अजितकुमार मेनन पीजीआयएम या छोटया म्युच्युअल फंडाचे फेब्रुवारी २०१९ पासून मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ‘राजहंसाचे चालणे, जगी जालिया शहाणे, म्हणोनि काय कवणे, चालोचि नये ?’=’ मोठ्या म्युच्युअल फंड घराण्यांबरोबर लहान म्युच्युअल घराणे फंड बाजारात असलेच पाहिजे. उद्योग क्षेत्रात मोठ्या कंपन्या आणि छोटया कंपन्या व्यवस्थितपणे काम करत असतात. आज मोठा असलेला म्युच्युअल फंड सुरुवातीला छोटाच होता, हे पक्के डोक्यात ठेवून पीजीआयएम या म्युच्युअल फंडाला मोठे करण्यासाठी अजितकुमार मेनन या फंडाकडे आले. त्या अगोदर त्यांनी वेगवेगळ्या छोटया-मोठ्या ॲसेट मॅनेजमेंट कंपन्या अनुभवलेल्या पण होत्या. स्टँडर्ड चार्टड म्युच्युअल फंड, डीएसपी ब्लॅकरॉक, टाटा एएमसी या ॲसेट मॅनेजमेंट कंपन्यांबरोबरच व्होडाफोन, क्रॉम्प्टन ग्रीव्हज या कंपन्यांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या.

पार्ले महाविद्यालयातून वर्ष १९८६ ते १९९१ या काळात ते बी.कॉम झाले. महाविद्यालयामध्ये गाण्यांच्या स्पर्धा असल्या की, गाणी म्हणायची, चित्रकला चांगली असल्याने चित्र काढणे यात त्यांचा हातखंडा होता. वर्ष १९७५ ते १९८६ या काळात कलिना एज्युकेशन सोसायटी या ठिकाणी एसएससी परीक्षा उत्तीर्ण झाले. नेतृत्व करण्याची हौस असल्याने रोटरी क्लब स्थापनेसाठी काम केले. यानंतर चेतना इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड रिसर्च या ठिकाणी एम.एन.एस मार्केटिंग वर्ष १९९२ ते १९९४ या कालावधीमध्ये पूर्ण केले. औद्योगिक क्षेत्रातला अनुभव घेतल्यानंतर ते आर्थिक क्षेत्राकडे वळले. जास्तीत जास्त काळ त्यांनी डी.एस.पी ब्लॅक रॉक या संस्थेबरोबर काम केले. रणनीती निश्चित करण्यासाठी म्हणजेच हेड ऑफ स्ट्रॅटजी या पदावर टाटा ॲसेट मॅनेजमेंट या कंपनीकडे जानेवारी २०१६ ते जुलै २०१७ या कालावधीत म्हणजे १ वर्षे ७ महिने काम केले. जुलै २०१७ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत डीएचएफएल प्रामेरिका ॲसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य व्यवसाय अधिकारी म्हणून काम केले. या कालावधीत त्यांना काही चढ-उतारांना सामोरे जावे लागले. बऱ्याच वेळा संस्थांच्या बाबतदेखील नशीब किंवा कुंडलीवर विश्वास ठेवायचा का? असा प्रश्न पडावा असे या कालावधीत घडले. मालमत्ता वाढणे , मालमत्ता वेगाने कमी होणे, त्यात करोना महासाथीची पडलेली भर, असे एका मागोमाग एक फटके बसले. परंतु हार मानायची नसते. म्हणून जिद्दीने अजित मेनन यांनी आपले काम चालू ठेवले .

nifty stock market marathi news
सेन्सेक्सची १० शतकी गटांगळी, महागाई आणि परकीय निधीच्या निर्गमनाने बाजार बेजार
Rupee depreciated by 5 paise against the dollar
ढासळता रुपया नव्या तळाला; डॉलरच्या तुलनेत ५ पैशांनी…
1115 crore IPO of Zinka Logistics from November 13 print
झिंका लॉजिस्टिक्सचा १,११५ कोटींचा ‘आयपीओ’ १३ नोव्हेंबरपासून
The pros and cons of Donald Trump victory for investors
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाचे गुंतवणूकदारांना असेही लाभ-तोटे!
Swiggy shares bid only 12 percent on day one
स्विगी समभागांसाठी पहिल्या दिवशी १२ टक्केच बोली
Sale of stake in Hindustan Zinc by Government
हिंदुस्थान झिंकमधील अडीच टक्के हिश्शाची अखेर सरकारकडून विक्री; गुंतवणूकदारांना १० टक्के सवलतीत ५०५ रुपयांना समभागांसाठी बोली शक्य

हेही वाचा : अर्थवर्षाची निर्देशांक तेजीनेच सांगता; वर्षभरात सेन्सेक्सची २४.८५ टक्के, तर निफ्टीची २८.६१ टक्के झेप

डीएचएफएल या संस्थेला प्रामेरिकाने बाजूला केले आणि ऑगस्ट २०१९ मध्ये नव्याने वाटचाल करण्यास सुरुवात केली. फटके बसले की, एकामागोमाग एक बसत जातात. २५ हजार कोटींची मालमत्ता सुमारे ७ हजार कोटींपर्यंत खाली आली. संस्थेची पुनर्उभारणी करण्याचे प्रयत्न चालू असताना पुन्हा करोनामुळे मालमत्ता ३ हजार ५०० कोटींपर्यंत खाली आली. या मालमत्तेमध्ये ९०० कोटींची मालमत्ता समभाग म्हणजे इक्विटी स्वरूपात होती.

जिद्द कायम ठेवून व्यवसायाची पुन्हा वाढ करण्यास सुरुवात केली आणि आता या संस्थेकडे २५ हजार कोटी रुपये मालमत्ता व्यवस्थापनसाठी जबाबदारी आहे. त्यापैकी २३ हजार कोटी रुपये इक्विटी स्वरूपातील मालमत्ता आहे. म्हणून अजित मेनन यांचे कौतुक केले पाहिजे. हरिवंश रॉय बच्चन यांच्या कवितेतील जी ओळ आहे, की कोशिश करने वालो की हार नही होती. बराच कालावधी निघून गेलेला असला तरी अजित मेनन आणि त्यांचे सहकारी सतत प्रयत्न करीत आहेत. निवृत्ती विभागाकडे जास्त लक्ष देण्याचे त्यांनी ठरविले आहे. ६ महिने मुदतीचा संपत्ती निर्मिती अर्थात वेल्थ मॅनेजमेंट या विषयावरचा पदविका अभ्यासक्रम अजित मेनन यांनी तयार केला आहे. तर वर्ष २०२३ मध्ये या फंडाने देशात रिटायरमेंट रेडिनेस हा विषय घेऊन एक अभ्यास केला आणि या अभ्यासातून एक महत्त्वाची माहिती मिळाली त्याचा भविष्यात अत्यंत चांगला उपयोग होईल. हा अभ्यास १५ शहरांमध्ये केलेला असून निवृत्त झाल्यानंतर व्यक्ती काय काय करू शकते? यांचे एकूण ५० व्यवसाय नोंदणी केलेले आहेत. प्रत्येक व्यक्तीने आपल्या आवडीच्या क्षेत्रात निवृत्ती झाल्यानंतर काम करायचे. असे ठरविले तर ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून निवृत्ती या शब्दाला कायमची निवृत्त करू शकेल .

हेही वाचा : शेअर खरेदी-विक्रीची ऐतिहासिक ‘टी प्लस शून्य’ प्रणाली आजपासून; स्टेट बँक, बजाज ऑटोसह २५ समभागांत एकाच दिवसांत व्यवहारपूर्तता शक्य  

अजित मेनन यांनी काही महत्त्वाचे नियम गुंतवणूकदारांना सांगितले आहेत. ते येथे थोडक्यात मांडणे आवश्यक आहे.

१) संपत्ती जरूर मिळवा, मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
२) प्रथम स्वतःमध्ये गुंतवणूक करा.

३) पैसा खर्च करून काहीही खरेदी करता येते. फक्त वेळ खरेदी करता येत नाही.
४) माणूस स्वतःचे भवितव्य तयार करीत नसतो. तर त्यांच्या सवयी त्यांचे भवितव्य निर्माण करते .

५) आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर एकापेक्षा जास्त कौशल्य आत्मसात करायला हवेत. तर निवृत्तीनंतरचे आयुष्य चांगले जाईल .

६) मुलांचे शिक्षण, लग्न, घर, वाहन या गोष्टीचे नियोजन करण्यात आर्थिक स्वातंत्र्य हा उद्देश बाजूला ठेवला जातो. मात्र त्यांचा विचार करायला हवा.

७) प्रथम विमा केलेला असावा त्यानंतर अचानकपणे काही संकट आले तर त्यासाठी आपत्कालीन निधी ठेवणे. त्यानंतर गुंतवणुकीचा विचार करणे.
८) गुंतवणूक क्षेत्राचा अतिशय चांगला अनुभव असलेल्या मेनन यांचा ८ वा मुद्दा तर अतिशय महत्त्वाचा आहे. मेनन यांनी म्युच्युअल फंड वितरकाला आपल्या पैशांचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी दिलेली आहे. गेली १४वर्षे त्यांचा विश्वासू वितरक मेनन यांच्या गुंतवणुकीचे नियोजन करण्यात यशस्वी ठरला आहे. अनेक गुंतवणूकदारांना अशी खुमखूमी असते की, आपले गुंतवणूक नियोजन आपण स्वतः करावे, त्यांचे डोळे उघडतील अशी आशा करूया.

प्रमोद पुराणिक

लेखक नाशिकस्थित अर्थअभ्यासक

pramodpuranik5@gmail.com