‘माझा पोर्टफोलियो’चा नऊमाही आढावा

नऊ महिन्यांच्या कालावधीत ‘माझा पोर्टफोलियो’ने १७.२ टक्के (आयआरआर ४५.४७ टक्के) परतावा दिला आहे. ३०,१९७ रुपयांच्या गुंतवणुकीचे ५१८७ रुपये नफ्यासह ३५,३८४ रुपये झाले आहेत. एलटी फूड्स, किंगफा टेक्नॉलॉजी आणि सारडा एनर्जी या कंपन्यातील गुंतवणूक फायद्याची ठरली आहे.

या सदरातील शेअर्स हे नेहमीच मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी असल्याने त्यांचे लगेचच मूल्यमापन करणे योग्य ठरणार नाही. शेअर बाजार निर्देशांक रोज नवीन उच्चांक गाठत असताना, गुंतवणूकदारांनी सतर्क राहून गुंतवणूक केलेल्या कंपन्यांचे आर्थिक निकाल अभ्यासून बाजारातील घडामोडींवर लक्ष ठेवावे. तसेच वेळोवेळी ‘स्टॉप लॉस’ पद्धत अवलंबून तोटा मर्यादित ठेवणे अपेक्षित आहे.

– अजय वाळिंबे

Stocksandwealth@gmail.com

• ‘माझा पोर्टफोलियो’अंतर्गत सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेट वस्तू घेतलेली नाही.

• ‘माझा पोर्टफोलियो’अंतर्गत विवेचन केलेले शेअर्स हा आर्थिक सल्ला अथवा शिफारस नाही. लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.