सुमारे चाळीस वर्षांपूर्वी स्थापन झालेली रत्नमणी मेटल्स अँड ट्यूब्स लिमिटेड भारतातील स्टेनलेस स्टील पाइप आणि ट्यूब्स तसेच कार्बन स्टील पाइपच्या उत्पादनातील एक अग्रणी कंपनी आहे. निर्यात बाजारपेठेत जवळपास ४० टक्के हिस्सा असलेली रत्नमणी आज एक भारतीय ‘आंतरराष्ट्रीय कंपनी’ म्हणून गणली जाते.

कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये निकेल मिश्र धातू/ स्टेनलेस स्टील, सीमलेस ट्यूब आणि पाइप, स्टेनलेस स्टील वेल्डेड ट्यूब आणि पाइप, टायटॅनियम वेल्डेड ट्यूब्स, कार्बन स्टील पाइप इत्यादींचा समावेश आहे. कंपनीचा सुमारे २३ टक्के महसूल स्टेनलेस स्टील विभागातून येतो. कंपनी तेल आणि वायू, रिफायनरी, थर्मल पॉवर, अणुऊर्जा, रसायने, पेट्रोकेमिकल्स, खते, पाणी वितरण, साखर, कागद, औषध, ऑटोमोबाइल्स, पायाभूत सुविधा आणि इतर यांसारख्या विविध उद्योगांच्या गरजा पूर्ण करते. कंपनी आपली उत्पादने ३५ हून अधिक देशांमध्ये निर्यात करते. यात कॅनडा, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, दक्षिण कोरिया, स्पेन, जपान, बेल्जियम, नेदरलँड्स, यूएसए, रशिया आणि इतर देशांचा समावेश आहे.

dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
Eurasian Water Cat Pune District, Indapur,
पुणे जिल्ह्यात प्रथमच दुर्मीळ ‘युरेशियन पाणमांजरा’चा शोध, इंदापूरमधील विहिरीमध्ये पडलेल्या पाणमांजराची सुटका
Success Story Of Chitraang Murdia
Success Story Of Chitraang Murdia : एकेकाळी होता आयआयटी टॉपर, डॉक्टर होण्यासाठी सगळंच सोडलं; वाचा, चित्रांग मुरडियाची गोष्ट
four pistols seized pune
पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराइतांकडून चार पिस्तुले जप्त, पोलिसांकडून तिघे अटकेत
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त

हेही वाचा >>>मोतीलाल ओसवाल फायनान्शियलकडून एकास तीन बक्षीस समभाग; नफा चारपट वाढीसह ७२४ कोटींवर

उत्पादन क्षमता

रत्नमणीकडे एसएसटीपी आणि कार्बन स्टील पाइपचा समावेश असलेले वैविध्यपूर्ण उत्पादन प्रोफाइल आहे. जे ऊर्जा, तेल आणि वायू, रसायने, पाणी आणि रिफायनरी यांसारख्या अंतिम वापरकर्त्यांच्या उद्योगांमध्ये वापरले जातात. कंपनी भारतातील एसएसटीपी विभागातील सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक आहे. कंपनीचे गुजरात राज्यात तीन मोठे उत्पादन प्रकल्प असून कार्बन स्टील विभागाची एकूण उत्पादन क्षमता ५१० लाख टन, तर स्टेनलेस स्टीलची वार्षिक क्षमता ६१,५०० मेट्रिक टन आहे. आपल्या उत्पादनांची वाढती मागणी पाहता कंपनीची कार्बन स्टीलची उत्पादन क्षमता आर्थिक वर्ष २०२५ च्या अखेरीस ६१० लाख टन्सपर्यंत वाढवली जाऊ शकते.

आपली उपस्थिती वाढवण्यासाठी तसेच विस्तारीकरणासाठी रत्नमणीने ऑक्टोबर २०२२ मध्ये, रवी टेक्नोफोर्ज प्रायव्हेट लिमिटेड (बेअरिंग रिंग बनवणारी कंपनी) मध्ये ५३ टक्के हिस्सा विकत घेतला. उर्वरित २७ टक्के हिस्सा २०२४ च्या अखेर, तर २० टक्के हिस्सा २०२७ मध्ये संपादन करणार आहे. या संपादनामुळे कंपनीला सध्याच्या ग्राहकांसाठी नवीन उत्पादने आणि आपला व्यवसाय विस्तारण्यास मदत होईल. सप्टेंबर २०२३ मध्ये कंपनीने निर्यात बाजारपेठेत आपली उपस्थिती वाढवण्यासाठी टेक ‘एनर्जी एजी’बरोबर संयुक्त उपक्रमातही प्रवेश केला आहे. १६ एप्रिल २०२४ रोजी कंपनीने अबुधाबी येथे रत्नमणी मिडल ईस्ट पाइप ट्रेडिंग एलएलसी ही उपकंपनी स्थापन केली आहे.

हेही वाचा >>>माझा पोर्टफोलिओ – कामगिरी उजवी, ताळेबंदही सशक्त! केएनआर कन्स्ट्रकशन लिमिटेड

डिसेंबर २०२३ साठी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीच्या उलाढालीत १५ टक्के वाढ होऊन ती १,२५७ पोहोचली आहे. मात्र नक्त नफ्यात कुठलीही वाढ न होता तो १३२.८७ कोटी रुपयांवर कायम राहिला आहे. रत्नमणीने गेली अनेक वर्षे दर्जेदार उत्पादनांनी आपल्या ग्राहकांशी उत्तम संबंध प्रस्थापित केले आहेत. कंपनीने गेल्या काही वर्षांत निर्यातीद्वारे आपला महसूल वाढवण्यातही यश मिळवले आहे. कंपनीचे वार्षिक आर्थिक निकाल अजून जाहीर व्हायचे आहेत. मात्र कंपनी आगामी कालावधीत १८ टक्क्यांचे मार्जिन राखू शकेल असे वाटते. केवळ ०.५ बीटा असलेली आणि अत्यल्प कर्ज असलेली ही बहुराष्ट्रीय भारतीय कंपनी मध्यम कालावधीसाठी एक उत्तम गुंतवणूक ठरू शकेल.

रत्नमणी मेटल्स अँड ट्यूब्स लिमिटेड

(बीएसई कोड : ५२०१११) संकेतस्थळ : http://www.ratnmani.com

प्रवर्तक : प्रकाश संघवी

बाजारभाव : रु. ३००६/-

प्रमुख उत्पादन/ व्यवसाय : स्टील ट्यूब आणि पाइप

भरणा झालेले भागभांडवल : रु. १४.०२ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक ५९.७७

परदेशी गुंतवणूकदार १२.८६ बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार १६.१४ इतर/ जनता ११.२२

पुस्तकी मूल्य : रु. ४०२

दर्शनी मूल्य : रु. २/-

गतवर्षीचा लाभांश : ६००%

प्रति समभाग उत्पन्न : रु. ८८.७६

किंमत उत्पन्न गुणोत्तर : ३४.१

डेट इक्विटी गुणोत्तर : ०.०६

समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर : २५.१

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर : १८.९

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोईड (ROCE) : २७.३%

बीटा : ०.५

बाजार भांडवल : रु. २१२१२ कोटी (लार्ज कॅप)

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक : ३१३९/२१२९ गुंतवणूक कालावधी : २४ महिने

अजय वाळिंबे

Stocksandwealth@gmail.com

हा लेख गुंतवणूक सल्ला नव्हे तर अभ्यासपूर्ण विवेचन आहे.

प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या माहितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.