बाजारगप्पांमध्ये निफ्टी निर्देशांक दीड ते दोन लाखांपर्यंत झेपावू शकतो, असे सांगितले जात असताना, प्रत्यक्षात मात्र निर्देशांक वीस हजारांच्या आसपासच रेंगाळत आहे. २० जुलैला १९,९९१ चा उच्चांक मारून तब्बल एक महिना सरत आहे, इतकाच कालावधी पावसानेदेखील ओढ दिल्याने, पर्जन्यमान व बाजारातील तेजी दोघेही लुप्त झाल्याने, गुंतवणूकदारांना ‘तेजी गेली कुणीकडे?’ हा प्रश्न पडला आहे. या पार्श्वभूमीवर या आठवड्याच्या वाटचालीकडे वळू या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
शुक्रवारचा बंद भाव:
सेन्सेक्स: ६४,८८६.५१
निफ्टी: १९,२६५.८०
गेल्या लेखातील वाक्य होते – ‘अवघ्या पाच महिन्यांत ३,००० अंशाहून अधिक अशी तेजी झाल्याने निफ्टी निर्देशांकाला थोडी कालानुरूप विश्रांतीची गरज आहे. येणाऱ्या दिवसात निफ्टी निर्देशांकाच्या सुधारणेत प्रथम अडथळा १९,५०० असेल. हा स्तर निफ्टी निर्देशांकांनी पार करण्यास वारंवार अपयशी ठरल्यास निफ्टी निर्देशांकाचे प्रथम खालचे लक्ष्य १९,२५० असेल.’ आता आपण नेमके हेच अनुभवत आहोत. येणाऱ्या दिवसांतील सुधारणेत निफ्टी निर्देशांकावर पुन्हा १९,५०० ते १९,७०० अडथळा ठरल्यास निफ्टी निर्देशांकाचे खालचे लक्ष्य १८,८०० ते १८,६०० असे असेल.
दीर्घमुदतीच्या तेजीची गृहीतक भाग-३
गेल्या लेखात उल्लेख केलेली घटना… ‘निर्देशांक पाच वर्षांत सात पट झाला.’ या घटनेचा विस्तृत आढावा घेताना, काळाच्या कसोटीवर उतरलेल्या दोन गृहीतकांचा आधार घेऊ या. १) लोकसभेच्या निवडणुकांनंतर येतो बाजारात तेजीचा बहर (एखाद-दुसरा अपवाद वगळता निर्देशांक नीचांकापासून दुप्पट होतो.) २) आठ वर्षांत निर्देशांकावर उच्चांक अथवा नीचांक साध्य होण्याचे चक्र लोकसभेच्या निवडणुकांनंतर बाजारात येतो तेजीचा बहर, या गृहीतकाचा विचार करू या.
हेही वाचा – बाजार-रंग : उदय बँकेतर वित्तीय संस्थांचा
नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका होऊन स्थिर सरकार आलेले असते आणि ते अर्थव्यवस्थेस चालना देणार हे बाजाराने गृहीत धरलेले असते. अगदी १९८४ पासून हे गृहीतक काळाच्या कसोटीवर तपासून बघता… इंदिरा गांधींच्या निर्घृण हत्येनंतर झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांत राजीव गांधी यांना बहुमत मिळाले. राजीव गांधी यांच्या नेतृत्वात जे सरकार स्थापन झाले त्यात विश्वनाथ प्रताप सिंग हे अर्थमंत्री होते. त्यावेळेला मुंबई शेअर बाजार निर्देशांक २७० वरून ६५० झाला. १९८९ च्या लोकसभेच्या निवडणुकांनंतर विश्वनाथ प्रताप सिंग हे पंतप्रधान झाले तर मधु दंडवते अर्थमंत्री होते. त्यावेळेला मुंबई शेअर बाजार निर्देशांक ६८० वरून १,६०२ झाला. १९९१ च्या लोकसभेच्या निवडणुकांनंतर नरसिंहराव पंतप्रधान झाले तर मनमोहन सिंग अर्थमंत्री होते. त्यावेळेला मुंबई शेअर बाजार निर्देशांक १,९०० वरून ४,५४६ झाला. याला हर्षद मेहताची तेजी असेही संबोधतात. १९९६ साली देवेगौडा पंतप्रधान आणि पी. चिदंबरम अर्थमंत्री होते. मुंबई शेअर बाजार निर्देशांक २,७०० वरून ४,६०५ झाला (निर्देशांक नीचांकापासून दुप्पट होतो या गृहीतकाची अपवादात्मक स्थिती) लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका होऊन १९९८ साली अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान तर यशवंत सिन्हा अर्थमंत्री झाले. मुंबई शेअर बाजार निर्देशांक २,७४० वरून ६,१५० झाला. याला डॉट कॉम बूम / केतन पारेखची तेजी असेही संबोधतात. २००४ साली मनमोहन सिंग पंतप्रधान तर पी. चिदंबरम हे अर्थमंत्री होते (यूपीए-१) या काळात मुंबई शेअर बाजार निर्देशांक ३,००० वरून २१,००० झाला. २००९ साली निवडणूक निकालानंतर डाव्या पक्षांच्या मदतीविना सरकार स्थापन होत आहे हे लक्षात आल्यावर (यूपीए-१ मध्ये भारत-अमेरिका अणुकरारांवरून डाव्यांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता.) निर्देशांकाला तेजीचे उधाण येत त्याला अक्षरशः दोन वरची खरेदीची सर्किट लागली. मार्च २०१६ मध्ये सेन्सेक्स २३,१३३ वरून २० जुलै २०२३ ला ६७,६१९ आणि निफ्टी निर्देशांकाने ६,८२५ वरून १९,९९१ च्या उच्चांकाला गवसणी घालत ‘लोकसभा निवडणुकांनंतर येतो तेजीचा बहर,’ म्हणजेच निर्देशांक नीचांकापासून दुप्पट होतो, हे गृहीतक काळाच्या कसोटीवर खरे उतरविले आहे.
आता आपण, आठ वर्षांत निर्देशांकावर उच्चांक अथवा नीचांक साध्य होण्याचे चक्र… या दुसऱ्या गृहीतकाकडे वळू या.
निर्देशांकाचा जवळपास ३० वर्षांचा इतिहास तपासता निर्देशांकावर बरोबर आठ वर्षांनी ऐतिहासिक उच्चांक अथवा नीचांक नोंदला जातो. जसे की… १९९२ साली हर्षद मेहता तेजीचा उच्चांक, २००० साली केतन पारेख तेजी, डॉट कॉम बूम, २००८ साली जागतिक मंदीच्या अगोदरचा उच्चांक, तर २०१६ साली सेन्सेक्सचा २२,४९४ आणि निफ्टीचा ६,८२५ चा नीचांक. आताच्या घडीला २०१६ मध्ये ८ वर्ष मिळवले असता २०२४ हे वर्ष येते, त्यात पुढील वर्षी लोकसभेची निवडणुका तेव्हा वरील दोन्ही गृहीतकांचा २०२४ च्या पार्श्वभूमीवर आढावा घेणे उत्कंठावर्धक ठरेल. तो या स्तंभातून आपण क्रमशः घेऊच.
शिंपल्यातील मोती
डीसीडब्ल्यू लिमिटेड
(शुक्रवार, २५ ऑगस्टचा भाव – ५२ रु.)
मंदीच्या ज्वालेत होरपळून निघालेले, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर या क्षेत्रातील तयार मालाला उठाव नसलेले, मंदीप्रवण असे कॉस्टिक सोडा, सोडा ॲश (रसायन क्षेत्र) अशा क्षेत्रात स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत असलेल्या ‘डीसीडब्ल्यू लिमिटेड’ कंपनीचा समभाग आज आपला ‘शिंपल्यातील मोती’ असणार आहे. व्यापार चक्राच्या /निसर्गाच्या नियमाप्रमाणे भरतीनंतर ओहोटी, सूर्योदयानंतर सूर्यास्त, मंदीनंतर तेजी हे चक्र अव्याहतपणे चालू असते. आज व्यापार चक्राच्या तळाशी असलेल्या, दोन आर्थिक वर्षांतील एप्रिल ते जून तिमाहीतील कामगिरीचा तुलनात्मक आढावा घेता कंपनीची विक्री ७६८.६५ कोटींवरून ४३८.०४ कोटी रुपये, करपूर्व नफा ९०.९१ कोटींवरून १५.३२ कोटींवर, तर निव्वळ नफा ५८.७७ वरून ९.९९ कोटी रुपये ही आर्थिक आकडेवारी कंपनीच्या मंदीची साक्ष देते. यातील उल्लेखनीय बाब, मंदीच्या माऱ्यातदेखील ही कंपनी नफ्यात होती.
हेही वाचा – माझा पोर्टफोलियो- पोर्टफोलियोला आवश्यक यांत्रिक मशागत
मार्चपासून या क्षेत्राने आणि समभागाने पायाभरणी करत, तग धरत संधीची वाट धीरोदात्तपणे पाहिली. ती संधी, आशेचा कवडसा सरलेल्या सप्ताहात आंतरराष्ट्रीय बाजारात कंपनीच्या तयार मालाच्या किमतीत झपाट्याने वाढ व्हायला लागल्याने दृष्टीपथात आला आहे. कंपनी मंदीच्या विळख्यातून लवकरच बाहेर पडेल, अशी आशा करू या.
डीसीडब्ल्यू लिमिटेड समभागाचे आलेख वाचन करता समभागाचे अल्पमुदतीचे प्रथम वरचे लक्ष्य ५८ ते ६० रुपये, द्वितीय लक्ष्य ७५ रुपये, दीर्घमुदतीचे लक्ष्य हे ८५ ते १०० रुपये असेल. या दीर्घमुदतीच्या गुंतवणुकीला ४० रुपयांचा ‘स्टॉप लॉस’ ठेवावा. महत्त्वाची सूचना : या समभागांत लेखकाची स्वतःची, अथवा जवळच्या नातेवाईकांची गुंतवणूक नाही. वरील समभागाचे तटस्थ दृष्टीने परीक्षण करून ते वाचकांना सादर केलेले आहे.
लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.
ashishthakur1966@gmail.com
अस्वीकृती : – शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित लक्ष्य या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.