सप्टेंबर तिमाहीचे देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाचे (जीडीपी) आकडे अपेक्षेप्रमाणे राहिले. तरीही मंदावलेली जागतिक अर्थव्यवस्थेने भारतीय अर्थव्यवस्था आणि मुख्यतः देशाच्या निर्यातीसमोर आव्हाने उभी केली आहे. तर दुसरीकडे अन्नधान्याच्या किमती कमी झाल्यामुळे अनेकांना रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात वाढीची गती कमी केली जाईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे येत्या ७ डिसेंबरला तिच्याकडून रेपो दरात ३५ आधार बिंदूंनी वाढ केली जाण्याचा अर्थतज्ज्ञांचा अंदाज आहे. तर काहींना मध्यवर्ती बँकेकडून चालू आर्थिक वर्षातील जीडीपी वाढीच्या अंदाजांचे पुनर्मूल्यांकन केले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. या आधी सप्टेंबरमध्ये अर्धा टक्का (५० आधार बिंदू) आणि त्या आधी तितक्याच प्रमाणात वाढ करून रेपो दर ५.९० टक्क्यांवर नेण्यात आला आहे. या आठवड्यातील दरवाढीसह रिझर्व्ह बँकेकडून विश्राम घेतला जाईल, सध्याच्या दरवाढीच्या चक्रात ६.२५ टक्के हा रेपो दराचा कळसबिंदू राहिल, असा विश्लेषकांचा होरा आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा