एस पी ॲपॅरल्स लिमिटेड

(बीएसई कोड ५४००४८)

Bipin preet singh Success Story
Success Story : आठ लाखांच्या बचतीतून सुरू केला व्यवसाय अन् उभी केली करोडोंची कंपनी
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
balmaifal article loksatta
बालमैफल: स्वच्छ सुंदर सोसायटी…
maharashtra winter updates
स्वेटर, शॉल शोधलीत का…? कारण, उद्यापासून हुडहुडी…
Lucknow NGO helps underprivileged children make Sabyasachi-inspired clothes; the designer reacts
झोपडपट्टीतील मुला-मुलींनी तयार केला सब्यसाची-प्रेरित ब्रायडल कलेक्शन! स्वत:च मॉडेलिंग करत केले हटके फोटोशूट, पाहा Video Viral
Eknath Shinde bag checking
CM Eknath Shinde : “बॅगेत फक्त कपडे, युरिन पॉट…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याही सामानांची तपासणी!
Germanys Warren Buffett Karl Hellerding
जर्मनीचा वॉरेन बफे : कार्ल हेलरडिंग
1115 crore IPO of Zinka Logistics from November 13 print
झिंका लॉजिस्टिक्सचा १,११५ कोटींचा ‘आयपीओ’ १३ नोव्हेंबरपासून

वेबसाइट: www.spapparels.com

प्रवर्तक: पी सुंदरराजन

बाजारभाव: रु. ६८०/-

प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: वस्त्रोद्योग/ गार्मेंट्स

भरणा झालेले भाग भांडवल: रु. २५.०९ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक ६१.९३

परदेशी गुंतवणूकदार १.५३

बँकस्/ म्युच्युअल फंड्स/ सरकार १८.८७

इतर/ जनता १७.६७

पुस्तकी मूल्य: रु. ३०४

दर्शनी मूल्य: रु.१०/-

लाभांश: –%

प्रति समभाग उत्पन्न: रु. ३५.७

किंमत उत्पन्न गुणोत्तर: १९.१

समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ३२

डेट इक्विटी गुणोत्तर: ०.२७

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: ७.२९

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड: १४.६

बीटा : १.१

बाजार भांडवल: रु. १,७११ कोटी (स्मॉल कॅप)

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ७१०/ ४२९

गुंतवणूक कालावधी: १८-२४ महिने

हेही वाचा >>>परदेशी गुंतवणूक ओघाने, निर्देशांकांची उच्चांकी झेप

वर्ष १९८९ मध्ये स्थापना झालेली एस पी ॲपॅरल्स ही लहान मुलांसाठी विणलेल्या कपड्यांची एक आघाडीची उत्पादक आणि निर्यातदार कंपनी आहे. एकात्मिक सुविधा असलेली एस पी ॲपॅरल्स फॅब्रिकपासून ते बॉडीसूट, स्लीप सूट, टॉप आणि बॉटम्ससह तयार उत्पादनांपर्यंत कपड्यांचे उत्पादन पुरवते. कंपनीच्या भारतात १८ एकात्मिक उत्पादन सुविधा असून त्यांत प्रामुख्याने कताई, विणकाम आणि डाईंगपासून ते इन-हाउस सुविधांद्वारे कपडे पाठवण्यापर्यंतच्या सुविधा आहेत. कंपनीचे सर्व प्रकल्प दक्षिण भारतातील तिरुपूरजवळ असल्याने कंपनीला कुशल कामगारांसाठी सहज उपलब्धता तसेच आवश्यक कच्चा माल आणि आंतरराष्ट्रीय बंदराची जवळीक यासारखे अनेक फायदे होतात.

कंपनीचे कामकाज दोन प्रमुख विभागात चालते, यांत गारमेंट आणि रिटेल विभाग यांचा समावेश होतो. गारमेंट विभागात कंपनी भारतातील लहान मुलांसाठी विणलेले तसेच इतर तयार कपडे उत्पादित करते. कंपनी या विभागात अग्रगण्य उत्पादक आणि प्रमुख मोठ्या निर्यातदारांपैकी एक आहे. किरकोळ विभाग म्हणजे एस पी रिटेल व्हेंचर्स लिमिटेड ही एक स्वतंत्र उपकंपनी असून तिच्या पोर्टफोलिओअंतर्गत मुलांचा गारमेंट ब्रॅण्ड (एंजल आणि रॉकेट), तरुण महिला वर्गासाठी नतालीया तसेच हेड आणि क्रॉकोडाइल हे आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड आहेत. कंपनीच्या ब्रॅण्ड पोर्टफोलियोसाठी कंपनीची अनेक स्टोअर्स असून ‘क्रॉकोडाइल’ या सुप्रसिद्ध ब्रॅंडअंतर्गत ५४ स्टँडअलोन स्टोअर्स आहेत, तर ‘एंजल आणि रॉकेट’साठी ४९ मोठी फॉरमॅट स्टोअर्स आणि ४ स्टँडअलोन स्टोअर्स आहेत. कंपनीने युरोप तसेच ब्रिटन आणि आयरलॅंडमध्ये विपणन संधी शोधण्यासाठी एसपी- यूके ही कंपनी स्थापन केली. तसेच कंपनी लवकरच श्रीलंकेत आपला प्रकल्प सुरू करत असून श्रीलंकेच्या ड्युटी-फ्री दर्जामुळे अतिरिक्त व्यवसाय येण्याची अपेक्षा आहे. कंपनीच्या एकूण महसुलापैकी सुमारे ८६ टक्के निर्यातीमधून असून १४ टक्के देशांतर्गत विक्रीमधून आहे. कंपनीने चेन्नईजवळ ‘यंग ब्रॅण्ड ॲपॅरल्स’ ही गारमेंट कंपनी ताब्यात घेऊन पुरुष, स्त्रिया तसेच लहान मुलांसाठी इनरवेअर सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे. आपल्या उत्पादनांची वाढती मागणी लक्षात घेता कंपनी आपल्या शिवकाशी येथील प्रकल्पाचा विस्तार करत आहे.

हेही वाचा >>>निर्देशांकांची उच्चांकी दौड कायम; सेन्सेक्स त्रिशतकी खेळीसह विक्रमी ७७,३०१ अंशांवर

मार्च २०२४ साठी संपलेल्या आर्थिक वर्षाकरिता कंपनीने अपेक्षित कामगिरी करून दाखवली आहे. या काळात कंपनीने १,०८७ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ८९.७ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. तर मार्च २०२४ साठी संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने २९५ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २८.५ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षातील तिमाहीच्या तुलनेत तो ३८ टक्क्यांनी अधिक आहे. कंपनीच्या उत्पादनांची वाढती मागणी पाहता आगामी कालावधीत कंपनीकडून भरीव कामगिरीची अपेक्षा आहे. तसेच येत्या अर्थसंकल्पात वस्त्रोद्योग क्षेत्राला चालना मिळण्याची शक्यता आहे. सध्या ६०० रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर मध्यम कालावधीसाठी आकर्षक वाटतो.

शेअर बाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचविलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

– अजय वाळिंबे

Stocksandwealth@gmail.com

• प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या १ टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेले नाही.

• लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.