Nitin Kamath On SIP: गेल्या काही महिन्यांपासून भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली असून, ही घसरण अद्यापही सुरूच आहे. या घसरणीमुळे अनेक गुंतवणूकदार चिंतेत पडले आहेत. सप्टेंबरपासून सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक त्यांच्या शिखरावरून सुमारे १४-१५% खाली आले आहेत. दरम्यान, झेरोधाचे संस्थापक आणि सीईओ नितीन कामथ यांनी बाजारातील या अनिश्चिततेच्या काळात गुंतवणूकदारांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. दरम्यान, त्यांनी ‘सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये (SIP) गुंतवणूक करणे थांबवणे योग्य होईल का?’ या अनेक गुंतवणूकदारांच्या मनात उद्भवणाऱ्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एसआयपी थांबवणे चुकीचे

“एसआयपी थांबवणे चुकीचे आहे,” असे कामथ यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांच्या मते, दर महिन्याला गुंतवणूक करून आपण निराश होण्याऐवजी जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. कामथ म्हणाले की, सध्याची शेअर बाजार सुधारणा (करेक्शन) ही कोरोनानंतरच्या गुंतवणूकदारांसाठी पहिली मोठी सुधारणा (करेक्शन) आहे आणि ती स्वाभाविक आहे.

…यश मिळण्याची शक्यता वाढते

नितीन कामथ पुढे स्पष्ट केले की, “एसआयपी वेगवेगळ्या बाजार टप्प्यांमध्ये सरासरीस मदत करते. उदाहरणार्थ, २०२० मध्ये लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप शेअर्स २५-४०% ने घसरले परंतु नंतर ते २००-४००% ने वाढले. जर गुंतवणूकदार त्यावेळी घाबरले असते तर ही वाढ मिस झाली असती. म्हणूनच, नियमित गुंतवणूक, विविधीकरण आणि शिस्त यामुळे दीर्घकाळात यश मिळण्याची शक्यता वाढते.”

याचा अर्थ असा की गुंतवणूकदारांनी बाजारातील चढउतारांना घाबरू नये आणि एसआयपी सुरू ठेवावी. हे गुंतवणूकदारांच्या दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी फायदेशीर ठरू शकते.

बाजार का पडत आहे?

कामत यांच्या पोस्टबरोबरच्या ब्लॉगमध्ये, झेरोधाने म्हटले आहे की, बाजारात सुरू असलेल्या सुधारणा समजून घेण्याचे सर्वात सोपे उत्तर म्हणजे खरेदीदारांपेक्षा विक्रेते जास्त आहेत. ब्लॉगमध्ये बाजारातील सुधारणांमागील पाच मुख्य कारणे स्पष्ट केली आहेत. त्यात म्हटले आहे की, एक महत्त्वाचे कारण म्हणजे शेअर बाजारचे सध्याचे मूल्यांकने जास्त आहेत.

याशिवाय, परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून पैसे काढून घेत आहेत. गेल्या काही तिमाहीत कमाईतील मंदीमुळे ही अडचण आणखी वाढली आहे. याशिवाय, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयांमुळे बाजारावर दबाव आला आहे. त्याच वेळी, कोरोना महामारी, मध्य पूर्वेतील संकट आणि रशिया-युक्रेन युद्धाचादेखील बाजारावर परिणाम झाला आहे.