इस्रायल-हमास युद्ध, अमेरिकेत सरकारी कर्जरोख्यांचा (बाॅण्डचा) परतावा पाच टक्क्यांवर झेपावणे, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील संभाव्य नोकरकपात अशी तेजीसाठीच्या प्रतिकूल परिस्थितीतही निफ्टी निर्देशांक १९,०००चा स्तर राखत होता. किंबहुना १९,००० च्या स्तराभोवती जास्तीत जास्त वेळ व्यतीत करण्याच्या, या प्रक्रियेला आपण ‘सबुरीचं धोरण’ संबोधू शकतो. या सबुरीच्या धोरणानंतर संधी मिळताच, निफ्टी निर्देशांकाने १९,८०० वर झेपावण्याच्या कृतीतून निफ्टीची तेजीच्या पायवाटेवरची श्रद्धा दिसून येते. वरील निराशाजनक घटनांमध्ये देखील निफ्टी निर्देशांक १९,००० चा स्तर राखेल, याबद्दल विश्वास वाटत होता. निफ्टी निर्देशांकाने १९,८०० चा पल्ला गाठून, या विश्वासाला आत्मविश्वासात रूपांतरित केले. या पार्श्वभूमीवर या आठवड्याच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव: सेन्सेक्स : ६५,९७०.०४ / निफ्टी: १९,७९४.७०

Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Fair Play Betting App, IPL Broadcast , ED ,
फेअर प्ले बेटिंग अ‍ॅप आयपीएल बेकायदा प्रक्षेपण प्रकरण: ईडीकडून आतापर्यंत ३३५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
Prices will increase due to reduced arrival of chillies Nandurbar news
यंदा लाल तिखटाचा भडका उडणार; मिरचीची आवक घटल्याने दर वाढणार
share market Major indices, share market ,
स्फुरणाअभावी निर्देशांकांना सुस्ती
Nagpur Mahanagarapalika Bharti 2025: total 245 vacancy available for these posts Nagpur Mahanagarpalika Bharti Form Apply
नागपूर महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; १ लाख २२ हजारांपर्यंत मिळणार पगार; जाणून घ्या अर्ज कसा करायचा?
A photo representing gold investment.
Gold Investment : सोने गुंतवणूकदारांची चांदी, २०२४ मध्ये मिळवला २७ टक्के परतावा; भविष्यातही सोने चकाकणार

गेल्या लेखात नमूद केल्याप्रमाणे… आताच्या घडीला निफ्टी निर्देशांकावर १९,४५० ते १९,६५० या २०० अंशांच्या परिघाला ‘अनन्यसाधारण महत्त्व’ असून निफ्टी निर्देशांक सातत्याने १९,६५० च्या स्तरावर १५ दिवस टिकल्यास निफ्टी निर्देशांकाचे प्रथम वरचे लक्ष्य १९,९५० आणि द्वितीय वरचे लक्ष्य २०,२५० असेल. सरलेल्या सप्ताहात २३ नोव्हेंबरचा निफ्टी निर्देशांकाचा उच्चांक १९,८७५ होता जो १९,९५० च्या समीप होता. डिसेंबरमधील पाच राज्यातील विधानसभांच्या निवडणुकांचे प्रत्यक्ष निकालांचे चांगले-वाईट पडसाद लक्षात घेता, निफ्टी निर्देशांकाने १९,१५० चा स्तर राखल्यास, निफ्टी निदेशांक मंदीच्या गर्तेतेतून बाहेर पडून निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य २०,८०० असेल.
शिंपल्यातील मोती

नॅशनल ऑरगॅनिक केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड (नोसिल)

शुक्रवार, २४ नोव्हेंबरचा भाव : २३९.७५ रु.

रसायन उद्योगात १९७५ पासून कार्यरत असलेली अरविंद मफतलाल उद्योगसमूहाची ध्वजाधारी कंपनी ‘नोसिल लिमिटेड’ हा समभाग आपला आजचा ‘शिंपल्यातील मोती’ असणार आहे.

रसायन उद्योगाला गेल्या दोन वर्षांपासून मंदीचा सामना करावा लागत आहे. यात प्रथितयश अशा आरती इंडस्ट्रीज, बालाजी अमाइन्स, हेरंबा इंडस्ट्रीज, अतुल लिमिटेड या कंपन्या येतात. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे हे क्षेत्र मंदीने ग्रासले असले तरी नोसिल लिमिटेड ही कंपनी नफ्यात आहे. आर्थिक आघाडीवर, दोन आर्थिक वर्षातील जुलै ते सप्टेंबर तिमाहीतील कामगिरीचा तुलनात्मक आढावा घेतल्यास विक्री ३८९.२३ कोटींवरून, ३५०.८८कोटी, तर करपूर्व नफा ४८.६७ कोटींवरून, ३५.९५ कोटी रुपये आणि निव्वळ नफा ३५.९१ कोटींवरून २६.८७ कोटींवर घसरला आहे. ही आकडेवारी मंदीची साक्ष देत आहे.

‘नोसिल लिमिटेड’ या समभागाचे आलेख वाचन करता समभागाने आपल्याभोवती २२० ते २५० रुपये असा ३० रुपयांचा परीघ निर्माण केला आहे. भविष्यात नोसिल लिमिटेडचा समभाग २५० रुपयांवर सातत्याने १५ दिवस टिकल्यास समभाग मंदीच्या गर्ततेतून बाहेर आला असे समजून अल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांनी या स्तरावर खरेदी करावा. समभागाचे अल्प मुदतीचे वरचे लक्ष्य अनुक्रमे २७५ ते २९० असेल. दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारांनी समभागातील घसरणीत २३० ते २०० च्या दरम्यान हा समभाग खरेदी करावा. दीर्घ मुदतीचे प्रथम वरचे लक्ष्य ३२५ ते ३५० रुपये तर द्वितीय लक्ष्य ४४० रुपये असेल. या दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीला १९० रुपयांचा ‘स्टॉप लॉस’ ठेवावा.

महत्त्वाची सूचना: वरील समभागात लेखकाची स्वतःची, अथवा जवळच्या नातेवाईकांची गुंतवणूक नाही. वरील समभागाचे तटस्थ दृष्टीने परीक्षण करून ते वाचकांना सादर केलेले आहे.

चिकित्सा ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ संकल्पनेची

हल्ली कामाच्या धकाधकीत गुंतवणूकदारांना इच्छा असूनही आपल्या समभाग संचाकडे (पोर्टफोलिओकडे) लक्ष द्यायला वेळ मिळत नाही आणि त्यात कंपन्यांचे तिमाही वित्तीय निकाल हे महत्त्वाचे वळणबिंदू (टर्निंग पाॅइंट) असतात. शिवाय हल्ली होते काय तर कंपनीचे तिमाही वित्तीय निकाल नितांत सुंदर पण निकाल जाहीर झाल्यावर, त्या कंपनीचा भांडवली बाजारातील समभागाचा भाव गडगडतो. याच्या बरोबर उलट जाहीर झालेला वित्तीय निकाल निराशाजनक पण भांडवली बाजारातील समभागाच्या किमतीत तात्पुरती अल्पशी अशी घसरण होऊन नंतर भरीव सुधारणा होते, मग खरे काय? या गोंधळाच्या परिस्थितीत गुंतवणूकदारांच्या पैशांची हेळसांड होऊ नये म्हणून गुंतवणूकदारांसाठी तांत्रिक विश्लेषण, मूलभूत विश्लेषणामधील सोनेरी संकल्पना (गोल्डन रूल) एकत्र करून, त्यावर अभ्यास करून गुंतवणूकदारांसाठी साधी, सोपी अशी ‘निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ ही संकल्पना विकसित केली आहे.

प्रत्यक्ष निकालानंतर समभागाचा बाजारभाव ‘महत्त्वाच्या केंद्रबिंदू स्तराच्या वर’ पाच दिवस टिकून राहण्यास यशस्वी ठरल्यास जाहीर झालेला निकाल चांगला, तो समभाग राखून ठेवावा अथवा अल्पमुदतीसाठी खरेदी करून नमूद केलेले वरचे लक्ष्य साध्य झाल्यावर नफारूपी विक्री करावी. निकालानंतर समभागाचा भाव ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ राखण्यास अयशस्वी ठरल्यास, समभागाच्या खरेदीपासून काहीकाळ दूर राहावे. गुतंवणूकदारांसाठी विकसित केलेली ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर संकल्पना’ काळाच्या कसोटीवर उतरली का? व त्याची चिकित्सा हा ‘सूर्य हा जयंद्रथ’ या न्यायाने होणे गरजेचे आहे.

त्यासाठी या स्तंभातील २४ जुलैच्या लेखात पायाभूत क्षेत्रातील लोखंड, पोलाद /स्टील उद्योगातील अग्रणी ‘टाटा स्टील’ समभागाचा निकालपूर्व आढावा घेतलेला होता. तिमाही वित्तीय निकालाची नियोजित तारीख ही २४ जुलै होती. २१ जुलैचा बंद भाव ११६ रुपये होता. व निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर ११४ रुपये होता. जर निकाल उत्कृष्ट असेल तर ११४ रुपयांचा स्तर राखत प्रथम वरचे लक्ष्य १२४ रुपये व १३४ रुपयांचे द्वितीय वरचे लक्ष्य सूचित केले होते. प्रत्यक्ष निकालानंतर गुंतवणूकदारांनी महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर ११४ रुपयांभोवती लक्ष्य केंद्रित करून भांडवली बाजारातील समभागाच्या वाटचालीचा आढावा घेऊ या. टाटा स्टीलने ११४ रुपयांचा स्तर राखत प्रथम वरचे लक्ष्य १२४ रुपयांचे १ ऑगस्टला साध्य केले. प्रथम वरचे लक्ष्य साध्य केल्यानंतरच्या नफारूपी विक्रीतील घसरणीत टाटा स्टीलने पुन्हा ११४ रुपयांचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तराचा आधार घेत, पुन्हा खरेदीची संधी देत टाटा स्टीलने पुन्हा उसळी घेत प्रलंबित असलेले १३४ रुपयांचे द्वितीय वरचे लक्ष्य १८ सप्टेंबरला १३५ रुपयांचा उच्चांक मारत साध्य करत अल्पमुदतीची गुंतवणूक धारणा असलेल्या गुंतवणूकदारांना १५ टक्क्यांचा परतावा दिला. यात अधोरेखित करायचा मुद्दा गेल्या चार महिन्यांतील प्रत्येक घसरणीत, टाटा स्टीलने ११४ रुपयांभोवती गुंतवणुकीची वीण रचत, गुंतवणुकीवर किमान १५ टक्क्यांचा परतावा दिला. ही ११४ रुपयांची वीण एवढी घट्ट होती की प्रत्येक घसरणीत ज्यात २४ जुलै, १७ ऑगस्ट, २ नोव्हेंबरची घसरण अभिप्रेत आहे त्या प्रत्येक घसरणीत टाटा स्टीलने सातत्याने ११४ रुपयांचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर राखत, टाटा स्टीलचा २४ नोव्हेंबरचा बंद भाव १२५ रुपये आहे.

आशीष ठाकूर

लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती:– शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित लक्ष्य या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Story img Loader