शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया लॅण्ड अँड ॲसेट्स लिमिटेड

(बीएसई कोड ५४४१४२)

Maharashtra no minimum support price
शेतीमालाला हमीभाव नाहीच, जाणून घ्या, हमीभाव किती, मिळणारा दर किती
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
sugar Factories, sugar commissionerate, sugar,
आजपासून कारखान्यांची धुराडी पेटणार, जाणून घ्या साखर आयुक्तालयाचा निर्णय
Mumbai Vehicle Number Purchase, Vehicle Number,
मुंबई : पसंतीच्या वाहन क्रमांकांची खरेदी कमी; महसूल जास्त, दोन महिन्यांत १० कोटी रुपयांचा महसूल
Vistara Completes Merger With Air India
‘विस्तारा’ नाममुद्रा इतिहासजमा; एअर इंडियामध्ये विलीनीकरण पूर्ण
Abhishek Lodha transferred 18 percent stake in the company to a charitable trust print eco news
आता लोढादेखील टाटांच्या दानकर्माच्या वाटेवर; धर्मादाय न्यासाला कंपनीतील १८ टक्के हिस्सा हस्तांतरित
1115 crore IPO of Zinka Logistics from November 13 print
झिंका लॉजिस्टिक्सचा १,११५ कोटींचा ‘आयपीओ’ १३ नोव्हेंबरपासून
Dnyanradha Multi State Co Operative Credit Society, fraud case, ED
ईडीकडून ३३३ कोटींच्या मालमत्तेवर टाच

वेबसाइट: http://www.scilal.com
प्रवर्तक: भारत सरकार

बाजारभाव: रु. ८६ /-

प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: मालमत्ता व्यवस्थापन

भरणा झालेले भाग भांडवल: रु. ४६५.८० कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक ६३.७५
परदेशी गुंतवणूकदार २.४५

बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार ७.०१
इतर/ जनता २६.८०

हेही वाचा…पुस्तके वाचणारा शेअर दलाल : मोतीलाल ओसवाल

पुस्तकी मूल्य: रु. ५९.७
दर्शनी मूल्य: रु.१०/-
लाभांश: –%
प्रति समभाग उत्पन्न: रु. १.०२
किंमत उत्पन्न गुणोत्तर: ८४.४
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ३५.८
डेट इक्विटी गुणोत्तर: ००

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: ५,५११
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोइड (आरओसीई): १.७२
बीटा : १.५
बाजार भांडवल: रु. ४,०१२ कोटी (स्मॉल कॅप)

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ८९/३६

गुंतवणूक कालावधी : २४-३६ महिने

हेही वाचा…शेअर बाजार कुठवर जाणार? 

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एससीआय) या नवरत्न कंपनीबद्दल सर्वांनाच माहिती असेल. मात्र गेल्याच वर्षी, मार्च २०२३ मध्ये अस्तित्वात आलेल्या शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लँड अँड ॲसेट्स (स्कीला) या कंपनीबद्दल अजून बऱ्याच गुंतवणूकदारांना फारशी माहिती नाही. चार वर्षांपूर्वी सरकारने एससीआयचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यातील ‘नॉन कोअर’ अर्थात मुख्य व्यवसायाव्यतिरिक्त अन्य गौण व्यवसायातील मालमत्ता दुसऱ्या कंपनीत हस्तांतरित करण्याचा निर्णय झाला. कंपनीची निर्गुंतवणूक प्रक्रिया प्रभावी, कार्यक्षम आणि जलद रीतीने सुलभ करण्यासाठी तसेच व्यवसाय-मालमत्तेचे मूल्य मिळवण्यासाठी आणि ज्याचे मूल्य परावर्तित होत नाही अशा ‘नॉन-कोअर’ मालमत्ता या नवीन कंपनीत हस्तांतरित करण्याचा निर्णय झाला. विलगीकरणाची संपूर्ण प्रक्रिया आणि न्यायालयाची मंजूरी मिळाल्यानंतर अखेर शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लँड अँड असेट्स या कंपनीची स्थापना झाली. एससीआयच्या सर्व भागधारकाना १:१ (एकास एक) प्रमाणात नवीन कंपनीचे शेअर मिळाले.

हेही वाचा…सेन्सेक्स’ ८०,०४९ अंशांच्या नव्या शिखरावर; निफ्टीची २४,४००ला गवसणी

हे विभाजन का करण्यात आले? एससीआयचे निर्गुंतवणुकीकरण करताना सरकारने फक्त शिपिंग व्यवसाय स्वतंत्र म्हणून विकून टाकायचा निर्णय घेतला. तसेच एससीआयचे इतर व्यवसाय (नॉन-कोअर अर्थात मुख्य व्यवसायाचा भाग नसलेले) पुनर्गुंतवणूक प्रक्रियेचा एक भाग म्हणून एका वेगळया कंपनीत हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या विभाजनामुळे दोन्ही कंपन्या आपापल्या व्यवसायांवर अधिक लक्ष केंद्रित करतील आणि सरकारला इच्छित धोरणात्मक खरेदीदार शोधणे सोपे जाईल. सामान्यतः, खरेदीदारांद्वारे मुख्य व्यवसायावर लक्ष केंद्रित करणे पसंत केले जाते. या धोरणात्मक विक्री प्रक्रियेचा एक भाग म्हणून, सरकारने एससीआयच्या मुंबईतील स्थावर मालमत्ता – शिपिंग हाऊस, एक १९ मजली इमारत, आणि मेरीटाईम ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तसेच काही इतर इतर मालमत्ता विलग ठेवल्या. एससीआयच्या ताळेबंदानुसार, ३१ मार्च २०२२ पर्यंत स्वतंत्र कंपनीत विलगीकरणासाठी निवडलेल्या या नॉन-कोर मालमत्तेचे मूल्य सुमारे २,४०० कोटी रुपये होते.

कंपनी सध्या तरी हस्तांतरित मालमत्तांच्या व्यवस्थापनाखेरीज अन्य कुठल्याही व्यवसायात नाही. तसेच मालमत्ता हस्तांतराची प्रक्रिया अजूनही चालू आहे. कंपनीची गुणोत्तरे आकर्षक अर्थातच नाहीत. मात्र सरकारने निर्गुंतवणुकीबरोबरच ‘ॲसेट्स मॉनेटायझेशन’बद्दल अनेकवेळा सूतोवाच केले आहे. अवलंबलेल्या धोरणानुसार, आगामी कालावधीत या धोरणाचा एससीआयएलए सारख्या कंपन्यांना फायदा होऊ शेकल. अर्थात ही प्रक्रिया राबवणे तितकेसे सोपे नाही आणि या करता प्रदीर्घ वेळ लागू शकतो, हे ही इथे लक्षात घ्यायला हवे.
शेअर बाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सध्याच्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

हेही वाचा…गणेश ग्रीन भारतची शुक्रवारपासून प्रत्येकी १८१ ते १९० रुपयांनी भागविक्री

Stocksandwealth@gmail.com

वरील लेख केवळ विश्लेषणात्मक संशोधन असून तो गुंतवणूक सल्ला नाही.

प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या ०.१ टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.