग्राहकाचा महसूल ५ टक्क्यांपेक्षा जास्त नाही हे विशेष. फाइन ऑरगॅनिकच्या उत्पादनाच्या श्रेणीमध्ये ४६० हून अधिक उत्पादनांचा समावेश आहे ज्यामध्ये फूड ॲडिटिव्ह, पॉलिमर ॲडिटिव्ह, कॉस्मेटिक्ससाठी इमोलियंट्स, रबर आणि इलास्टोमर्ससाठी ॲडिटिव्हचा समावेश होतो. बदलत्या पर्यावरणानुसार बहुतांशी कंपन्यांचे आता सिंथेटिक रसायनांपासून ते ओलिओ-केमिकल्सकडे संक्रमण सुरू झाले आहे आणि ओलिओ-केमिकल्सची मागणी वाढते आहे. कारण ते ग्रीन ॲडिटिव्ह आणि पर्यावरणास अनुकूल आहेत. वैविध्यपूर्ण ओलिओ केमिस्ट्री उत्पादनांमध्ये पीव्हीसी, पॉलिओलेफिन्स, स्टायरेनिक्स, पॉलिमाइड्स आणि इतर अभियांत्रिकी पॉलिमर, रबर आणि इलास्टोमर्ससाठी ॲडिटिव्हची विस्तृत श्रेणी समाविष्ट आहे.

कंपनीचे वितरण जाळे १८० हून अधिक वितरकांचे असून कंपनीची अमेरिका आणि युरोपमध्ये गोदामे आहेत. कंपनी जगभरातील ८० हून अधिक देशांमध्ये आपली उत्पादने निर्यात तसेच वितरित करते. फाइन ऑरगॅनिकच्या भारतातील उत्पादन सुविधा महाराष्ट्रातील डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, पाताळगंगा आदी ७ ठिकाणी पसरलेल्या आहेत. बंदरांच्या सान्निध्यात ते जागतिक स्तरावर ग्राहकांच्या गरजा कार्यक्षमतेने पूर्ण करू शकतात. त्यांच्या डोंबिवली आणि महापे येथील संशोधन आणि विकास केंद्रांमध्ये २० हून अधिक शास्त्रज्ञ, अभियंते आणि तंत्रज्ञ कार्यरत आहेत.

मार्च २०२३ अखेर सरलेल्या आर्थिक वर्षात कंपनीने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. कंपनीने उलाढालीत ६२ टक्के वाढ साध्य करून तो ३,०२३ कोटींवर नेला आहे. तर नक्त नफ्यात १३८ टक्के वाढ होऊन तो ६१८ कोटींवर पोहोचला आहे. यंदाच्या आर्थिक वर्षांतदेखील कंपनी उत्तम कामगिरी करून दाखवेल, अशी आशा आहे. कंपनीच्या उत्पादनांची वाढती मागणी तसेच कच्च्या मालाच्या नियमित पुरवठयासाठी कंपनीने थायलंडमध्ये प्रकल्प उभारला असून लवकरच तिथे उत्पादन सुरू होईल. या सुविधेमध्ये आणखी क्षमता वाढ करण्याबाबत निर्णय पुढील आर्थिक वर्षांत घेतला जाईल. कंपनीचा प्रमुख कच्चा माल म्हणजे वनस्पती तेले आणि त्यांचे डेरिव्हेटिव्हज, ज्यांच्या किमती अस्थिर आहेत. कंपनी ग्राहकांशी खरेदीसाठी बाजार किमतीवर आधारित अल्पमुदतीचे करार करते, ज्यामुळे कच्च्या मालाच्या किमतीतील चढ-उताराचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो.

कंपनीच्या डोक्यावर कर्ज ओझे नसलेल्या फाइन ऑरगॅनिक इंडस्ट्रीजचा हा सध्या ४,९०० रुपयांच्या आसपास समभाग तुमच्या पोर्टफोलिओला आवश्यक समावेशी वळण देण्यासाठी असायलाच हवा. सध्याची शेअर बाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचवलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्यात शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

Stocksandwealth@gmail.com