आशिष ठाकूर

निफ्टी निर्देशांक १६,८०० वर असताना,अमेरिकेतील महागाई, कर्जावरील वाढते व्याजदर, त्यामुळे परदेशी गुंतवणूकदार संस्थाची भारतातील भांडवली बाजारात समभागांची सपाटून विक्री अशी जानेवारी, फेब्रुवारी महिन्यातील परिस्थिती त्यात भारतातील पर्जन्यमानाबद्दल परस्परविरोधी भाकिते या सर्व आर्थिक समस्यांमुळे सर्व जण हवालदिल होते. या सर्व काळ्या ढगांची रुपेरी किनार… रिझर्व्ह बँकेने कर्जावरील व्याजदर वाढविण्याच्या धोरणाला तात्पुरता पूर्णविराम दिल्याने, ही रुपेरी किनार निफ्टी निर्देशांकाला १६,८०० वरून १८,४५० वर घेऊन गेली, सरलेल्या सप्ताहात निफ्टी निर्देशांकाचा साप्ताहिक बंद १८,००० च्या स्तरावरच दिल्याने, दोन-तीन महिन्यांपासून मंदीच्या छायेत वावरणाऱ्या समस्त गुंतवणूकदारांवर निफ्टीने ‘तेजीचे चांदणे शिंपित’ १६,८०० ते १८,४५० पर्यंतची सुखद वाटचाल करत सर्वांना तेजीच्या शीतल चांदण्यात न्हाऊन काढले. या पार्श्वभूमीवर या आठवड्याच्या वाटचालीकडे वळू या.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

शुक्रवारचा बंद भाव:

सेन्सेक्स : ६१,७२९.६८ / निफ्टी :१८,२०३.४०
निफ्टी निर्देशांकावर १,६५० अंशांची सुधारणा झाल्याने (१६,८०० ते १८,४५०) आता एका विश्रांतीची गरज आहे याचे सूतोवाच गेल्या लेखात केलेले होते. ती विश्रांती आपण निफ्टी निर्देशांकावर सध्या अनुभवत आहोत. येणाऱ्या दिवसांत निफ्टी निर्देशांकावर १८,००० ते १७,८०० पर्यंतची घसरण अपेक्षित आहे. या अपेक्षित सुधारणेत निफ्टी निर्देशांक १८,५०० ते १८,७०० पर्यंत झेपावेल. भविष्यात निफ्टी निर्देशांक १८,५०० ते १८,७००चा स्तर पार करण्यास वारंवार अपयशी ठरल्यास निफ्टी निर्देशांकावर १७,६०० ते १७,५०० अशी हजार अंशांची घसरण गृहीत धरावी.

शिंपल्यातील मोती

पीसीबीएल लिमिटेड (फिलिप्स कार्बन ब्लँक लिमिटेड)
शुक्रवारचा बंद भाव: १३२.९५ रु.

रबर, रंग, रसायन उद्योगात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणारी, तसेच प्रदूषणाचा जागतिकविळखा ही काळाची गरज ओळखून, या प्रदूषणावर तोडगा म्हणून त्या क्षेत्रात (कार्बन क्रेडिट) भरीव कार्य करणारी पीसीबीएल हा आजचा आपला शिंपल्यातील मोती आहे. कंपनीचा वार्षिक आर्थिक आढावा घेतल्यास मार्च २०२२ मध्ये १,२१८.८३ कोटींवरील विक्री २०२३ मध्ये १,३७३.८१ कोटी झाली आहे. तर करपूर्व नफा हा १११.०८ कोटींवरून १४७.८४ कोटी, तर निव्वळ नफा ९०.२७ कोटींवरून १०१.८४ कोटींवर झेपावला आहे. ही आर्थिक कामगिरी कंपनीच्या भांडवली बाजारातील वाटचालीवर परावर्तित होत समभागाने १२० रुपयांचा स्तर राखत, आपल्याभोवती १५ रुपयांचा परीघ (बॅण्ड) निर्माण केला असून समभाग १२० ते १३५ रुपयांमध्ये वाटचाल करत आहे. समभाग १३५ रुपयांवर १५ दिवस टिकल्यास, समभागात शाश्वत तेजी अपेक्षित असून भविष्यकालीन अल्प मुदतीचे वरचे लक्ष्य हे १५०, १६५, १८० रुपये असतील, तर दीर्घ मुदतीचे लक्ष्य हे २००, २२५ रुपये असेल. जेव्हा समभागात मंदी येईल तेव्हा १२० ते १२५च्या दरम्यान हा समभाग प्रत्येकी २० टक्क्यांच्या पाच तुकड्यात प्रत्येक घसरणीत खरेदी करावा. या दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीला १०० रुपयांचा स्टॉप लॉस ठेवावा.

आणखी वाचा-बाजार रंग: आकड्यांचे कोडे जुळवताना…

महत्त्वाची सूचना: वरील समभागात लेखकाची स्वतःची अथवा जवळच्या नातेवाईकांची गुंतवणूक नाही. वरील समभागाचा तटस्थ दृष्टीने परीक्षण करून ते वाचकांना सादर केलेलं आहे.

निकालपूर्व विश्लेषण

या सदरातील निकालपूर्व विश्लेषण काळाच्या कसोटीवर तपासून पाहू या. २३ एप्रिलच्या लेखात बजाज ऑटो, मारुती सुझुकी व आयडीएफसी फर्स्ट बँक या कंपन्यांचे निकालपूर्व विश्लेषण मांडलेले होते.

बजाज ऑटो लिमिटेडने निकालापश्चात ४,१५० रुपयांचा निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर राखत ४,६०० रुपयांचे नमूद केलेले द्वितीय लक्ष्य १२ मेला ४,६२८ चा उच्चांक मारत साध्य केले. अल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत ६ टक्क्यांचा परतावा मिळाला. मारुती सुझुकीने ८६०० रुपयांचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर राखत ९,००० रुपयांचे द्वितीय लक्ष्य १२ मेला ९,३२९ चा उच्चांक मारत साध्य केले आणि ४.५ टक्क्यांचा परतावा दिला. आयडीएफसी फर्स्ट बँकेने निकालापश्चात ५५ रुपयांचा निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर राखत ६४ रुपयांचे नमूद केलेले द्वितीय लक्ष्य १६ मेला ६८ रुपयांचा उच्चांक मारत साध्य केले आणि गुंतवणूकदारांना १३ टक्क्यांचा परतावा दिला.

आणखी वाचा-बाजारातील माणसं- बाजारातील अदृश्य खेळाडू : संवेदनशील निर्देशांक

१) भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल)
तिमाही वित्तीय निकाल – सोमवार, २२ मे
१९ मेचा बंद भाव – ३६०.३० रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- ३५० रु.
अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून ३५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ३७० रुपये, द्वितीय लक्ष्य ३९० रुपये.
ब) निराशादायक निकाल: ३५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ३३० रुपयांपर्यंत घसरण.
२) अशोक लेलँड लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल- मंगळवार, २३ मे
१९ मेचा बंद भाव-१५४.७० रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- १४७ रु.
अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून १४७ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १६० रुपये, द्वितीय लक्ष्य १८० रुपये.
ब) निराशादायक निकाल: १४७ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १३५ रुपयांपर्यंत घसरण.
३) हिंडाल्को लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल- बुधवार, २४ मे
१९ मेचा बंद भाव- ४०६.७५ रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- ४०० रु.
अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून ४०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ४२५ रुपये, द्वितीय लक्ष्य ४५० रुपये.
ब) निराशादायक निकाल : ४०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ३७५ रुपयांपर्यंत घसरण.
४) भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल)
तिमाही वित्तीय निकाल- शुक्रवार, २६ मे
१९ मेचा बंद भाव- ८०.०५ रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- ७५ रु.
अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून ७५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ८५ रुपये, द्वितीय लक्ष्य ९५ रुपये.
ब) निराशादायक निकाल :७५ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ६८ रुपयांपर्यंत घसरण.
५) सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल- शुक्रवार, २६ मे
१९ मेचा बंद भाव- ९२५.८५ रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- ९७० रु.
अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून ९७० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,०२० रुपये, द्वितीय लक्ष्य १,०७०रुपये.
ब) निराशादायक निकाल : ९७० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ८६० रुपयांपर्यंत घसरण.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती: शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित लक्ष्य या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Story img Loader