सिम्फनी लिमिटेड

(बीएसई कोड ५१७३८५)

संकेतस्थळ : http://www.symphonylimited.com

got elected four times through evms supriya sule on evm tampering allegations by congress
चार वेळा निवडून आले ईव्हीएमवर संशय कसा घेऊ? खासदार सुप्रिया सुळे यांचे विधान
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
red sanders smuggling
Pushpa Box Office Collection : चंदन तस्करीवर बेतलेल्या ‘पुष्पा’नं कमवले १५०० कोटी; पण खऱ्याखुऱ्या रक्तचंदनाला मात्र ग्राहकच नाही
Rizwan Sajan Success Story
Success Story: १६ व्या वर्षी उदरनिर्वाहासाठी विकले दूध, आता आहेत दुबईतील सर्वात श्रीमंत भारतीय
Bogie - Vogie Restaurant, Restaurant at Akurdi Railway Station, Pimpri , Akurdi ,
पिंपरी : आकुर्डी रेल्वे स्थानक येथे ‘बोगी – वोगी’ रेस्टॉरंट
amit shah inaugurates 10000 newly formed multipurpose pacs
प्रत्येक गावात बहुउद्देशीय संस्थाच केंद्रीय सहकार मंत्र्यांची घोषणा, ३२ प्रकारच्या व्यवसायांची मुभा
11 thousand crores to BEST in the last decade Mumbai Municipal Corporation administration rejects allegations of treating the initiative with contempt Mumbai print news
गेल्या दशकात ‘बेस्ट’ला ११ हजार कोटी; उपक्रमाला सापत्न वागणूक दिल्याचा आरोप मुंबई महानगरपालिका प्रशासनाला अमान्य
buldhana vidarbha
निर्यात क्षेत्रात ‘हा’ जिल्हा पश्चिम विदर्भात अव्वल; ४६५ कोटींची निर्यात

प्रवर्तक: अचल बाकेरी
बाजारभाव: रु. १११३/-

प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: एअर कूलर

भरणा झालेले भागभांडवल: रु. १३.७९ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक ७३.३८
परदेशी गुंतवणूकदार ४.८३

बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार ९.९८
इतर/ जनता ११.८१

पुस्तकी मूल्य: रु. १०८.६
दर्शनी मूल्य: रु.२/-
लाभांश: ६५०%
प्रति समभाग उत्पन्न: रु. २१.८

किंमत उत्पन्न गुणोत्तर: ५१.४
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ९०
डेट इक्विटी गुणोत्तर: ००

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: १९.३
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोइड (ROCE): १९
बीटा : ०.५
बाजार भांडवल: रु. ७६८० कोटी (स्मॉल कॅप)

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: १२९०/८२०

गुंतवणूक कालावधी : २४ महिने

हेही वाचा…नफावसुलीमुळे ‘सेन्सेक्स’ ८० हजारांखाली; निर्देशांक विक्रमी उच्चांकी पातळीपासून माघारी 

सिम्फनी म्हटले की, डोळ्यांसमोर येतात ते वॉटर कूलर. सिम्फनीची स्थापना वर्ष १९८८ मध्ये अहमदाबाद येथे झाली. कंपनी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक एअर कूलरची जगातील सर्वात मोठी उत्पादक कंपनी आहे. कंपनीच्या एकूण महसुलापैकी सुमारे ९७ टक्के महसूल एअर कूलरच्या विक्रीतून येतो. सिम्फनी लिमिटेड बाष्पीभवन एअर कूलरमध्ये जागतिक आघाडीवर आहे. कंपनी घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक एअर कूलरचा समावेश असलेल्या उत्पादन श्रेणीसह प्रत्येक शीतकरण गरज पूर्ण करते. गेल्या आर्थिक वर्षापर्यंत कंपनीच्या नावावर ९७ डिझाइन, २० कॉपीराइट, ५५ पेटंट आणि ४१७ ट्रेडमार्क आहेत. सिम्फनीने आजतागायत जगभरात २.५ कोटींहून अधिक एअर कूलरची विकी केली आहे. गेल्याच वर्षी कंपनीने १९ नवीन मॉडेल बाजारात आणले असून त्यांत २ प्रमुख टेबल-टॉप मॉडेलचाही समावेश आहे. हे मल्टी-फॉरमॅट कूलिंग सोल्यूशनदेखील पुरवते.

एअर कूलर उद्योग संघटित आणि असंघटित बाजारपेठांमध्ये विभागलेला आहे. संघटित बाजारपेठ एकूण बाजारपेठेच्या ३० टक्क्यांपैकी असून यापैकी सिम्फनीचा बाजारातील हिस्सा ५० टक्के आहे. कंपनीच्या एकूण महसुलापैकी ६६ टक्के भारतात तर ३४ टक्के निर्यातीतून आहे. कंपनीचा उत्तर अमेरिकेत एक उत्पादन प्रकल्प आहे.

हेही वाचा…Stock Market Update: ‘सेन्सेक्स’चे चार शतकी तेजीसह विक्रमी शिखर

कंपनीची वितरण व्यवस्था मजबूत असून हजारांहून अधिक वितरक कार्यरत आहेत. गेल्या ८ वर्षांत कंपनीने पाच हजारांहून अधिक शहरांमध्ये आपली उपस्थिती वाढवली आहे. तसेच जगभरातील साठहून अधिक देशांमध्येही सिम्फनीची उपस्थिती आहे. सिम्फनीने गेल्या काही वर्षांत मेक्सिको, चीन, ब्राझील, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये आपल्या उपकंपन्या स्थापन केल्या आहेत. कंपनीचे मास्टर कूल, आर्क्टिक सर्कल, केआय, बोनायर, सेलेअर, आयराझोना, ट्रॅव्हल आयर, दादांको इ. जागतिक नाममुद्रा आहेत. कंपनीची उत्पादने सर्वच आघाडीच्या दालनांमध्ये उपलब्ध असून त्यात इलेक्ट्रिक (यूएस), लिअर कॉर्पोरेशन (यूएस), आणि वॉलमार्ट (यूएस) व्यतिरिक्त सीअर्स, मेट्रो, कॅरेफोर, लोवे आणि होम डेपोचा समावेश होतो.

कंपनीने वर्षभरात भारतामध्ये अनेक प्रतिष्ठित प्रकल्प राबवले आहेत. यात प्रामुख्याने अपोलो फार्मसीचे ४०,००० चौरस फुटांचे गोदाम, अमेझॉनचे लखनौ सॉर्टिंग सेंटर, दिल्ली पब्लिक स्कूल, गोदरेज, मार्बल आणि सुप्रीम इंडस्ट्रीज इत्यादींचा समावेश आहे.

हेही वाचा…‘बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना’ (भाग २)

गेल्या आर्थिक वर्षांत कंपनीने १,१५६ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १५० कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. लवकरच कंपनीचे पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर होतील. भारतासारख्या देशात सिम्फनीसारख्या कंपनीच्या उत्पादनांना वाढती मागणी आहे. अनुभवी प्रवर्तक, उत्तम गुणवत्ता आणि वैविध्यपूर्ण उत्पादने यामुळे आगामी काळात कुठलेली कर्ज नसलेल्या सिम्फनीचा आलेख चढता राहील यांत शंका नाही. शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सध्याच्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो. म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

Story img Loader