सप्टेंबर तिमाहीचे देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाचे (जीडीपी) आकडे अपेक्षेप्रमाणे राहिले. तरीही मंदावलेली जागतिक अर्थव्यवस्थेने भारतीय अर्थव्यवस्था आणि मुख्यतः देशाच्या निर्यातीसमोर आव्हाने उभी केली आहे. तर दुसरीकडे अन्नधान्याच्या किमती कमी झाल्यामुळे अनेकांना रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात वाढीची गती कमी केली जाईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे येत्या ७ डिसेंबरला तिच्याकडून रेपो दरात ३५ आधार बिंदूंनी वाढ केली जाण्याचा अर्थतज्ज्ञांचा अंदाज आहे. तर काहींना मध्यवर्ती बँकेकडून चालू आर्थिक वर्षातील जीडीपी वाढीच्या अंदाजांचे पुनर्मूल्यांकन केले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. या आधी सप्टेंबरमध्ये अर्धा टक्का (५० आधार बिंदू) आणि त्या आधी तितक्याच प्रमाणात वाढ करून रेपो दर ५.९० टक्क्यांवर नेण्यात आला आहे. या आठवड्यातील दरवाढीसह रिझर्व्ह बँकेकडून विश्राम घेतला जाईल, सध्याच्या दरवाढीच्या चक्रात ६.२५ टक्के हा रेपो दराचा कळसबिंदू राहिल, असा विश्लेषकांचा होरा आहे.
चालू सप्ताहातील घडामोडी –
सोमवार, ५ डिसेंबर २०२२
० भारताचा नोव्हेंबर महिन्याचा सेवा क्षेत्राचा पीएमआय निर्देशांक जाहीर होईल.
० या शिवाय जगभरात अन्यत्र, चीन, जपानचा सेवा क्षेत्राचा पीएमआय (नोव्हेंबर), युरोपमधील किराणा विक्रीची (ऑक्टोबर) आकडेवारी, अमेरिकेतील फॅक्टरी ऑर्डर (ऑक्टोबर), तसेच बिगर निर्मिती क्षेत्राचे व्यवसाय क्रियाकलाप (नोव्हेंबर) यावर गुंतवणूकदारांचे लक्ष राहिल.
मंगळवार, ६ डिसेंबर २०२२
० नव्याने बाजार पदार्पण करणाऱ्या बिकाजी फूड्स लिमिटेडचे समभाग सूचिबद्ध झाल्यानंतर सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर होतील. पीटीसी इंडिया लिमिटेडचे निकाल याच दिवशी अपेक्षित
० जगभरात ऑस्ट्रेलियाच्या मध्यवर्ती बँकेकडून चलनवाढीच्या विरोधातील युद्धात व्याजदर वाढीचा पवित्रा कसा असेल हे ठरेल. अमेरिका आणि कॅनडा त्यांचे निर्यात आणि आय़ातीतील वर्षागणिक प्रगतीचे आकडे जाहीर करतील.
बुधवार, ७ डिसेंबर २०२२
० रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण निर्धारण समितीच्या तीन दिवस चालणाऱ्या बैठकीनंतर, व्याजदरासंबंधीच्या निर्णयाची उद्योगविश्वासह, बाजाराला प्रतीक्षा असेल.
० कॅनडाच्या मध्यवर्ती बँकेचा व्याजदरासंबंधी निर्णय, चीनची आयात (नोव्हेंबर), युरो क्षेत्राची तिसऱ्या तिमाहीची जीडीपी आकडेवारी, ऑस्ट्रेलियाची जीडीपी वाढीचा दर, तसेच युरोपमधील रोजगाराच्या तिमाहीगणिक आकडेवारीची घोषणा, अमेरिकेतील खनिज तेल आयातीची आकडेवारीही औत्सुक्याची ठरेल.
गुरुवार, ८ डिसेंबर २०२२
० समभाग सूचिबद्धता : मागील आठवड्यातील यशस्वी ‘आयपीओ’ – धरमाज क्रॉप गार्ड लिमिटेडचे समभाग भांडवली बाजारात सूचिबद्धतेने पदार्पण करू शकते. या कृषी रसायन क्षेत्रातील कंपनीच्या ‘आयपीओ’ला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद दिसला होता.
० जगभरात अन्यत्र, जपानच्या तिसऱ्या तिमाहीची जीडीपी आकडेवारीवर बाजाराची नजर असेल.
शुक्रवार, ९ डिसेंबर २०२२
० चीनमधील चलनवाढीचा (नोव्हेंबर) दर, तर अमेरिकेतील ग्राहकांचा कल दर्शविणारी आकडेवारी अपेक्षित.
० धन-लाभ
(प्रमुख कंपन्यांकडून जाहीर लाभांश, त्यांच्या तारखा व प्रमाण)
७ डिसेंबर २०२२ : हिंदुस्तान ग्लोबल सोल्यूशन्स – अंतरिम लाभांश – ५ रुपये प्रति समभाग
८ डिसेंबर २०२२ :
१. कॅनफिन होम – अंतरिम लाभांश – १.५० रुपये प्रति समभाग
२. एप्टस व्हॅल्यू हाऊसिंग फायनान्स – अंतरिम लाभांश – २ रुपये प्रति समभाग