सारडा एनर्जी अँड मिनरल्स लिमिटेड (बीएसई कोड ५०४६१४)

संकेतस्थळ: www.seml.co.in

Bipin preet singh Success Story
Success Story : आठ लाखांच्या बचतीतून सुरू केला व्यवसाय अन् उभी केली करोडोंची कंपनी
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
mita shetty
टाटा इंडिया इनोव्हेशन फंडाची कामगिरी कशी राहील?
artificial intelligence to develop ability to create substances with specific qualities
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेतून हव्या त्या गुणधर्मांचा पदार्थ
इक्विटी म्युच्युअल फंडात ऑक्टोबरमध्ये विक्रमी ४१,८८७ कोटींचा ओघ
oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
world eyes on donald trump dealing with big tech during his second term of us president
बलाढ्य टेक कंपन्यांसाठी ट्रम्प यांच्या विजयाचा अर्थ काय ?
Loksatta article Modern capital finance-values Retail loan without salvation
लेख: वाढत्या ‘विनातारण’ सूक्ष्मकर्जांची चिंता!

प्रवर्तक: कमाल किशोर सारडा

बाजारभाव: २६७/-

प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: स्टील आणि ऊर्जा

भरणा झालेले भाग भांडवल: ३५.२४ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)प्रवर्तक ७२.६४

परदेशी गुंतवणूकदार २.६९

बँक/म्युच्युअल फंड/ सरकार ३.६१

इतर/ जनता २१.०६

पुस्तकी मूल्य: रु. १०४

दर्शनी मूल्य: रु.१/-

लाभांश: १५०%

प्रति समभाग उत्पन्न: रु. १५.६०

किंमत उत्पन्न गुणोत्तर: १७.३

समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: २४.९

डेट इक्विटी गुणोत्तर: ०.३३

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: ६.२३

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड (आरओसीई): १९.३

बीटा : १.२

बाजार भांडवल: रु. ९,४०१ कोटी (स्मॉल कॅप)

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: २८४/१०७

गुंतवणूक कालावधी : १८-२४ महिने

सुमारे ५० वर्षांपूर्वी स्थापन झालेली सारडा एनर्जी अँड मिनरल्स लिमिटेड (एसईएमएल) ही सारडा समूहाची प्रमुख कंपनी असून, ती स्टील, फेरो मिश्र धातू आणि ऊर्जा उत्पादनातील एक आघाडीची कंपनी आहे. कंपनीच्या उत्पादनात मुख्यत्वे वायर रॉड्स, एचबी वायर्स, फेरो अलॉयज, स्पंज आयर्न आणि बिलेट्सचा समावेश होतो. एक आघाडीची ऊर्जा आणि खनिज कंपनी बनण्याच्या दृष्टिकोनातून कंपनीने वर्ष २००७ मध्ये छत्तीसगढ इलेक्ट्रिसिटी कंपनी लिमिटेडचे स्वतःमध्ये विलीनीकरण केले. रायपूर, छत्तीसगड येथे मुख्यालय असलेली सारडा एनर्जी आज भारतातील फेरो अलॉयची सर्वात मोठी उत्पादक आणि निर्यातदारांपैकी एक आहे. कंपनीच्या एकूण महसुलापैकी सुमारे २६ टक्के महसूल निर्यातीतून येतो. गेल्या तीन दशकांमध्ये कंपनीने अनेक सानुकूलित मूल्यवर्धित उत्पादनांचा समावेश करण्यासाठी आपल्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये सातत्याने विविधता आणली आहे. ग्राहक केंद्रित दृष्टिकोन आणि आपल्या गुणवत्तेच्या जोरावर कंपनी आज साठहून अधिक देशांमधील ग्राहकांसाठी पसंतीची पुरवठादार बनली आहे.

हेही वाचा – ‘सेन्सेक्स’ला ७०० अंशांची झळ; ‘निफ्टी’ विक्रमी पातळीपासून माघारी

महसूल मिश्रण

फेरो अलोय – ४० टक्के

स्टील – बिलेट्स, वायर रॉड्स आणि एचबी वायर – २३ टक्के

स्पंज आयर्न – ९ टक्के

बिलेट्स – १६ टक्के

ऊर्जा – ७ टक्के

इतर – ५ टक्के

सारडा एनर्जीचे छत्तीसगड येथे दोन, सिक्कीम, वाईजाग आणि उत्तराखंड या ठिकाणी मोठे प्रकल्प आहेत. यात छत्तीसगड येथील लोहखनिज खाण (वार्षिक १५ लाख मेट्रिक टन) आणि कोळसा खाणीची वाढीव क्षमता १.६८ मेट्रिक टन करण्यासाठी अर्ज केला आहे. तसेच २४.९ मेगावॅटचा हायड्रो ऊर्जा प्रकल्प असून सिलतारा येथील थर्मल प्रकल्पाचा समावेश आहे. तसेच विझाग येथील प्रकल्पाची ८० मेगावॅट क्षमता असून उत्तराखंड येथे ४.८ मेगावॅट, गुल्लू, छत्तीसगड येथे २४ मेगावॅट तर सिक्कीम येथे ११३ मेगावॅटचे हायड्रो प्रकल्प आहेत.खनिजे: कोळसा खाण छत्तीसगड: मे २०२३ मध्ये क्षमता १.२ मेट्रिक टनवरून १.४४ मेट्रिक टनपर्यंत वाढली आणि आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये १.६८ मेट्रिक टनपर्यंत वाढली आणि टप्प्याटप्प्याने ती ५.२ मेट्रिक टनपर्यंत वाढीसाठी मंजुरी मागितली. तसेच, अधिक कार्यक्षम कोळसा वाहतुकीसाठी समर्पित रेल्वे साइडिंग उभारणे. कंपनीचे विस्तारीकरणाचे अनेक भांडवली प्रकल्प प्रगतिपथावर असून त्यात दोन कोल वॉशरी: क्षमता ०.९६ मेट्रिक टनवरून १.८ मेट्रिक टनपर्यंत वाढवण्याची प्रक्रिया सुरू आहे. छत्तीसगडमधील रेहर नदीवर २४.९ मेगावॅटचा प्रकल्प (बांधकाम सुरू झाले आहे), वायर रॉड मिलची क्षमता १.८० लाख मेट्रिक टनवरून २.५० लाख मेट्रिक टनपर्यंत क्षमता विस्तारासाठी कंपनीला मंजुरी मिळाली आहे.

तसेच शाहपूर येथे १३.४ मेट्रिक टन कोळसा खाण साठा मिळाला असून उत्खननासाठी वन विभागाकडून मंजुरी मिळाली आहे. महाराष्ट्रात लोहखनिज ब्लॉक तसेच मिनरल फायबर निर्मितीसाठी नवीन प्रकल्प होणे अपेक्षित आहे.

हेही वाचा – अदानी समूहातील सहा कंपन्यांना ‘सेबी’ची कारणे दाखवा नोटीस

कंपनीचे वार्षिक निकाल लवकरच जाहीर होणार आहेत. डिसेंबर २०२३ अखेर सरलेल्या तिमाहीमध्ये कंपनीने ९२५ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ११९ कोटी रुपयांचा नक्त नफा कमवला होता. स्टील आणि खनिज उत्पादनांची वाढती मागणी पाहता पुढील दोन वर्षे कंपनीकडून भरीव कामगिरीची अपेक्षा आहे. पायाभूत सुविधांवरील वाढता खर्च तसेच जागतिक बाजारपेठेतील स्टीलची आणि देशांतर्गत ऊर्जेची वाढती गरज या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे कंपनीच्या उत्पादनांना मोठी मागणी असेल. सध्या २६७ रुपयांना उपलब्ध असलेला हा शेअर आकर्षक खरेदी ठरेल.

शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचवलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

– अजय वाळिंबे

Stocksandwealth@gmail.com

• प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.• लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.