जर तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली असेल तर त्याचा मोठा फायदा आहे. तुम्हाला अचानक काही कामासाठी पैशांची गरज भासली आणि तुमच्याकडे म्युच्युअल फंड असेल तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही त्यांच्यावर सहज कर्ज देखील मिळवू शकता. विशेष म्हणजे कार खरेदी करण्यासाठीही या कर्जाचा वापर करू शकता. १०० पैकी ९९ प्रकरणांमध्ये खरेदीदार कार खरेदी करण्यासाठी कार लोनचा फायदा घेऊ शकतो. परंतु या युनिट्सची पूर्तता करण्याऐवजी आणि दीर्घकालीन गुंतवणुकीच्या फायद्यांपासून मुक्त होण्याऐवजी MF युनिट्ससाठी कर्ज घेणे आणि कार खरेदी करणे अधिक अर्थपूर्ण आहे.
हे आपण उदाहरणाने समजून घेऊ. ए व्यक्तीला ३ वर्षांच्या मुदतीसाठी प्रति वर्ष ८.५ % सर्वोत्तम व्याजदराने कार खरेदी करण्यासाठी १५ लाख रुपयांच्या कर्जाची गरज आहे. कार कर्ज घेण्याऐवजी ए व्यक्तीने त्याच्या म्युच्युअल फंडांवर त्याच रकमेचे (१५ लाख) कर्ज घेतले आहे. त्याने पहिल्या वर्षासाठी दरमहा ३५ हजार, दुसऱ्या वर्षासाठी ४० हजार प्रति महिना आणि तिसऱ्या वर्षासाठी ४५ हजार प्रति महिना परतफेड करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच तो जानेवारी वर्ष २ आणि जानेवारी वर्ष ३ मध्ये वार्षिक १.५ लाखांची दोन मोठ्या रकमा देऊ शकतो. खाली देण्यात आलेल्या कार कर्ज आणि रोख्यांवरील कर्ज यांच्यातील फरकावरून कळून येईल.
हेही वाचाः विश्लेषण : टोमॅटो उत्पादक अन् ग्राहक दोघेही चिंतेत; भाव वाढण्याचे कारण काय?
हेही वाचाः विप्रोने बायबॅक कार्यक्रमाची शेवटची तारीख वाढवली, आता कंपनी ‘या’ दिवसापर्यंत बायबॅक करणार
चला सकारात्मक गोष्टी जाणून घेऊयात-
मुद्दल रकमेची लवकर परतफेड केल्यामुळे म्युच्युअल फंडावरील कर्जाचे एकूण व्याज हे कार कर्जाच्या तुलनेत कमी आहे.
निश्चित ९९९ रुपयांचे प्रक्रिया शुल्क + कर देखील कार कर्जापेक्षा कमी आहे. वरील उदाहरण लक्षात घेता, तुम्ही व्याज आणि अन्य शुल्कावर अंदाजे १४,००० रुपयांची बचत करू शकता.
या व्यतिरिक्त तुम्हाला मासिक परतफेडीसाठी लवचिकता मिळते, तुम्ही तुमच्या सोयीनुसार कमी-जास्त प्रमाणात परतफेड करू शकता आणि कोणत्याही प्रीपेमेंट शुल्काशिवाय संपूर्ण रक्कम मूळ रकमेसह समायोजित केली जाते. जर तुम्हाला कोठून एकरकमी रक्कम मिळाली आणि ती म्युच्युअल फंड खात्याच्या कर्जामध्ये भरली तर व्याज खूपच कमी होऊ शकते.
आणखी एक मोठी सकारात्मक गोष्ट म्हणजे नोंदणी प्रमाणपत्रावर (आरसी कार्ड) कोणतेही तारण गहाण नाही. त्यामुळे तुम्हाला कर्ज देणाऱ्याकडून एनओसी घेण्याची आवश्यकता नाही आणि तारण गहाण काढण्यासाठी आरटीओला भेट देण्याची किंवा मध्यस्थाला ( २ ते ३ हजार रुपये ) पैसे देण्याची गरज नाही. ही तुलना सर्वोत्तम नवीन कार कर्ज दरासाठी विचारात घेण्यासारखी आहे. जर तुम्ही वापरलेली कार विकत घेण्याचे उद्दिष्ट ठेवत असाल तर म्युच्युअल फंडांवरील कर्ज अधिक किफायतशीर असेल कारण जुन्या कारसाठी कार कर्जावरील व्याज ९% पेक्षा जास्त असेल आणि प्रक्रिया शुल्क देखील जास्त असू शकते.