अजय वाळिंबे
भांडवली बाजाराने मावळत असलेल्या २०२३ सालात गुंतवणूकदारांच्या पदरी २० टक्क्यांचा भरीव परतावा दिला. शिवाय गुंतवणूकदारांसाठी हे सलग आठवे वर्ष लाभाचे राहिले. सेन्सेक्स आणि निफ्टी या वर्षभरात अनुक्रमे १८ टक्के आणि १९.६ टक्क्यांनी वाढले. तर व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या, बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅप निर्देशांकात अनुक्रमे ४३ टक्के आणि ४६ टक्क्यांची मोठी झेप या वर्षाने अनुभवली.
सरत्या २०२३ या वर्षाने गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये तब्बल ८१.९० लाख कोटी रुपयांची भर घातली. किरकोळ गुंतवणूकदारांच्या मोठ्या सहभागाने २०२३ मध्ये शेअर बाजारातील तेजीला चालना देण्यात प्रमुख भूमिका बजावली. वर्ष २०२३ मध्ये सेन्सेक्सने ११,३९९.५२ अंशांची म्हणजेच १८.७३ टक्क्यांनी उसळी मारली. मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल यावर्षी ८१,९०,५९८ कोटी रुपयांनी वाढून ३६४.२८ लाख कोटी रुपयांच्या सर्वोच्च उच्चांकावर पोहोचले आहे.
आणखी वाचा-भारतीय गुंतवणूकदारांच्या जोरावर शेअर बाजार आत्मनिर्भर
पोर्टफोलियोचा वार्षिक आढावा- २०२३
‘माझा पोर्टफोलियो’ अंतर्गत सुचवलेले शेअर हे नेहमीच मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी असल्याने त्यांचे लगेचच मूल्यमापन करणे योग्य ठरणार नाही. मात्र वाचक गुंतवणूकदारांनी कायम जागरूकता दाखवून गुंतवणूक केलेल्या कंपन्यांचे आर्थिक निकाल तसेच शेअर बाजारातील घडामोडींवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
Stocksandwealth@gmail.com