अजय वाळिंबे

१९४९ मध्ये स्थापन झालेली इंजिनीअरिंग लिमिटेड ही एक अनुभवी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी असून कंपनी मुख्यतः जलविद्युत, सिंचन आणि पाणीपुरवठा तसेच शहरी पायाभूत सुविधा आणि वाहतूक यांसारख्या क्षेत्रांमध्ये गेली अनेक वर्षं कार्यरत आहे. याबरोबरच कंपनी धरणे, पूल, बोगदे, रस्ते, पायलिंग कामे, औद्योगिक संरचना आणि इतर प्रकारच्या अवजड स्थापत्य अभियांत्रिकी कामांची कंत्राटे घेते. कंपनीने अनेक मोठे प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत. काही वर्षांपूर्वी पटेल इंजिनीअरिंग अनुत्पादित कर्जामुळे संकटात होती. मात्र करोनाकाळात कंपनीने सर्व बँकांसमवेत मालमत्ता पुनर्रचना योजनेअंतर्गत करार करून अनेक नवीन प्रकल्प हाती घेतले आहेत. कंपनी कर्ज कमी करण्यासाठी कमाई/ विक्रीवर भर देत आहे आणि तरलतेत वाढ करण्यासाठी कंपनी नामांकित कंपन्या आणि ग्राहकांसह प्रकल्पांसाठी बोली लावण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. खेळते भांडवल तसेच कर्ज कमी करण्यासाठी कंपनीने तीन महिन्यांपूर्वी समभागाचे २:१ प्रमाणात हक्कभाग विक्री प्रत्येकी ११ रुपये प्रतिसमभाग या अधिमूल्याने यशस्वीरीत्या पूर्ण केली.

nifty stock market marathi news
सेन्सेक्सची १० शतकी गटांगळी, महागाई आणि परकीय निधीच्या निर्गमनाने बाजार बेजार
Rupee depreciated by 5 paise against the dollar
ढासळता रुपया नव्या तळाला; डॉलरच्या तुलनेत ५ पैशांनी…
1115 crore IPO of Zinka Logistics from November 13 print
झिंका लॉजिस्टिक्सचा १,११५ कोटींचा ‘आयपीओ’ १३ नोव्हेंबरपासून
The pros and cons of Donald Trump victory for investors
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाचे गुंतवणूकदारांना असेही लाभ-तोटे!
Swiggy shares bid only 12 percent on day one
स्विगी समभागांसाठी पहिल्या दिवशी १२ टक्केच बोली
Sale of stake in Hindustan Zinc by Government
हिंदुस्थान झिंकमधील अडीच टक्के हिश्शाची अखेर सरकारकडून विक्री; गुंतवणूकदारांना १० टक्के सवलतीत ५०५ रुपयांना समभागांसाठी बोली शक्य
Rupee lowers as foreign investment returns to capital markets
रुपयाचा सार्वकालिक नीचांक; एक डॉलर आता ८४.११ रुपयांना
Acme Solar initial unit sale at Rs 275 to Rs 289 each
ॲक्मे सोलरची प्रत्येकी २७५ ते २८९ रुपयांना प्रारंभिक भागविक्री; निवा बुपा ‘आयपीओ’द्वारे २,२०० कोटी उभारणार!
sensex gains 335 degrees on muhurat trading day
Muhurat Trading Day: सवंत्सर २०८१ बक्कळ लाभाचे… मुहूर्ताला सेन्सेक्सची ३३५ अंशांची कमाई

कंपनीचा महसूल ईपीसी व्यवसायातून (सिव्हिल कन्स्ट्रक्शन) आणि पायाभूत सुविधा विकास आणि गृहनिर्माण व्यवसायातून मिळतो. कंपनीने कामेंग जलविद्युत प्रकल्प, एसआरएसपी कालवा प्रकल्प, रायचूर-सोलापूर पारेषण प्रकल्प, रामपूर जलविद्युत प्रकल्प, आणि इतर प्रकल्पांसह विविध भागांत उच्च उंचीचे रस्ते प्रकल्प असे विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. कंपनीचे देशांतर्गत १७ राज्यांत विविध प्रकल्प असून सर्वाधिक प्रकल्प जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये आहे. कंपनीची नेपाळमध्ये आंतरराष्ट्रीय उपस्थिती आहे. पटेल इंजिनीअरिंगने आतपर्यंत २५० हून अधिक प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत. कंपनीच्या ग्राहकांमध्ये एनटीपीसी, एनएचपीसी, एनएचएआय, सतलज जल विद्युत निगम लिमिटेड, इरकॉन, रेल विकास निगम यांचा समावेश आहे. मार्च २३ पर्यंत कंपनीकडील मागणी पुस्तक (ऑर्डर बुक) १७,८२४ कोटी होते. ६९ टक्के प्रकल्प सरकारी कंपन्यांकडून, २६ टक्के राज्य सरकारांकडून आणि उर्वरित आंतरराष्ट्रीय ग्राहकांकडून आहेत.

पटेल इंजिनीअरिंग लिमिटेड

(बीएसई कोड ५३११२०)

प्रवर्तक: रूपेन पटेल

बाजारभाव: रु.२७.३० /-

प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: इन्फ्रास्ट्रक्चर / ईपीसी

भरणा झालेले भागभांडवल: रु. ७७.३६ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक ३९.४२

परदेशी गुंतवणूकदार २.१०

बँक / म्युच्युअल फंड/ सरकार ९.२०

इतर/ जनता ४९.२८

पुस्तकी मूल्य: रु. ३७.३/-

दर्शनी मूल्य: रु. १/-

लाभांश: — %

प्रति समभाग उत्पन्न: रु. २.४०

किंमत उत्पन्न गुणोत्तर: १२.२

समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ३८

डेट इक्विटी गुणोत्तर: ०.६

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: १.५६

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोईड (आरओसीई): १४

बीटा : १.२

बाजार भांडवल: रु. २२३८ कोटी ( मायक्रो स्मॉल कॅप)

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ३०/१३

विभागनिहाय कामे –

जलविद्युत: ६५ टक्के

सिंचन: १४ टक्के

बोगदा: १३ टक्के

रस्ता: ५ टक्के

इतर: ३ टक्के

स्रोत : स्क्रीनर.कॉम

मार्च २०२३ अखेर सरलेल्या आर्थिक वर्षाची कामगिरी कंपनीने नुकतीच जाहीर केली आहे. अपेक्षेप्रमाणे कंपनीच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा झाली असून गत वर्षीच्या तुलनेत कंपनीने उलाढालीत २४ टक्के वाढ साध्य करून ती ४,२०२ कोटींवर नेली आहे. तर नक्त नफ्यात दुपटीहून अधिक होऊन तो १८४ कोटींवर पोहोचला आहे. आर्थिक निकाल जाहीर झाल्यावर कंपनीच्या समभागाच्या बाजारभावात २५ टक्के वाढ झाली आहे. मात्र सध्या असलेली प्रलंबित कामे, आगामी येऊ घातलेले प्रकल्प आणि अनुभवी प्रवर्तक यामुळे पटेल इंजिनीअरिंगची खरेदी फायद्याची ठरू शकते. अर्थात बहुतांशी प्रकल्प सरकारी असल्याने हे प्रकल्प वेळेवर पूर्ण होऊन, त्याची वेळेवर रक्कम अदा होणे खूप महत्त्वाचे असते. कंपनीचे बहुतांशी भांडवल बँकेकडे तारण आहे, त्यामुळे कंपनीवर अजूनही असलेला मोठ्या कर्जाचा बोजा हलका करणे अत्यावश्यक आहे. व्यवस्थापन या बाबतीत आशावादी असून या सर्व बाबी नियोजनानुसार आणि अपेक्षेनुसार घडल्यास सध्या २६ रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर मल्टिबॅगर ठरू शकतो. नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे निकाल म्हणूनच महत्त्वाचे असून आणि खरेदी/ विक्रीची दिशा ठरवू शकतात. सध्याची शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता हा समभाग सुचवलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने समभाग खरेदीचे धोरण ठेवावे.

Stocksandwealth@gmail.com