Bank Nifty Crashed By 800 Points : भारतीय शेअर बाजारामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ उतार पाहायला मिळत आहेत. अशात शुक्रवारी प्रमुख भारतीय शेअर बाजार निर्देशांक मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. प्रमुख निर्देशांकांपैकी बँक निफ्टी सर्वाधिक १.९ टक्के घसरून ४८,३०९.५० या दिवसाच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. दरम्यान आज, एकूणच बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री सुरू असल्याने ही घसरण झाली आहे. तज्ञांच्या मते अ‍ॅक्सिस बँकेने जाहीर केलेले तिमाही निकाल काही प्रमाणात नकारात्मक असल्यानेही बँक निफ्टीमध्ये ही पडझड सुरू आहे.

अ‍ॅक्सिस बँकेच्या तिमाहीचे नकारात्मक निकाल

“अ‍ॅक्सिस बँकेच्या तिमाही निकालांवर नकारात्मक प्रतिक्रिया आणि बँक निफ्टीतील त्यांच्या मोठ्या हिश्श्यामुळे ही घसरण तीव्र दिसत आहे. आयसीआयसीआय बँक आणि कोटक बँक सारख्या इतर खाजगी क्षेत्रातील बँकाही सरासरीपेक्षा नकारात्मक व्यवहार असल्याने बँक निफ्टीवर दबाव येत आहे,” असे मिरे अ‍ॅसेट शेअरखानचे विश्लेषक जतिन गेडिया यांनी फायनान्शिअल एक्सप्रेसला सांगितले.

Narayangaon Pune Accident 9 people died
Narayangaon Pune Accident : पुण्यातील नारायणगाव येथे ट्रकने कारला उडवले, ९ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांना मदत जाहीर
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Uday Samant On Thackeray group
Uday Samant : उद्धव ठाकरेंना धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “पुढच्या आठ दिवसांत ठाकरे गटातून…”
Two brother killed in mob attack
Beed Crime News: बीड जिल्हा पुन्हा हादरला; जमावाच्या हल्ल्यात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू, तिसरा गंभीर जखमी
Sensex and Nifty continue to increase for third consecutive day
मार्केट वेध : शेअर बाजाराची सलग तिसऱ्या दिवशी आगेूकूच; अदानींच्या शेअर्समध्ये उत्साही भरते कशाने?
Maharashtra Live News Updates in Marathi
Saif Ali Khan Health Updates : सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी अद्याप कोणीही ताब्यात नाही; मुंबई पोलिसांची माहिती
Consumption Of Alcohol By Wife Not Cruelty
‘माझी पत्नी मद्यपान करते’, पतीचा घटस्फोटासाठी अर्ज; न्यायालयाने म्हटले…
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…

गुंतवणूकदारांकडून नफा बूक करण्यास सुरुवात

डिसेंबरच्या सुरुवातीला बँक निफ्टीने सुमारे ५३,८०० चा उच्चांक गाठला होता, तो फक्त १.५ महिन्यांत ११ टक्क्यांनी घसरला आहे. एलकेपी सिक्युरिटीजचे विश्लेषक रुपक डे यांनी स्पष्ट केले की, “बँक निफ्टी ५४,४६७ च्या मागील उच्चांकाच्या पुढे जात नसल्याने गुंतवणूकदारांनी नफा बूक करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आज बँक निफ्टीत पडझड पाहायला मिळत आहे. याचबरोब बँक निफ्टी निर्देशांक साप्ताहिक चार्टवरील महत्त्वाच्या ५०-ईएमएच्या खाली गेल्यामुळे, पुढील काळात आणखी पडझड होण्याची शक्यता आले.”

आर्थिक अनिश्चितता

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्या कार्यकाळाची सूत्रे हाती घेतल्यानंतर कर वाढवण्याचे आणि व्यापार धोरणांमध्ये बदल करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे चीन, जपान, दक्षिण कोरिया आणि व्हिएतनाम सारखे देश, जे अमेरिकेच्या व्यापारावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत, त्यांना आव्हानांचा सामना करावा लागू शकतो,” असे व्हीटी मार्केट्सचे रॉस मॅक्सवेल म्हणाले. याबाबत लाईव्ह मिंटने वृत्त दिले आहे.

एफआयआय कडून विक्री

“अमेरिकेतील बाँड आणि चलन बाजारपेठेतील आकर्षक संधींमुळे, एफआयआय (फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स) भारतीय बाजारपेठेत सतत विक्री करत आहेत. दुसरीकडे, केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ च्या प्रतीक्षेत असलेल्या डीआयआयने (डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स) खरेदी थांबवली आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजारात सतत घसरण होण्यामागे हे देखील एक कारण असू शकतो,” असे हेन्सेक्स सिक्युरिटीजचे संशोधन विभागाचे एव्हीपी महेश एम ओझा यांनी सांगितल्याचे वृत्त लाईव्ह मिंटने दिले आहे.

Story img Loader