देशांतर्गत शेअर बाजारात दिवसागणिक रेकॉर्डब्रेक तेजी पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सेन्सेक्स नवनवी विक्रमी उंची गाठत असून, निफ्टी, सेन्सेक्स आणि मिडकॅपमध्ये विक्रमी गती दिसून आली आहे. यापूर्वीही ट्रेडिंग सत्रांमध्ये निफ्टीने नवीन शिखर गाठले होते. जागतिक मंदी, महागाई आणि चढे व्याजदर अशा समस्यांनी जगभरातील बाजारपेठा ग्रासलेल्या असताना भारतीय शेअर बाजारात ही तेजी पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे रामदेव अग्रवाल यांनी सूचक विधान केलं आहे. येत्या पाच वर्षांत निफ्टी आणि सेन्सेक्स दुप्पट होणार असल्याचं ते म्हणाले आहेत.

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे रामदेव अग्रवाल यांची CNBC TV18ने एक मुलाखत घेतली, त्या मुलाखतीत ते बोलत होते. पुढील पाच वर्षांत निफ्टी आणि सेन्सेक्स दुप्पट होताना आपल्याला पाहायला मिळणार असून, गुंतवणूकदारांनी अजूनही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण बाजार सध्याच्या पातळीपासून पुन्हा खालीसुद्धा घसरू शकतो.

हेही वाचाः ६.५ कोटी EPFO सदस्यांसाठी खुशखबर! लवकरच पीएफ खात्यावर जमा होणार ८.१५ टक्के व्याजदर

” खरं तर पुढील पाच वर्षांसाठी आम्ही निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये लक्षणीय उच्चांक पाहणार आहोत, हे मी आताच सांगतोय,” असंही ते म्हणालेत. “तुम्ही सावध असणे गरजेचे आहे, कारण तुम्ही कोणत्याही किमतीला काहीही शेअर्स खरेदी करू शकत नाही आणि तुम्ही नक्की काय खरेदी करीत आहात याची काळजी घ्यावी लागेल,” असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

अग्रवाल पुढे म्हणाले की, किरकोळ खरेदीदार आणि परदेशी गुंतवणूकदार दोघेही सध्याच्या बाजारातील तेजीत योगदान देत आहेत. ” परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांना (FIIs) आता त्यांनी जे विकले त्यातच खरेदी करायची आहे आणि नंतर त्यांना ते टॉप अप करायचे आहे, कारण जागतिक स्तरावर भारत ही सर्वात महत्त्वाची बाजारपेठ आहे,” असं गुंतवणूकदारांचं म्हणणं असल्याचंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचाः Money Mantra : म्युच्युअल फंड SIP मध्ये तुमचे नशीब चमकण्याची शक्यता, अशी करा गुंतवणूक अन् मजबूत फायदा मिळवा

गेल्या काही दिवसांपासून सेन्सेक्स विक्रमी उच्चांकांची शिखरं पादाक्रांत करीत आहे आणि जुलैच्या सुरुवातीला सेन्सेक्स ६७,००० च्या वर पोहोचला होता, तर निफ्टीने प्रथमच २०,००० च्या जवळपास मजल मारली होती. मान्सूनची चांगली प्रगती, भारत इंकची चांगली कमाई आणि मिश्र जागतिक संकेत असूनही स्थिर विदेशी भांडवल प्रवाह सेन्सेक्सने हा उच्चांक गाठला होता. शिवाय गुंतवणूकदार झोमॅटो आणि पेटीएम यांसारख्या नव्या युगातील कंपन्यांवर पैसे लावत आहेत आणि त्यांचे उत्स्फूर्त मूल्यांकन पाहिले तरी नव्या युगातील कंपन्यांना पारंपरिक पद्धतीने नफा खेचून आणणे थोडे कठीणच आहे, असंही ते सांगतात.

Story img Loader