२०२३ या नवीन कॅलेंडर वर्षाला आज सहा महिने पूर्ण झाले असून आर्थिक वर्ष २०२३ चा हा पहिला तिमाहीचा आढावा. बहुतांशी कंपन्यांनी सरलेल्या आर्थिक वर्षाची कामगिरी जाहीर केली आहे. डॉलरच्या तुलनेत घसरता रुपया, चलनवाढ आणि जागतिक बाजारातील वाढती अनिश्चितता या प्रतिकूल घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आल्याने गुंतवणूकदारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्यातच भारतातील चलनवाढ आटोक्यात आल्याचे संकेत मिळत आहेत.
रिझर्व्ह बँकेने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ३१ मार्च २०२३ पर्यंत भारतीय बँकांनी एकूण बुडीत कर्जाचे प्रमाण ३.९ टक्क्यांपर्यंत मर्यादित राखून ते दशकभरातील नीचांकावर आहे. नक्त अनुत्पादित कर्ज केवळ १ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. जागतिक बाजारातील खनिज तेलाच्या किमतीत झालेली घट आपल्यासाठी फायद्याची असून अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने सध्या तरी व्याजदर जैसे थे ठेवले आहेत. गेल्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेची भेट यशस्वी झाली असून भारतातही मान्सून सक्रिय झाल्याने शेअर बाजारात चैतन्याचे वातावरण आहे. गेल्या दोन महिन्यात व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणारे मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांनी चांगलीच तेजी दाखवली असून सध्या मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ६४,७१८.५६ आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १९,१८३.२० या नवीन विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहेत. येत्या महिन्याभरात सेन्सेक्स किती तेजी दाखवतो ते बघणे महत्त्वाचे ठरेल. या काळात सोने आणि चांदीचे भावदेखील चढेच राहिले आहेत हे विशेष आहे. अशा वेळी पोर्टफोलियोमध्ये अनेक अँसेट क्लास का असावेत? याचे उत्तर मिळते.
हेही वाचा – बाजारातली माणसं : नातवाला सांगितलेली आजोबांची गोष्ट
आपल्या पोर्टफोलिओची सहा महिन्यांची प्रगती समाधानकारक आहे. या सहा महिन्यात वेळोवेळी गुंतवलेल्या एकूण ३७,७४५ रुपयांचे १४.६ टक्क्यांनी वाढ होऊन ३० जून रोजी त्याचे ५,०८५ रुपये नफ्यासह ३९,८३० रुपये झाले आहेत. सेन्सेक्सचा परतावा (आयआरआर) याच काळात ३६.८३ टक्के असून माझा पोर्टफोलिओचा आयआरआर ७०.६४ टक्के आहे. अर्थात शेअर बाजारात नुकत्याच आलेल्या तेजीचा हा परिणाम आहे. सध्याच्या परिस्थतीत गुंतवणूकदारांनी धारिष्ट्य दाखवून उत्तम कंपन्यांमध्ये टप्प्याटप्प्याने केलेली गुंतवणूक फायद्याची ठरते हा अनुभव आहे. संयम आणि आवश्यक तेव्हा नुकसान प्रतिबंध (स्टॉपलॉस) पद्धत अवलंबणे हिताचे ठरेल.
हेही वाचा – राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) – विश्वासार्ह बाजारमंच
माझा पोर्टफोलियोअंतर्गत सुचवलेले समभाग हे नेहमीच मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी असल्याने त्यांचे लगेचच मूल्यमापन करणे योग्य ठरणार नाही. मात्र वाचक गुंतवणूकदारांनी कायम जागरूकता दाखवून गुंतवणूक केलेल्या कंपन्यांचे आर्थिक निकाल तसेच भांडवली बाजारातील घडामोडींवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
(Stocksandwealth@gmail.com)